Saturday, September 5, 2026
Google search engine
HomeUncategorizedमागासवर्गीय विद्यार्थ्यांनी 15 सप्टेंबरपर्यंत शासकीय वसतिगृहासाठी अर्ज करावेत

मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी 15 सप्टेंबरपर्यंत शासकीय वसतिगृहासाठी अर्ज करावेत

पुणे दि.25: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत असलेल्या जिल्ह्यातील शासकीय वसतिगृहात व्यावसायिक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी 15 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत एकूण 24 मागासवर्गीय मुला-मुलींची शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत. त्यामध्ये 14 मुलांची व 10 मुलींची वसतिगृहे आहेत. पुणे व पिंपरी चिंचवड शहरामध्ये एकूण 13 शासकीय वसतिगृहे असून त्यापैकी मुलींची 4 व मुलांची 8 वसतिगृहे आहेत. तसेच 12 वसतिगृहे तालुकास्तरावर आहेत.

 

समाज कल्याण आयुक्त यांनी सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरिता व्यावसायिक विभागाचे मुलां-मुलींच्या शासकीय वसतिगृह प्रवेशाचे वेळापत्रक प्रसिद्ध केलेले आहे. शासकीय वसतिगृह प्रवेश हे ऑनलाईन पद्धतीने होणार असून https://hmas.mahait.org पोर्टलवर विद्यार्थ्यांनी अर्ज करावयाचे आहेत. 15 सप्टेंबरपर्यंत अर्ज करावयाची मुदत असून 18 सप्टेंबर 2025 रोजी प्रवेशाची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. तरी इच्छुक पात्र लाभार्थ्यांनी शासकीय वसतिगृह प्रवेश योजनेचा लाभ घ्यावा, असेही सहायक आयुक्त समाज कल्याण विशाल लोंढे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments