कला, संस्कृती, गायन, वादन, नृत्य, संगीत, क्रीडा आणि पर्यटन विकास यांचा मनोहारी संगम असणारा ‘पुणे फेस्टिव्हल’ यंदा ३७ व्या वर्षात प्रवेश करीत आहे. हा सोहळा २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या कालावधीत दिमाखात साजरा होणार आहे.
यंदा पुणे फेस्टिव्हलच्या श्रींची प्रतिष्ठापना बुधवार, दि. २७ ऑगस्ट रोजी सकाळी १०.०० वाजता हॉटेल सारस, नेहरू स्टेडियम, पुणे येथे, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम सपत्नीक करतील. वेदमूर्ती पं. धनंजय घाटे गुरुजी पौरहित करत आहेत. या प्रसंगी पुणे फेस्टिव्हलच्या समितीतील सर्व मान्यवर सदस्य उपस्थित राहणार आहेत. या निमित्ताने हॉटेल सारस, नेहरू स्टेडियम येथे आकर्षक सजावट करण्यात आली आहे.


