Saturday, September 5, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुण्यातील १० पैकी ९ प्रोफेशनल्‍सचा विश्वास आहे की, एआय अधिक प्रगत होत...

पुण्यातील १० पैकी ९ प्रोफेशनल्‍सचा विश्वास आहे की, एआय अधिक प्रगत होत असले तरी मानवी क्षमतेला कोणताच पर्याय नाही

पुणे, २६ ऑगस्‍ट २०२५: एआय टूल्स अधिक प्रगत होत आहेत आणि कामाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वापरले जात आहेत, तरीही प्रोफेशनल्‍स एका मुद्दयावर स्पष्‍ट आहेत, ते म्‍हणजे मोठे निर्णय घेण्‍यासंदर्भात मानवी निर्णयाला अधिक प्राधान्‍य देतात. जगातील सर्वात मोठे प्रोफेशनल नेटवर्क लिंक्डइन (LinkedIn,)च्या नवीन संशोधनानुसार, भारतातील ८३ टक्‍के प्रोफेशनल्‍स आणि पुण्यातील ९२ टक्‍के प्रोफेशनल्‍सचा विश्वास आहे की निर्णय घेताना एआयपेक्षा क्षमता आणि विश्वासू सहकारी महत्त्वाचे आहेत. हे अशा वेळी निदर्शनास आले जेथे शहरातील ८२ टक्‍के प्रोफेशनल्‍स म्हणतात की कामाच्या ठिकाणी निर्णय घेण्याची गती वाढली आहे आणि ६७ टक्‍के प्रोफेशनल्‍सना वाटते की त्यांच्या पुढील करिअरसाठी एआयमध्ये प्रभुत्व मिळवणे आवश्यक आहे.

 

पुण्यातील ५ पैकी ४ प्रोफेशनल्‍सना मान्‍य करतात की एआयमध्‍ये प्रभुत्‍व मिळवणे हे दुसरे काम करण्‍यासारखे आहे, पण त्‍यांना त्‍याबाबत आशा आहे

 

वाढत्या अपेक्षा निश्चित आहेत. पुण्यातील ६१ टक्‍के प्रोफेशनल्‍स म्हणतात की एआयचे ज्ञान लवकर मिळत असल्‍याचे पाहून ते भारावून गेले आहेत आणि ५९ टक्‍के प्रोफेशनल्‍स मान्‍य करतात की ते एआयचा पूर्ण क्षमतेने वापर करत नाहीत. कंपन्‍यांमधील प्रमुख देखील स्‍तर उंचावत आहेत, जेथे ७६ टक्‍के कंपन्या कर्मचाऱ्यांनी एआय वापरण्याची अपेक्षा करतात आणि भारतातील ६४ टक्‍के अधिकारी कामगिरी पुनरावलोकनांमध्ये किंवा नियुक्‍तीमध्ये एआय प्रवीणतेचा समावेश करण्याची योजना आखत आहेत. परिणामी, पुण्यातील ८२ टक्‍के प्रोफेशनल्‍स नवीन एआय कौशल्ये शिकणे आता दुसऱ्या नोकरीसारखे वाटते. तरीही, बहुतांश (७८ टक्‍के) प्रोफेशनल्‍सना आशा आहे की एआयमुळे त्यांच्या दैनंदिन कामकाज जीवनात सुधारणा होईल.

 

उच्‍च मागणी असताना अल्‍गोरिदमपेक्षा मानवी ज्ञान उपयुक्‍त ठरते

 

पुण्यातील संपूर्ण भारतातील प्रोफेशनल्‍स निर्णय घेण्यासाठी नाही तर दैनंदिन काम जलद गतीने करण्यासाठी एआयचा वापर करत आहेत. लिंक्डइन संशोधनातून निदर्शनास आले आहे की, भारतातील ७५ टक्‍के प्रोफेशनल्‍सना एआय प्रत्यक्ष निर्णय घेण्यासाठी नाही तर लेखन आणि मसुदा तयार करण्यासाठी सर्वात उपयुक्‍त वाटते. जेव्हा गुंतागूंतीच्‍या निवडीसंदर्भात ७६ टक्‍के प्रोफेशनल्‍स म्हणतात की सहकारी आणि व्यवस्थापक त्यांना जलद व अधिक आत्मविश्वासाने निर्णय घेण्यास मदत करतात आणि भारतातील ८३ टक्‍के अधिकारी सहमत आहेत की व्‍यवसायासंदर्भात उत्तम निर्णय अजूनही मानवी निर्णयांवर अवलंबून आहेत. मानवी क्षमता दाखवत लिंक्डइनला या आर्थिक वर्षात टिप्पण्यांमध्ये (कमेंट्स) ३० टक्‍क्‍यांहून अधिक वाढ दिसण्‍यात आली, जेथे कर्मचारी दृष्टिकोनासाठी सहकाऱ्यांवर अवलंबून होते.

 

लिंक्‍डइन करिअर तज्ञ आणि भारतातील वरिष्‍ठ व्‍यवस्‍थापकीय संपादिका निरजिता बॅनर्जी म्‍हणाल्‍या, ”एआय सर्वोत्तम सह-पायलट आहे, पण आधारस्‍तंभ नाही. ते पर्याय तयार करू शकते, त्‍यामध्‍ये वर्गीकरण करू शकते, जलदगतीने सादर करू शकते, पण लक्षात घ्‍या की करिअर अजूनही तुमचे निर्णय, तुमचे नातेसंबंध आणि तुमच्‍या गाथेच्‍या ताकदीवर अवलंबून आहे. महत्त्वपूर्ण क्षणांमध्‍ये व्‍यक्‍ती टूलचा आधार घेत नाहीत तर विश्वासू व्‍यक्‍तीशी संपर्क साधतात. म्‍हणून, अर्थपूर्ण संबंध निर्माण करा, एआयचा वापर करून तुम्ही करू शकता अशा मानवी कामासाठी वेळ काढा. आणि तुम्ही हे सर्व करू शकत नाही, तेव्हा तुमच्या विश्वासू व्‍यक्‍तींवर अवलंबून राहा.”

 

प्रोफेशनल्‍स विकास आणि उज्‍ज्‍वल भविष्‍यासाठी स्‍वत: एआय शिकत आहेत

 

वाढता दबाव व अपेक्षा असूनही, पुण्यातील जवळजवळ १० पैकी नऊ (८६ टक्‍के) प्रोफेशनल्‍स म्हणतात की एआयचा प्रयोग करणे मजेदार आहे आणि ते दररोज नवीन गोष्‍टींची चाचणी घेण्यासाठी व शिकण्‍यासाठी एआयकडे संधी म्हणून पाहतात. दहापैकी जवळपास आठ (७९ टक्‍के) प्रोफेशनल्‍स मोफत संसाधनांसह स्वतः शिकत आहेत, ७३टक्‍के प्रोफेशनल्‍स स्‍वत:च्‍या खिशातून अभ्यासक्रमांसाठी पैसे देत आहेत आणि ७८ टक्‍के प्रोफेशनल्‍स सक्रियपणे शिकण्यासाठी उत्तम साधने आणि कन्‍टेन्‍ट शोधत आहेत.

 

तुमच्‍या नेटवर्कच्‍या माध्‍यमातून आत्‍मविश्वास कसा वाढवावा यासंदर्भात लिंक्‍डइन करिअर एक्‍स्‍पर्ट टिप्‍स:

 

१. तुम्‍हाला माहित नसलेल्‍या गोष्‍टींबाबत खुल्‍या मनाने सांगा

 

सर्व प्रश्नांची उत्तरे माहित नसणे ठीक आहे. विश्वासू सहकाऱ्यांशी किंवा मार्गदर्शकांशी संपर्क साधा आणि विशिष्ट प्रश्न विचारा, जसे ‘तुमच्या कामात एआय टूल्स वापरणे तुम्हाला कसे सोयीचे वाटले?’ किंवा ‘कोणत्या संसाधनांमुळे तुम्हाला सर्वात जास्त शिकण्यास मदत झाली?’ तुम्ही शोध घेत असलेल्‍या गोष्‍टींबाबत सांगितल्‍याने योग्‍य पाठिंबा आणि व्यावहारिक सल्ला मिळतो.

 

२. तुमच्‍या जवळच्‍या संपर्कात असलेल्‍या तज्ञांच्‍या मतांचे पालन करा आणि त्‍यामधून शिका

 

लिंक्डइनवर व त्‍यापलीकडे तुम्ही ज्यांना फॉलो करता आणि ज्‍यांच्याशी संवाद साधता त्यांचा विस्तार करा. एआय व करिअर वाढीबद्दल टिप्स आणि माहिती शेअर करणारे निर्माते, उद्योग नेते आणि समवयस्कांना शोधा. तुम्ही अर्पित भयानी आणि अंकुर वारीकू सारख्या टॉप व्हॉईसना फॉलो करू शकता किंवा स्टीव्हन बार्टलेट आणि गाय रॅझ सारख्या तज्ञांच्या विशेष कन्‍टेन्‍टसह नुकतेच लॉंच झालेले ‘शोज बाय लिंक्डइन’ पाहू शकता, ज्‍यामुळे एआय व नेतृतव यांसारख्‍या मोठ्या विषयांबाबत अद्ययावत राहता येईल आणि योग्‍य माहिती मिळेल.

 

३. स्‍वत:चे कौशल्‍य वाढवण्‍याची जबाबदारी घ्‍या

 

एकट्याने एआय कौशल्‍ये आत्‍मसात करता येत नसली तरी स्‍वत:हून विकासाची जबाबदारी घेतल्‍याने मदत होऊ शकते. Building Career Agility and Resilience in the Age of AI व Landing a Job as a Skills-First Candidate यासारख्‍या मोफत लिंक्‍डइन लर्निंग कोर्सेससह स्‍वत:च्‍या विकासाची जबाबदारी घ्‍या आणि स्‍वत:च्‍या गतीने शिका. तसेच ३० सप्‍टेंबर रोजी लिंक्‍डइनचे पहिलेच एआय इन वर्क डे चुकवू नका. या लाइव्‍ह इव्‍हेण्‍टमध्‍ये व्‍यावहारिक सल्‍ला, टिप्‍स आणि टूल्‍ससंदर्भात मार्गदर्शन मिळेल, ज्‍यामुळे तुम्‍हाला तुमच्‍या दैनंदिन कामामध्‍ये एआयचा वापर करण्‍यास मदत होईल. अधिक माहितीकरिता साइन अप करण्‍

यासाठी येथे क्लिक करा.

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments