Saturday, September 5, 2026
Google search engine
HomeUncategorizedआधार संच वितरण साठी अर्ज करण्याचे आवाहन

आधार संच वितरण साठी अर्ज करण्याचे आवाहन

पुणे, दि. 26 : माहिती व तंत्रज्ञान विभाग, मुंबई यांचे कडून पुणे जिल्ह्यास आधार संच प्राप्त झाले असून जाहिरातीत नमूद ठिकाणाकारीता आधार संच वितरणासाठी अर्ज करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

 

आधार संच जिल्ह्यातील पुढे नमुद ग्रामीण महसूल मंडळ व पिंपरी चिंचवड महानगर पालिका क्षेत्रात वितरण करणेकामी पात्र “आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी” जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत वेबसाइट www.pune.gov.in वर जाऊन अर्जाचा नमुना, पात्रतेचे निकष, प्रस्तावित आधार केंद्राबाबतची माहिती तसेच इतर आवश्यक माहिती डाऊनलोड करून घ्यावी.

 

इच्छुक आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रे 26 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर 2025 या कालावधीत सकाळी 11:00 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5:00 वाजेपर्यंत (शासकीय सुट्टीचे दिवस वगळून तसेच 1 सप्टेंबर 2025 रोजीची सुट्टी वगळून)

 

जिल्हाधिकारी कार्यालय, संजय गांधी योजना शाखा, ‘अ’ विंग, 4 था मजला, डॉ बाबासाहेब आंबेडकर मार्ग, पुणे येथे प्रत्यक्ष सादर करावे, असे जिल्हा प्रशासनामार्फत प्रसिद्धीपत्रकान्वये कळविण्यात आले आहे.

 

अर्ज भरण्याकरिता कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, याची नोंद घ्यावी.

 

00000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments