Saturday, September 5, 2026
Google search engine
HomeUncategorizedविश्वराज हॉस्पिटल लोणी मध्ये कॉक्लिअर इम्प्लांट सुविधा

विश्वराज हॉस्पिटल लोणी मध्ये कॉक्लिअर इम्प्लांट सुविधा

 

पुणे, २७ ऑगस्ट २०२५ – विश्वराज हॉस्पिटलने नुकतेच कॉक्लिअर इम्प्लांट सुविधा सुरु केली असून, प्रगत श्रवण आरोग्यसेवेच्या दिशेने हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. हॉस्पिटलमध्ये १४ ऑगस्ट २०२५ रोजी २ वर्षे ४ महिन्यांच्या गंभीर ऐकण्याच्या समस्येने त्रस्त असलेल्या एका बालकावर दोन्ही कानांवर कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली. शस्त्रक्रिया पूर्णपणे यशस्वी झाली असून,रुग्णाला कोणत्याही गुंतागुंतीशिवाय काल डिस्चार्ज देण्यात आला. शस्त्रक्रियेनंतर चौथ्या आठवड्यात इम्प्लांट सक्रिय केले जाईल, त्यानंतर मुलाला हळूहळू आवाज ओळखता येऊ लागेल. सातत्यपूर्ण स्पीच थेरपीच्या मदतीने, वैद्यकीय टीमला मुलामध्ये जवळजवळ सामान्य भाषिक विकास अपेक्षित आहे.

 

“हे यश आमच्या समर्पित टीमच्या सामूहिक प्रयत्नांचा परिणाम आहे,” असे विश्वराज हॉस्पिटल, लोणी येथील कान -नाक-घसा तज्ज्ञ आणि कॉक्लिअर इम्प्लांट सर्जन डॉ. मोनिका भगत यांनी सांगितले. “कॉक्लिअर इम्प्लांट हे ऐकण्याच्या समस्येने त्रस्त मुलांना आणि प्रौढांमध्ये नवी आशा निर्माण करत जीवनमान सुधारण्याची संधी देते.”

 

माईर्स एमआयटीच्या विश्वस्त व सहसचिव तसेच विश्वराज हॉस्पिटल लोणीच्या कार्यकारी संचालिका डॉ.आदिती कराड यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.यामध्ये वैद्यकीय संचालक डॉ.सुजित कुमार, सहायक वैद्यकीय अधीक्षक डॉ सचिन कातकडे, बालरोग तज्ञ व नवजात शिशु विभागाचे प्रमुख डॉ.चंद्रकांत सहारे, कामकाज प्रमुख राजेश पनवर, भूलतज्ज्ञ डॉ.विठ्ठल, डॉ. प्रतीक आणि डॉ.क्षितिज यांचा महत्त्वाचा सहभाग आहे.

 

डॉ. मोनिका भगत पुढे म्हणाल्या की, ७०% पेक्षा जास्त ऐकण्याची क्षमता नसलेल्या किंवा गमावलेल्या मुला-मुलींना व प्रौढांना हे इम्प्लांट सहज उपलब्ध करून देणे हे आमचे उद्धिष्ट आहे. लवकरच आम्ही आरबीएसके (राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम) योजनेसाठी मान्यता मिळवण्याचा प्रयत्न करीत आहोत. या योजनेअंतर्गत २ वर्षाखालील मुलांना मूलभूत कॉक्लिअर इम्प्लांटसाठी पूर्ण आर्थिक सहाय्य दिले जाते.

 

गंभीर ते अतिगंभीर श्रवण कमी झालेल्या आणि पारंपरिक हिअरिंग एडचा फायदा न होणाऱ्या व्यक्तींसाठी कॉक्लिअर इम्प्लांट हे जीवनमान बदलणारे उपकरण आ

हे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments