Thursday, September 3, 2026
Google search engine
HomeUncategorizedदगडूशेठ' गणपतीसमोरील अथर्वशीर्ष पठण उपक्रमाचा जागतिक विक्रम*  ग्लोबल बुक ॲाफ एक्सलेंस,...

दगडूशेठ’ गणपतीसमोरील अथर्वशीर्ष पठण उपक्रमाचा जागतिक विक्रम*  ग्लोबल बुक ॲाफ एक्सलेंस, इंग्लंड ; तब्बल ३५ हजार २१५ महिलांच्या अथर्वशीर्ष पठण उपक्रमाची नोंद

 

 

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने ऋषिपंचमीनिमित्त दरवर्षी आयोजित करण्यात येत असलेल्या सामुदायिक अथर्वशीर्ष पठण उपक्रमाचा जागतिक विक्रम झाला आहे. तब्बल ३५ हजार २१५ महिलांच्या अथर्वशीर्ष पठण उपक्रमाची नोंद ग्लोबल बुक ॲाफ एक्सलेंस, इंग्लंड मध्ये झाली आहे.

 

ट्रस्टच्या वतीने सुरु असलेल्या १३३ व्या वर्षीच्या गणेशोत्सवात जागतिक विक्रमाचे प्रमाणपत्र ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्स, इंग्लंड उपाध्यक्ष डॉ. दीपक हरके यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट चे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांना प्रदान केले. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी म्हणाले, दरवर्षी ओम गं गणपतये नमः:… ओम नमस्ते गणपतये… मोरया, मोरया… च्या जयघोषात तब्बल ३५ हजार महिला एकत्र येत हा उपक्रम राबविला जातो. उर्जेने भारलेल्या वातावरणामध्ये हजारो महिलांच्या गर्दीचा उच्चांक गणपती बाप्पा समोर पाहायला मिळतो. यामध्ये पुण्यासह संपूर्ण जगभरातून महिला सहभागी होतात, हे याचे वैशिष्ट्य असून यावेळी स्त्री शक्तीचा जागर होत असतो. उपक्रमाचे यंदा ४० वे वर्ष असून यंदा मिळालेला हा सन्मान आनंदादायी असल्याचे त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments