पुण्याच्या बिबवेवाडी परिसरातील गंगाधाम जवळील चोरडिया मैदानात ३७व्या पुणे फेस्टिव्हल अंतर्गत डर्ट ट्रॅक स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. यामध्ये विविध गटांमध्ये २२५ हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये पुण्या बरोबरच कोल्हापूर, नाशिक, सातारा, अहिल्यानगर येथिल स्पर्धकांनी देखील भाग घेतला होता. त्यात नोविस क्लास, मॉडिफाइड बाइक्स १२५ cc, २५०cc, ३५०cc महिला गट व स्कूटर गट हे गट होते. पुणे फेस्टिव्हलचे मुख्य संयोजक अॅड. अभय छाजेड यांनी झेंडा फडकावून या स्पर्धेस प्ररंब केला.
रोडीज अॅडव्हेन्चर तर्फे अमरेंद्र साठे यांनी याचे आयोजन करण्यात आले होते. फेडरेशन ऑफ मोटर्स स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया यांनी या स्पर्धेस मान्यता दिली होती. सायंकाळी चोरडिया इन्फ्रास्ट्रक्चरचे नितीन चोरडिया यांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभ पार पडला.


