हुजूरपागा कात्रज शिशुमंदिर शाळेत उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात आला. ढोलताशांच्या गजरात गणपती बाप्पांचे स्वागत व रोज आरती करण्यात आली. फुलांची आरास केली होती. मुख्याध्यापिका श्रीमती नम्रता मेहेंदळे यांच्या हस्ते गणपतीच्या मूर्तीचे पूजन व आरती करण्यात आली. शिक्षिका श्रीमती अमृता पाटील यांनी गणेशोत्सवाची माहिती सांगितली. विद्यार्थिनींनी गणपतीचे श्लोक तसेच गणपतीची गाणी म्हंटली. छोटया गटातील विद्यार्थिनीनी ‘गणपतीच्या गाण्यावर नृत्य सादर केले. तसेच गणपतीची गोष्ट सांगितली. गणेशोत्सव निमित्ताने शाळेमध्ये विद्यार्थिनीसाठी गणपती स्तोत्र व गणपती श्लोक पाठांतर स्पर्धेचे आयोजन केले होते. मंगलमय वातावरणामध्ये गणेशोत्सव साजरा करण्यात आला. गणरायास निरोप देताना विद्यार्थिनी भूक झाल्या होत्या.


