मुंबई, ८ सप्टेंबर २०२५: ग्राहक-केंद्रित लाभ आणि प्रत्येक टचपॉइण्टवर उत्साहवर्धक अनुभव देण्याप्रती आपल्या अविरत कटिबद्धतेशी बांधील राहत टोयोटा किर्लोस्कर मोटर (टीकेएम)ने आज घोषणा केली की, कंपनी ग्राहकांना नुकतेच जाहीर करण्यात आालेल्या जीएसटी दरामधील कपातीचे संपूर्ण फायदे देणार आहे. सुधारित किमती २२ सप्टेंबर २०२५ पासून लागू होतील.
ही घोषणा करत सेल्स-सर्विस-युज्ड कार बिझनेस अँड प्रॉफिट एन्हान्समेंटचे उपाध्यक्ष वरिंदर वाधवा म्हणाले, ”आम्ही या महत्त्वपूर्ण सुधारणेसाठी भारत सरकारचे मनापासून आभार व्यक्त करतो. यामुळे ग्राहकांसाठी किफायतशीरपणामध्ये वाढ झाली असून ऑटो क्षेत्रात एकूणच आत्मविश्वास देखील वाढला आहे. सणासुदीच्या काळापूर्वी आम्हाला अपेक्षा आहे की हा पुढाकार उत्तम गतीसोबत मागणीला देखील आणखी चालना देईल.
पारदर्शक व ग्राहक-केंद्रित कंपनी म्हणून आम्हाला ग्राहकांना हे फायदे देण्याचा आनंद होत आहे. आम्ही जागतिक दर्जाचे गतीशीलता सोल्यूशन्स अधिक सहजसाध्य करण्याप्रती कटिबद्ध आहोत आणि अशा सुधारणांचे स्वागत करतो, जे मागणीला गती देतील, सर्वांसाठी गतीशीलता उपलब्ध करून देतील आणि ग्राहकांना आनंदित करतील, तसेच भारताच्या शाश्वत व सर्वसमावेशक विकासाप्रती योगदान देखील देतील.”
टोयोटाच्या वेईकल्समध्ये संभाव्य किंमत कपात पुढीलप्रमाणे:
मॉडेल
किंमतीमध्ये कपात
ग्लाण्झा
जवळपास ८५,३०० रूपये
टायसर
जवळपास १,११,१०० रूपये
रूमियन
जवळपास ४८,७०० रूपये
हायरायडर
जवळपास ६५,४०० रूपये
क्रिस्टा
जवळपास १,८०,६०० रूपये
हायक्रॉस
जवळपास १,१५,८०० रूपये
फॉर्च्युनर
जवळपास ३,४९,००० रूपये
लीजेण्डर
जवळपास ३,३४,००० रूपये
हायलक्स
जवळपास २,५२,७०० रूपये
कॅमरी
जवळपा
स १,०१,८०० रूपये
वेलफायर
जवळपास २,७८,००० रूपये


