पुणे, १३ सप्टेंबर २०२५: पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस करंडक बॅडमिंटन साखळी स्पर्धेत साखळी फेरीत किड्स गटात जेस, सीगल्स या संघानी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी सलामी दिली.
पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या बॅडमिंटन कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत सलामीच्या लढतीत जेस संघाने फिंच संघाचा 3-2 असा संघर्षपूर्ण पराभव केला. जेस संघाकडून प्रिशा पटवर्धन, ईशान जोशी, रीत जालन, क्रिशव नाटेकर यांनी सुरेख कामगिरी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
दुसऱ्या सामन्यात सीगल्स संघाने रॉबिन्स संघाचा 3-1 असा पराभव करून शानदार सुरुवात केली. विजयी संघाकडून अर्जुन बाहुलीकर, रोहीन लागू, शिवांश नाडगोंडे, आनंदिनी त्रिमल, आनंदी बेडेकर, इरा पाटील यांनी अफलातून कामगिरी केली.
निकाल: साखळी फेरी: किड्स गट:
जेस वि.वि.फिंच 3-2(एकेरी 1: प्रिशा पटवर्धन वि.वि.विहान सोमण 15-05, 15-02; खुला दुहेरी 1: अन्वित राजवाडे/क्रिशय दहिभाते पराभुत वि. निरण भुरट/शनाया चाफळकर 07-15, 07-15; खुला दुहेरी 2: ईशान जोशी/रीत जालन वि.वि. आरव श्रॉफ/रियान कुंकूलोळ 15-12, 15-14; मुली दुहेरी: रिया चितळे/रिधिमा दिवेकर पराभुत वि.आरिका पत्की/अनयशा चाफळकर 09-15, 08-15; एकेरी 2: क्रिशव नाटेकर वि.वि.शिवान कुंकूलोळ 11-09, 11-05);
सीगल्स वि.वि.रॉबिन्स 3-1((एकेरी 1: अनय इंगळहळीकर पराभुत वि. आर्यन गाडगीळ 04-15, 11-15; खुला दुहेरी 1: अर्जुन बाहुलीकर/रोहीन लागू वि.वि. विवान ओगळे/शंतनू चिरपुटकर 15-07, 15-10; खुला दुहेरी 2: शिवांश नाडगोंडे/आनंदिनी त्रिमल वि.वि.सामायरा मेहता/रिषभ बेडेकर 15-07, 08-15, 15-14; मुली दुहेरी: आनंदी बेडेकर/इरा पाटील वि.वि.सामायरा मेंगळे/मीरा आजगांवकर 15-08, 15-05).


