Monday, August 31, 2026
Google search engine
HomeUncategorizedरोजगाराची सुवर्णसंधी 17 सप्टेंबर रोजी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन

रोजगाराची सुवर्णसंधी 17 सप्टेंबर रोजी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन

पुणे दि. 15 (जिमाका, वृत्त सेवा) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे व लॉनिंग एज्युकेशन इन्स्टिट्युट कौशल्य विकास संस्था,सासवड यांच्या संयुक्‍त विद्यमाने 17 सप्टेंबर 2025 रोजी लॉगिन पॅरामेडिकल कॉलेज आदित्य कॉम्प्लेक्स, हडको रोड,सासवड येथे सकाळी 10 वाजता, “प्लेसमेंट ड्राइव्ह”चे आयोजन करण्यात आले आहे.

 

पुरंदर तालुका परिसरातील विविध उद्योजकांनी सदर प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये सहभाग दर्शविलेला असून, त्यांच्याकडून 300 पेक्षा जास्त रिक्तपदे कळविण्यात आलेली आहेत. ही सर्व रिक्तपदे किमान 10 वी,12 वी, पदवीधर, मशिन ऑपरेटिंग, प्रोडक्श, क्लर्क, ओटी टेक्निशियन, मामा, मावशी, नर्स, ब्रदर्स, रेसेपनिस्ट, ट्रेनी अशा विविध पात्रताधारक उमेदवारांसाठी असून पुणे जिल्हयातील जास्तीत जास्त नोकरीइच्छुक उमेदवारांना या प्लेसमेंट ड्राईव्हच्या माध्यमातून नोकरीच्या विविध संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.

 

मेळाव्यामध्ये सहभागी होण्याकरिता इच्छुक उमेदवारांनी कौशल्य विकास विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटला भेट देऊन रिक्त पदांना ऑनलाइन अॅप्लाय करणे आवश्यक आहे. नोकरीइच्छूक उमेदवारांनी विहीत दिनांकास प्लेसमेंट ड्राइव्हच्या ठिकाणी उपस्थित राहणे तसेच मुलाखतीस येताना आपल्या सर्व शैक्षणिक कागदपत्रांच्या छायांकित प्रती, पासपोर्ट साईज फोटो, आवश्यकतेनुसार बायोडाटा अर्जाच्या (Resume) प्रती सोबत आणणे गरजेचे आहे.

 

अधिक माहितीकरिता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र पुणे, 481 रास्ता पेठ, पुणे येथे कार्यालयीन वेळेमध्ये प्रत्यक्ष अथवा 020 26133606 या दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन सु. रा. वराडे, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे यांनी केले आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments