प्रत्येकी 2 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी 718 रुपये ते 754 रुपये पर्यंतचा (“इक्विटी शेअर्स”) किंमतपट्टा निश्चित.
· बोली/ऑफर सोमवार, 22 सप्टेंबर 2025 रोजी खुली होईल आणि बुधवार, 24 सप्टेंबर 2025 रोजी बंद होईल (“Bid Dates”). प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीचा दिनांक शुक्रवार, 19 सप्टेंबर 2025 आहे.
· बोली किमान 19 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 19 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल. (“No of Bids”)
· RHP लिंक:
https://www.motilaloswalgroup.com/Docsvirdir/1222021330Atlanta%20Electricals%20Limited_RHP.pdf
अटलांटा इलेक्ट्रीकल्स लिमिटेड (“Atlanta” किंवा “द कंपनी ”) कंपनी प्राथमिक समभाग विक्रीसाठीची बोली/ऑफर सोमवार 22 सप्टेंबर 2025 पासून सुरू करणार आहे.
एकूण ऑफर साईज मध्ये प्रत्येकी 2 रुपये दर्शनी मूल्याच्या 6,873 दशलक्ष रु. [687 कोटी रु.] (“एकूण ऑफर साईज”) किंमतीच्या इक्विटी शेअर्सचा समावेश आहे. त्यामध्ये 4,000 दशलक्ष रु. [400 कोटी रु.] पर्यंतचे फ्रेश इश्यू आणि 2,873 दशलक्ष रु. [287 कोटी रु.] मूल्याच्या ऑफर फॉर सेलचा समावेश आहे.
प्रति इक्विटी शेअरसाठी 718 रुपये ते 754 रुपये पर्यंतचा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. (“The Price Band”).
प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीचा दिनांक शुक्रवार, 19 सप्टेंबर 2025 आहे. बोली/ऑफर बुधवार, 24 सप्टेंबर 2025 रोजी बंद होईल. बोली किमान 19 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 19 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल. (“Bid Details”)
कंपनीचा फ्रेश इश्यूमधून मिळणाऱ्या निव्वळ निधीचा उपयोग पुढीलप्रमाणे करण्याचा प्रस्ताव आहे: (i) साधारण 791.2 दशलक्ष रु. [79 कोटी रु.] एवढ्या कंपनीने घेतलेल्या काही प्रलंबित कर्जाचे पूर्ण किंवा काही प्रमाणात आगाऊ परतफेड/नियोजित परतफेड करण्यासाठी, नवीन तंत्रज्ञान विकास आणि क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर यासाठी खर्च, अंदाजित रक्कम 791.2 दशलक्ष रु. [79 कोटी रु.], (ii) कंपनीच्या अंदाजे 2,100 दशलक्ष रु. [210 कोटी रु.] एवढ्या खेळत्या भांडवलाच्या निधीसाठी (iii) आणि उर्वरित रक्कम सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्दिष्टांसाठी. (“ऑफरचा उद्देश”)
3,810,895 पर्यतच्या इक्विटी शेअर्सच्या ऑफर फॉर सेल मध्ये अटलांटा UHV ट्रान्सफॉर्मर्स LLP यांच्याद्वारे 435,900 पर्यतचे इक्विटी शेअर्स (“प्रवर्तक विक्री समभागधारक”), हेमांग हरेंद्र शहा यांच्याकडून 666,560 पर्यतचे इक्विटी शेअर्स, निमिष हरेंद्र शहा यांच्याकडून 777,185 पर्यतचे इक्विटी शेअर्स, धवल हर्षदभाई मेहता यांच्याकडून 217,500 पर्यतचे इक्विटी शेअर्स (अवनी धवलभाई मेहता यांच्याबरोबर संयुक्तरित्या), गीताबेन हर्षदभाई मेहता यांच्याकडून 326,250 पर्यतचे इक्विटी शेअर्स (हर्षदभाई अमृतलाल मेहता यांच्याबरोबर संयुक्तरित्या) आणि जिग्नेश सुर्यकांत पटेल यांच्याकडून 1,387,500 पर्यतचे इक्विटी शेअर्स (“इतर विक्री समभागधारक”)समावेश आहे.
हे इक्विटी शेअर्स कंपनीच्या दिनांक 16 सप्टेंबर 2025 रोजीच्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (“RHP”) द्वारे सादर करण्यात येत असून मुंबईत रजिस्ट्रार ऑफ कंपनीज, महाराष्ट्र (“RoC”) यांच्याकडे दाखल करण्यात आले आहेत.
कंपनीचे रेड हेअरिंग प्रोस्पेक्टस द्वारे हे इक्विटी शेअर्स बीएसई लिमिटेड (“BSE”) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“NSE”) वर सूचीबद्ध करण्याचे प्रस्तावित आहे. (“Listing Details”)
मोतीलाल ओसवाल इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायझर्स लिमिटेड आणि ॲक्सिस कॅपिटल लिमिटेड हे या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स (“BRLMs”) आहेत.
येथे वापरल्या गेलेल्या परंतु परिभाषित न केलेल्या सर्व कॅपिटलाइज्ड शब्दांचा अर्थ आरएचपी मध्ये नमूद केल्यासारखाच असेल.
ही ऑफर 1957 च्या SCRR, च्या नियम 19(2)(b) आणि SEBI ICDR नियम 31 च्या अनुषंगाने केली जात आहे. ही ऑफर बुक बिल्डिंग प्रक्रियेच्या माध्यमातून केली जात असून, SEBI ICDR सुधारित नियम 6(1) च्या नियमनात आहे. त्या अंतर्गत SEBI ICDR नियमांनुसार, ऑफरच्या 50% पेक्षा जास्त नसलेला भाग पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (“QIBs” आणि तो हिस्सा “QIB Portion”) प्रमाणबद्ध वाटपासाठी उपलब्ध असेल. तथापि आपली कंपनी, BRLMs सोबत सल्लामसलत करून, SEBI ICDR नियमांनुसार विवेकाधीन आधारावर QIB Portion पैकी 60% पर्यंत हिस्सा प्रमुख गुंतवणूकदारांसाठी (“Anchor Investor Portion”) वाटप करू शकते. त्यापैकी किमान एक तृतीयांश हिस्सा देशांतर्गत स्थानिक म्युच्युअल फंडांसाठी उपलब्ध राहील. त्यासाठी स्थानिक म्युच्युअल फंडांकडून प्रमुख गुंतवणूकदार वाटप किंमतीच्या बरोबरीने किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीसाठी वैध बोली प्राप्त व्हायला लागतील. जर प्रमुख गुंतवणूकदार भागामध्ये कमी सदस्यता किंवा वाटप न झाल्यास, उर्वरित इक्विटी शेअर्स नेट QIB Portion मध्ये समाविष्ट केले जातील.
ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास QIB च्या एकूण हिश्शापैकी 5 % फक्त म्युच्युअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध असतील आणि QIBचा उर्वरित हिस्सा म्युच्युअल फंडांसह अन्य सर्व QIB बोलीधारकांसाठी उपलब्ध करून दिला जाईल. तथापि, जर म्युच्युअल फंडांकडून एकूण मागणी QIB Portion च्या 5% पेक्षा कमी असेल, तर म्युच्युअल फंड भागात वाटपासाठी उपलब्ध असलेले उर्वरित इक्विटी शेअर्स उरलेल्या QIB Portion मध्ये समाविष्ट करून QIBs साठी प्रमाणात वाटप केले जाईल.
यानंतर, SEBI ICDR नियमांनुसार ऑफरपैकी किमान 15% वाटप नॉन-इन्स्टिट्युशनल बिडर्स साठी उपलब्ध असेल बिगर संस्थात्मक भागापैकी एक तृतीयांश भाग बिगर संस्थात्मक बोली लावणारे (“NIBs”) (“बिगर संस्थात्मक भाग”) यांच्यासाठी उपलब्ध असेल. त्यापैकी एक तृतीयांश भाग 0.20 दशलक्ष रु. पेक्षा जास्त आणि 1.00 दशलक्ष रु. पर्यंत अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल आणि दोन तृतीयांश भाग 1.00 दशलक्ष रु.पेक्षा अधिक अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल. अर्थात त्यासाठी सेबी आयसीडीआर निर्देशांनुसार वर नमूद केलेल्या कोणत्याही उप-श्रेणीतील सबस्क्राईब नसलेला भाग दुसऱ्या इतर उप-श्रेणीतील गुंतवणूकदारांना वाटप केलेला असू शकतो. ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास हे लागू होईल. ऑफरपैकी किमान 35% वाटप रिटेल इंडिव्हिज्युअल बिडर्स साठी उपलब्ध असेल. ऑफर प्राईसच्या बरोबर किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीवर वैध बोली प्राप्त झाल्या असतील तर हे लागू होईल.
येथून पुढे, पात्र कर्मचाऱ्यांसाठी राखीव असलेल्या कर्मचारी आरक्षण भागांतर्गत अर्ज करणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना त्यांची वैध बोली ऑफर किंमती एवढी किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास इक्विटी शेअर्सचे प्रमाणात वाटप केले जाईल. प्रमुख गुंतवणूकदारांखेरीज (Anchor Investors) सर्व संभाव्य गुंतवणूकदारांनी आपापल्या ASBA खात्यांचा तपशील आणि यूपीआय अर्जदारांसाठी यूपीआय आयडीसह जाहीर करून अर्जाची विहित रक्कम अॅप्लीकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक अमाऊंट (“ASBA”) प्रक्रियेद्वारे करून ठेवणे बंधनकारक आहे. त्यानुसार योजनेत सहभागी करून घेण्यासाठी सर्व बोली रकमा या सेल्फ सर्टिफाइड सिंडिकेट बँक्स एससीएसबीतर्फे किंवा यूपीआय यंत्रणे अंतर्गत स्पॉन्सर बँकेतर्फे ब्लॉक करून ठेवण्यात येतील. प्रमुख गुंतवणूकदारांना त्यांच्यासाठीच्या हिश्शात “ASBA” प्रक्रीयेनुसार सहभागी होण्याची परवानगी नाही. अधिक माहितीसाठी पृष्ठ क्र. 395 वरील “ऑफर प्रक्रिया” (Offer Procedure) पाहा.


