Monday, August 31, 2026
Google search engine
HomeUncategorizedश्री देवी चतुःशृंगी मंदिर ट्रस्ट असा असेल या...

श्री देवी चतुःशृंगी मंदिर ट्रस्ट असा असेल या वर्षीचा नवरात्रौत्सव 2025

 

1) यंदाचा नवरात्र उत्सव 22 सप्टेंबर 2025 ते 2 ऑक्टोबर 2025 पर्यंत आहे.

पुराणातील मान्यतेनुसार देवी असुरांशी अहोरात्र 9 दिवस युध्द करते त्यामुळे देवीची या नवरात्र उत्सव साजरा करण्याची प्रथा सुरू झाली आहे. या नवरात्र उत्सवात भाविक देवीची सेवा करतात व दर्शनाला येतात. म्हणुन प्रथा आणि परंपरेनुसार मागील अनेक वर्षापासुन चतुःशृंगी देवीचे मंदिर नवरात्र उत्सवाच्या काळात अहोरात्र भाविकांच्या दर्शनासाठी खुले असते. तसेच नवरात्र उत्सवात प्रथा आणि परंपरेनुसार यात्रा भरविली जाते या यात्रेमधील सर्व स्टॉल्स / दुकाने ही पण अहोरात्र भाविकांच्या सेवेसाठी खुली असतात. हा नवरात्र उत्सव अशा पध्दतीने प्रथा आणि परंपरेनुसार श्री चतुःशृंगी मंदिर ट्रस्टतर्फे मागील 100 वर्षापासुन साजरा केला जात आहे. यावर्षी श्री रविंद्र अनगळ मंदिर व्यवस्थापक विश्वस्त यांच्या हस्ते घटस्थापना सोमवार दि. 22/09/25 सकाळी 8.30 वाजता यावेळेस होईल. त्यानंतर देवीला अभिषेक, रूद्राभिषेक करून देवीला महावस्त्र अर्पण करून महापूजा, करण्यात येईल व याचे पौरोहित्य श्री. श्रीराम नारायण कानडे गुरूजी हे करणार आहेत.

 

2) दररोज सकाळी 10 व रात्री 8 वा. महाआरती करण्यात येईल. त्या दोन्ही वेळेस शंखनाद पथकाव्दारे शंखनाद करण्यात येईल.गणपती मंदिरात दररोज भजन, किर्तन, प्रवचन होईल. तसेच मंदिर परिसरात एक दिवस आजीबाईचा भोंडलाही आयोजित केला आहे. श्रीसुक्त, ललितासहस्त्रनाम, महिषासुर मर्दिनी स्त्रोत्र व वेदपठण यावेळेस मुख्य देवीच्या मंदिरात करण्याची योजना आहे.

 

3) गोखलेनगर मधील सुयोग मित्र मंडळाच्या वतीने निवारा वृद्धाश्रमातील महिलांसाठी ‘आजीबाईंचा भोंडला’ हा विशेष कार्यक्रम शनिवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता आयोजित करण्यात येईल.

 

4) बुधवार दि. 01/10/25 रोजी सायं 7.00 वाजता नवचंडी होम होणार आहे.

 

5) दस-याच्या दिवशी गुरूवार दि. 02/10/25 सायं 5 पासून सिमोल्लंघनाची पालखी मंदिरापासून बँड, ढोल, लेझीम, नगारा, चौघडा, भुत्ये, वाघ्या मुरळीसह, देवीच्या सेवेक-यांचा सहभाग. हेलिकॉप्टरमधून देवीच्या पालखीवर पुष्पवृष्टी. यंदा पालखीच्या मिरवणुकीत कलावंत हे ढोल ताशाचे पथक हे प्रमुख आकर्षण राहणार आहे. मराठी सिनेसृष्टितील कलावंताचे हे पथक आहे. तसेच शंखनाद पथकाव्दारे शंखनाद करण्यात येईल.

 

6) मंदिराच्या जिर्णोध्दाराचे काम सुरू झाले असुन सभामंडपाचे साधारणपणे 80% बांधकाम पुर्ण त्वास आले आहे. उर्वरित बांधकाम व परिसराचे सुशोभिकरण पुढील 12 महिन्यात पुर्ण करण्याचा संस्थेचा मानस आहे. मुख्य मंदिरातील सभामंडपाचे काम पुर्ण झाले नसले तरी भाविकांना देवीचे व्यवस्थित दर्शन घेता येईल तसेच नविन सभामंडप पुर्वीच्या सभामंडपापेक्षा दुपटीने मोठा झाला असुन सभामंडपात प्रवेश केल्यावरोवर भाविकांना देवीचे दर्शन होईल.

 

7) पुजा साहित्य, लहान मुलांची खेळणी, कपडे, महिलांसाठी दागिने कपडे, गृहपयोगी वस्तु, फोटो, मसाले, खाण्यापिण्याचे पदार्थ यांच्या स्टॉलची रेलचेल .

 

8) भाविकांच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक, स्वयंसेवक, पोलिसदल, निमलष्करी दल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच संपुर्ण मंदिर परिसरात जागोजागी सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

 

9) आपत्ती व्यवस्थापन सहाय्यासाठी अनिरूध्द सेवा केंद्राचे (डीएमव्ही) डिझास्टर मॅनेजमेंट वॉलेंटियर 150 स्वयंसेवक तैनात केले आहेत.

 

10) भाविकांच्या आरोग्यासाठी संपुर्ण परिसरात जंतुनाशके तसेच किटकनाशकांची फवारणी करण्यात आली आहे.

 

11) ग्रीन हिल्स गुपच्या सहकार्याने देवस्थान ट्रस्टने देवळामागील डोंगरावर झाडे लावली असुन त्यांची उत्कृष्टरीत्या जोपासना केली आहे त्यास लागणा-या खताची निर्मीती देवीला वाहिलेल्या फुलांच्या निर्माल्यापासुन करण्यात येते. तसेच मंदिर परिसरातील विहिरीतुन झाडांसाठी पाण्ञ्जी पुरवले जाते.

 

12) अग्निशामक दलाची गाडी (घटस्थापना ते दस-यापर्यंत) मंदिर परिसरात ठेवण्यात आली आहे.

 

13) देवस्थान ट्रस्टतर्फे भाविकांसाठी cardiac ambulance ची सोय करण्यात आली आहे. तसेच 24 तास 4 डॉक्टर व सपोर्ट स्टाफ असा गुप भाविकांच्या सेवेला असणार आहेत. तसेच महानगरपालिकेतर्फे स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान राबविण्यात येणार आहे. वैद्यकीय अत्यावश्यकता पडल्यास औषधोपचार मोफत दिले जाणार आहेत.

 

14) पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या मैदानावर विनामूल्य पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. पॉलिटेक्निक मैदान ते मंदिरापर्यंत भाविकांना आणण्यासाठी ई रिक्शा/गोल्फ कार्टची व्यवस्था देवस्थानतर्फे यंदाच्या वर्षी प्रथमच करण्यात आली आहे.

 

15) भाविकांना देवीचे सुलभ दर्शन व्हावे यासाठी संपुर्ण बॅरिकेटींग सह रांगांची व्यवस्था करण्यात आली आहे.

 

16) मंदिर व परिसरात सुशोभिकरण करण्यात आले आहे.

 

17) मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच 24 तास जनरेटरची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

 

18) सर्व भाविकांचा यात्रेसह संपूर्ण वर्षाचा रूपये दोन कोटीचा विमा करण्यात आला आहे. कोणतीही दुर्घटना घडल्यास दुर्घटनाग्रस्त भाविकांना विम्याचे कवच देण्यात आले आहे.

 

19) देवस्थान ट्रस्टनी भाविकांसाठी ऑनलाईन दर्शन पासची व्यवस्था केलेली आहे. तसेच मंदिर परिसरात देखील ऑफलाईन दर्शन पासेस वितरणासाठी तीन काऊंटरची व्यवस्था करण्यात आलेली आहे. ऑनलाईन दर्शन पाससाठी www.chatushrungidevi.com या वेबसाईटवर भाविकांना ऑनलाईन पास मिळु शकतील.

 

संपर्क : श्री अमित अनगळ, अध्यक्ष 9763033808 श्री श्रीकांत अनगळ, कार्यकारी विश्वस्त 9921627937

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments