Monday, August 31, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत ३९ वाहनांचा जाहीर ई-लिलाव

पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत ३९ वाहनांचा जाहीर ई-लिलाव

पुणे दि.१९ : मोटार वाहन कर न भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्यांतर्गत अटकावून ठेवलेल्या ३९ वाहनांचा जाहीर ई-लिलाव पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत ३० सप्टेंबर रोजी सकाळी १० ते सायं. ६ वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात येणार आहे.

 

लिलाव करण्यात येणारी वाहने प्रादेशिक परिवहन कार्यालय, हडपसर बस डेपो, राजंणगाव पोलीस स्टेशन, शेवाळवाडी बस डेपो, आवारात २० ते २६ सप्टेंबर दरम्यान कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत पाहणी करण्यासाठी उपलब्ध आहेत. लिलावाच्या तारखेपर्यंत वाहन कर भरण्याची संधी राहणार आहे. लिलावाचे अटी व नियम १९ सप्टेंबरपासून कार्यालयाच्या सूचना फलकावर उपलब्ध असतील. ही वाहने ‘जशी आहेत तशी’ या तत्वावर जाहीर ई-लिलावाद्वारे विकली जातील.

 

कोणतेही कारण न देता ई-लिलाव रद्द करण्याचे अथवा तहकुब ठेवण्याचे अधिकार उपप्रादेशिक परिवहन अधिकारी तथा कराधान प्राधिकारी यांच्याकडे राखून ठेवण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे यांनी कळविले आहे.

 

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments