Monday, August 31, 2026
Google search engine
HomeUncategorizedपीएनजी ज्वेलर्सचा भव्य उत्सवी विस्तार नवरात्री २०२५ मध्ये ६ नवीन...

पीएनजी ज्वेलर्सचा भव्य उत्सवी विस्तार नवरात्री २०२५ मध्ये ६ नवीन दालन आणि ४ शॉप-इन-शॉप दालनांचे उद्घाटन

पुणे, २२ सप्टेंबर २०२५: परंपरा, प्रगती आणि ग्राहकांचा विश्वास यांचा अद्भुत उत्सव साजरा करताना, १९३ वर्षांचा वारसा असलेला शुद्धता आणि कारागिरीसाठी प्रसिद्ध असलेला भारतातील दागिन्यांचा ब्रँड “पीएनजी ज्वेलर्स“ या नवरात्रीत आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठणार आहे. “पीएनजी ज्वेलर्स” तब्बल ६ स्वतंत्र दालने आणि ४ “लाइटस्टाईल”चे शॉप-इन-शॉप काऊंटर सुरु करणार असून, या भव्य विस्तारामुळे महाराष्ट्र आणि मध्य भारतातील “पीएनजी ज्वेलर्स”ची उपस्थिती अधिक बळकट होणार आहे.

 

नवरात्री हा भक्ती, समृद्धी आणि नावीन्यतेचा उत्सव असून, याच काळात पीएनजी ज्वेलर्स आपल्या परंपरेला आधुनिकतेच्या नजाकतीसोबत जोडत नवीन बाजारपेठांमध्ये प्रवेश करत आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, लखनऊ, कानपूर आणि नागपूरसह प्रमुख शहरांमध्ये होणाऱ्या या दालनांचे उद्घाटन पीएनजी ज्वेलर्सच्या इतिहासातील सर्वात मोठ्या आणि वेगवान विस्तार मोहिमांपैकी एक ठरणार आहे.

 

या अभूतपूर्व मोहिमेचे औचित्य साधून पीएनजी ज्वेलर्स नवीन दालनांमध्ये सोन्याच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर ५०% पर्यंत सवलत आणि हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर १००% पर्यंत सवलत देत आहे. तसेच नवीन लाइटस्टाईल शॉप-इन-शॉपला भेट देणाऱ्या ग्राहकांना लाइटस्टाईल दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर ५०% पर्यंत सवलतीचा लाभ मिळणार आहे.

 

या मोहिमेबद्दल बोलताना, पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, डॉ. सौरभ गाडगीळ म्हणाले,“या नवरात्रीत आम्ही केवळ उत्सव साजरा करत नाही आहोत, तर पिढ्यानपिढ्या ग्राहकांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास आणि प्रेमाचाही सन्मान करत आहोत. या नवरात्रीत १० ठिकाणी दालन सुरु करणे ही आमच्यासाठी ऐतिहासिक घटना आहे. यामधून आम्ही शुद्धता, कारागिरी आणि नाविन्य या आमच्या मूळ मूल्यांशीही प्रामाणिक राहत आमच्या ग्राहकांसोबत नाते अधिक घट्ट करत आहोत. पीएनजी ज्वेलर्सच्या दालनांसोबतच लाइटस्टाईल शॉप-इन-शॉप काऊंटर सुरु करून आम्ही प्रत्येक पिढीला साजेसा खरेदी अनुभव देत आहोत.

 

लाइटस्टाईल शॉप-इन-शॉपमुळे तरुणाईला आधुनिकतेसोबतच आपली परंपरा जपता येणार आहे. लाइटस्टाईल आपल्या परंपरेला आधुनिकतेची झळाळी देत, ग्राहकांना परंपरा आणि ट्रेंडचा मिलाफ असलेला ताजा, समावेशक आणि स्टायलिश अनुभव देईल.

 

२२ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२५ दरम्यान होणारी उद्घाटने:

 

 

पीएनजी ज्वेलर्स

 

• वाकड, पुणे

 

• मोशी, पुणे

 

• कोल्हापूर

 

• लखनऊ

 

• कानपूर

 

• दादर, मुंबई

 

 

 

लाइटस्टाईल शॉप-इन-शॉप्स

 

• सोलापूर

 

• नाशिक

 

• छत्रपती संभाजीनगर

 

• नागपूर

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments