Sunday, August 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedलेखणीच्या प्रवाहाने जगामध्ये अनेक बदल घडवले - मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश...

लेखणीच्या प्रवाहाने जगामध्ये अनेक बदल घडवले – मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश दिलीप कर्णिक यांचे प्रतिपदान द पुणे फाउंटन पेन शो चे कर्णिक यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे, दि. २६ सप्टेंबर, २०२५ : जगामध्ये लेखणीच्या प्रवाहाने अनेक बदल घडवले आहेत, त्यामुळे पेनाच्या मागे मोठा इतिहास असून त्याला महत्व असल्याचे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश दिलीप कर्णिक केले. द इंक अँड पेन्स यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या व भारतातील एकमेव फाउंटन पेन शो म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या ‘द पुणे फाउंटन पेन शो चे उद्घाटन कर्णिक यांच्या हस्ते संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.

 

प्रसिद्ध वकील गौतम कर्णिक, भारतीय जनता पक्षाचे पुणे शहर उपाध्यक्ष मनोज खत्री, द इंक अँड पेन्सचे संचालक राजेश पिल्ले, संचालिका रश्मी नगरकर-पिल्ले, वैशंपायन गुरुजी आदी मान्यवर कार्यक्रमावेळी उपस्थित होते. यावेळी कर्णिक यांचा पुणेरी पगडी, उपरणे व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कर्णिक यांच्या हस्ते लोटस पेन्सचे अरुण सिंघी यांनी तयार केलेल्या श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्यावरील पेनच्या स्पेशल एडिशनचे उदघाटन देखील यावेळी करण्यात आले. सदर प्रदर्शन रविवार दि. २८ सप्टेंबर पर्यंत फर्ग्युसन रस्त्यावरील ज्ञानेश्वर पादुका चौकातील वन प्लेस येथे भरवण्यात आले असून त्यासाठी सर्वांना विनामूल्य प्रवेश देण्यात येणार आहे.

 

पेनला मोठा इतिहास असून आजच्या बदलत्या काळात देखील त्याला मोठे महत्व आहे. आतापर्यंत प्रभावी लेखणीमुळे जगामध्ये अनेक बदल झाल्याचे आपण पहिले आहे. पूर्वीच्या काळी फाउंटन वापरण्याची पद्धत होती. माझ्या वडिलांना फाउंटन पेन वापरण्याचा छंद होता. त्यांच्याकडे फाउंटन पेनाचा मोठा संग्रह होता. आता तो छंद माझा मुलगा जोपासत असल्याचे कर्णिक यावेळी म्हणाले.

 

पाच वर्षांपासून आयोजित करण्यात येणाऱ्या द पुणे फाउंटन पेन शो ला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अलीकडच्या काळात फांउटन पेन वापरणाऱ्या मंडळींचे प्रमाण वाढत चालले आहे. भविष्य काळात त्यामध्ये वाढ होईल, या चांगल्या कामाची सुरुवात पुन्हा एकदा पुण्यातून होत असल्याचा अभिमान असल्याचे द इंक अँड पेन्सच्या संचालिका रश्मी नगरकर-पिल्ले यांनी या वेळी स्पष्ट केले.

 

फाउंटन पेनवर विशेष प्रेम असणाऱ्या मंडळींना २८ सप्टेंबर पर्यंत सकाळी दहा ते रात्री साडेआठ यावेळत या प्रदर्शनामध्ये सहभागी होता येणार आहे. या भारतीय आणि विदेशी बनावटीची नवीन आकर्षक आणि दुर्मिळ शाई पेन्स, उच्च प्रतीच्या विविध रंगातील शाई, शाई पेन्ससाठी वापरण्यात येणारे सुटे भाग उपलब्ध आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर तयार करण्यात आलेल्या पेनच्या बरोबरच खास वकिलांसाठी तयार करण्यात आलेले पेन या शोचे वैशिष्ठ ठरले आहे. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्यावरील पेनची स्पेशल एडिशन आकर्षक पद्धतीने तयार करण्यात आले असून त्यामध्ये हर हर महादेव कोरलेला जयघोष, बाजीरावांच्या चार विजयाचे स्मरण करण्यात आले आहे. फाउंटन पेन शो मध्ये १०० रुपयांपासून ते पुढे पेन उपलब्ध आहेत. फाउंटन पेन शोच्या निमित्ताने हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये वय वर्षे १० पासून ते जेष्ठ नागरीकांना भाग घेता येणार आहे. सहभाग घेणाऱ्या मंडळींनी घरून शाईच्या पेनाने भारताचे राष्ट्रगीत (जन गण मन) लिहून आणायचे आहे आणि प्रदर्शनात जमा करायचे आहे

.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments