पुणे, दि. 25 सप्टेंबर (जिमाका वृत्तसेवा) : प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी चिंचवड कार्यालयाच्यावतीने माहे ऑक्टोबर 2025 मध्ये पक्का वाहन परवान्या (पक्की अनुज्ञप्ती) बाबत शिबीर दौऱ्याचे तालुका निहाय पुढीलप्रमाणे आयोजन करण्यात आले आहे.
खेड दि. 6 व 7 ऑक्टोबर, मंचर 8, 9 व 10 ऑक्टोबर, जुन्नर 13, 14 व 15 ऑक्टोबर, वडगाव मावळ 27 व 28 ऑक्टोबर आणि लोणावळा 29 व 30 ऑक्टोबर 2025. तर दि. 30 सप्टेंबर रोजी सायं. 5 वाजता (पक्की अनुज्ञप्तीसाठी) कोटा उपलब्ध होईल, असे उप प्रादेशिक परिहन अधिकारी, पिंपरी चिचवड यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.
00000


