Sunday, August 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedभविष्य घडवूया, गैरसमज दूर करूया: ओएसिस फर्टिलिटी प्रस्तुत "ओएसिस आयुष्मान शिष्यवृत्ती 2.0"...

भविष्य घडवूया, गैरसमज दूर करूया: ओएसिस फर्टिलिटी प्रस्तुत “ओएसिस आयुष्मान शिष्यवृत्ती 2.0” साठी अर्ज सुरू

हैदराबाद, 25th September, 2025– भारतातील प्रगत वंध्यत्व उपचार क्षेत्रातील आघाडीची संस्था ओएसिस फर्टिलिटी आपली १६ वर्षांची यशस्वी वाटचाल आणि हजारो कुटुंबांना पालकत्वाचं सुख देण्याच्या प्रवासाचा उत्सव साजरा करत आहे. या निमित्ताने ओएसिसने “ओएसिस आयुष्मान शिष्यवृत्ती कार्यक्रम” ची दुसरी आवृत्ती जाहीर केली आहे.

 

 

 

मागील वर्षी सुरु झालेल्या या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. या शिष्यवृत्तीचा लाभ ओएसिसमध्ये आयव्हीएफ किंवा अन्य प्रगत वंध्यत्व उपचारांद्वारे जन्मलेल्या विद्यार्थ्यांनाच मिळणार आहे. २०२५ मध्ये एकूण १० विद्यार्थ्यांची निवड केली जाणार असून त्यांचे गुणांकन खालील चार श्रेणींमध्ये होईल:

 

शैक्षणिक कामगिरी

 

कला आणि संस्कृती

 

क्रीडा

 

नवोन्मेष / विलक्षण यश

 

ही शिष्यवृत्ती फक्त आर्थिक मदत नाही, तर या विद्यार्थ्यांच्या प्रतिभेचं कौतुक आणि त्यांच्या प्रवासाचा सन्मान आहे.

 

 

 

डॉ. दुर्गा जी. राव, सहसंस्थापक व वैद्यकीय संचालक, ओएसिस फर्टिलिटी यांनी सांगितले, “या शिष्यवृत्तीद्वारे आम्ही अशा मुलांच्या यशाचा उत्सव साजरा करतो ज्यांचा जन्म ओएसिसमध्ये झाला आहे. तेही तितकेच सक्षम, हुशार आणि गुणी आहेत. १६ वर्षांच्या या प्रवासात आम्ही असंख्य स्वप्नं साकारताना पाहिली आणि ही शिष्यवृत्ती म्हणजे आमच्या कुटुंबांना परत दिलेली आमची कृतज्ञता आहे.”

 

श्री. किरण गडेला, सहसंस्थापक व व्यवस्थापकीय संचालक, यांनी सांगितले, “१६ वर्षांपूर्वी प्रजनन उपचारांविषयी समाजात गैरसमज आणि कलंक होता. आज ओएसिस फर्टिलिटीच्या माध्यमातून १ लाखाहून अधिक निरोगी बाळांचा जन्म झाला आहे. आयुष्मान शिष्यवृत्ती 2.0 हा उद्याचे परिवर्तनकर्ते घडवण्याचा आणि प्रगत वंध्यत्व उपचारांविषयीचे गैरसमज दूर करण्याचा आमचा प्रयत्न आहे.”

 

 

 

श्री. पुष्कराज शेनाई, मुख्य कार्यकारी अधिकारी, ओएसिस फर्टिलिटी म्हणाले, “हा उपक्रम फक्त शिक्षणापुरता मर्यादित नाही, तर प्रतिभेच्या प्रत्येक स्वरुपाचा गौरव आहे. मग ते शिक्षण असो, कला असो, क्रीडा असो किंवा नवोन्मेष – ही मुलं म्हणजे विज्ञान आणि आशेचं खरं उदाहरण आहेत.”

 

 

 

डॉ. निलेश बाळकवडे, रीजनल मेडिकल हेड आणि क्लिनिकल हेड महाराष्ट्र यांनी सांगितले, “पुणे आणि महाराष्ट्रातील अनेक जोडप्यांनी ओएसिस फर्टिलिटीवर विश्वास ठेवून पालकत्वाचं स्वप्न पूर्ण केलं आहे. आता आयुष्मान शिष्यवृत्ती 2.0 च्या माध्यमातून आम्ही या मुलांच्या यशाचा सन्मान करत आहोत. हे मुलं समाजाला नवं प्रेरणादायी उदाहरण देत आहेत की विज्ञान आणि आशेच्या आधाराने काहीही शक्य आहे.”

 

मागील वर्षीच्या पालकांनीही भावना व्यक्त करताना सांगितले की, “फक्त पैशापेक्षा मुलांच्या यशाची ओळख आणि गौरव आम्हाला अधिक महत्त्वाचा वाटला. ज्या संस्थेमुळे आम्हाला पालकत्व मिळालं, तीच संस्था आता आमच्या मुलांच्या भविष्याला आकार देण्यासाठी पाठीशी उभी आहे.”

 

ओएसिस आयुष्मान शिष्यवृत्ती 2.0 च्या माध्यमातून पुन्हा एकदा IVF आणि इतर प्रगत वंध्यत्व उपचाराद्वारे जन्मलेल्या मुलांच्या यशाचा गौरव करण्यासाठी दारे खुली होत आहेत. या उपक्रमाद्वारे समाजाला हाच संदेश दिला जात आहे की विज्ञानातून आशा निर्माण होते आणि अशा मुलांचा प्रवास उत्सवाचा विषय ठरायला हवा, गैरसमजाचा नाही.

 

सहभागी होण्यासाठी, तुम्ही 9502080820 वर संपर्क साधू शकता, https.//paid.oasisindia.in/lp2/scholarship येथे अर्ज भरू शकता

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments