Sunday, August 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedरुबी हॉल क्लिनिक च्या सेव्हिंग लाईव्ह मोहिमेअंतर्गत पुण्यातील मेट्रो स्टेशन्स, शाळा आणि...

रुबी हॉल क्लिनिक च्या सेव्हिंग लाईव्ह मोहिमेअंतर्गत पुण्यातील मेट्रो स्टेशन्स, शाळा आणि मॉल्स मध्ये एईडी उपकरण स्थापित

जागतिक हृदयदिनानिमित्त १००० हुन अधिक पुणेकरांना सीपीआर प्रशिक्षण देण्याचे उद्धिष्ट

नागरिकांना जीवनरक्षक व प्रथम प्रतिसादकर्ते म्हणून सक्षम करण्यासाठी उपक्रम

 

पुणे २७ सप्टेंबर २०२५ : जागतिक हृदयदिनानिमित्त , रुबी हॉल क्लिनिक तर्फे सेव्हिंग लाईव्हस मोहिम हाती घेण्यात आली आहे . या उपक्रमांतर्गत दोन जीवनदायी उपायांवर लक्ष केंद्रित करण्यात आले असून पुण्यात सर्वात वर्दळीच्या ठिकाणी ऑटोमॅटिक एक्सटर्नल डिफिब्रिलेटर्स (एईडी) उपकरण बसवण्यात येतील तसेच १००० हुन अधिक नागरिकांना सीपीआर (कार्डिओपल्मनरी रेशुसीटेशन) व एईडी बाबत प्रशिक्षण दिले जाईल .

अचानक हृदय बंद पडणे ( सडन कार्डियाक अरेस्ट – एससीए ) हे जगभरातील मृत्यूचे एक प्रमुख कारण आहे , वेळेवर उपचार न मिळाल्यास दर मिनिटाला जीव वाचण्याचे प्रमाण १० टक्क्यांनी कमी होते . पुण्यासारख्या वर्दळीच्या शहरात इमर्जन्सी वैद्यकीय सेवा पोहोचायला अनेकवेळा वेळ लागू शकतो . ही दरी भरून काढण्यासाठी रुबी हॉल क्लिनिक तर्फे १० मेट्रो स्टेशन्स, कोरेगाव पार्क येथील लाइफस्टाइल, फिनकॉर्पन्ड अनेक्स येथे एईडी उपकरण बसवण्यात येणार आहेत. या उपक्रमाच्या उदघाटन प्रसंगी रुबी हॉल क्लिनिक चे चीफ कार्डिओलॉजिस्ट व अध्यक्ष डॉ. पी. के ग्रांट, फिजिशियन व विश्वस्थ डॉ. सायमन ग्रांट, धोरण व व्यवसाय विकास विभागाच्या सरव्यवस्थापक नॅटली ग्रांट नंदा, मुख्य कार्यकारी अधिकारी बेहराम खोदाईजी, चेस्ट फिजिशियन व न्यूरो-इंटेन्सिव्ह विभागाचे प्रमुख डॉ. कपिल झिरपे आदी मान्यवर उपस्थित होते .

एईडी उपकरणांबरोबरच , सीपीआर कार्यशाळांद्वारे मेट्रो कर्मचारी, मॉल कर्मचारी , हॉटेल कर्मचारी , कॉर्पोरेट व्यावसायिक आणि नागरिकांना हृदय बंद पडण्याची ( कार्डियाक अरेस्ट) ची स्थिती ओळखणे, छाती दाबण्याची प्रक्रिया ( चेस्ट कॉम्प्रेशन ) व एईडी उपकरणांचा वापर याबाबत प्रशिक्षण दिले जाईल . नागरिकांना जीवनरक्षक व प्रथम प्रतिसादकर्ते म्हणून सक्षम केले जाईल . याशिवाय जागरूकता वाढवण्यासाठी रुबी हॉल क्लिनिक ने एका लघुपटाची निर्मिती केली असून यामध्ये टप्याटप्याने एईडी व सीपीआर तंत्राचा वापर दाखवण्यात आला आहे . हा लघुपट या कार्यशाळांमध्ये दाखवला जाणार आहे ज्यामुळे सहभागींना ज्ञान व व्यावहारिक कौशल्य प्राप्त होईल .

रुबी हॉल क्लिनिक चे चीफ कार्डिओलॉजिस्ट व अध्यक्ष डॉ. पी. के ग्रांट,म्हणाले की हॉस्पिटल शिवाय समुदायामध्ये हृदयाच्या बाबतीत तातडीच्या सेवा उपलब्ध व्हाव्यात हे आमचे उद्धिष्ट आहे . एईडी उपकरण अशा वर्दळीच्या ठिकाणी बसवून, नागरिकांना प्रशिक्षित करून , लघुपटाद्वारे दृश्य मार्गदर्शन करून , प्रत्येकाला अशा आपत्कालीन स्थितीत तातडीने मदत मिळू शकेल या दृष्टीने हा प्रयत्न आहे . तत्परतेने सीपीआर व डिफिब्रिलेशन मुळे जगण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढू शकते , कधी कधी अगदी ९० टक्क्यांपर्यंत .

रुबी हॉल क्लिनिक चे फिजिशियन व विश्वस्थ डॉ सायमन ग्रांट म्हणाले की अचानक हृदय बंद पडण्याची स्थिती कोणाच्याही बाबतीत उदभवू शकते, मॉल मध्ये , मेट्रो स्टेशन मध्य किंवा शाळांमध्ये सुद्धा .एईडी व सीपीआर प्रशिक्षणाद्वारे हृदय बंद पडण्याची प्रक्रियेची सुरवात आणि वैद्यकीय सेवेची उपलब्धता यामधील महत्वाची दारी भरून काढण्याचा आमचा प्रयत्न आहे .

रुबी हॉल क्लिनिक मधील चेस्ट फिजिशियन व न्यूरो-इंटेन्सिव्ह विभागाचे प्रमुख डॉ. कपिल झिरपे म्हणाले की अचानक हृदय बंद पडणे हा सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने एक गंभीर विषय आहे . अचानक हृदय बंद पडणे ( सडन कार्डियाक अरेस्ट – एससीए ) म्हणजे हृदय विकाराचा झटका नव्हे. हृदय बंद पडण्याची प्रक्रियेची सुरवात आणि वैद्यकीय सेवेची उपलब्धता यामधला लागणार वेळ अत्यंत महत्वाचा ठरतो आणि तो कमी करणे हे मृत्यूची जोखीम कमी करण्याचा किंवा यामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य अपंगत्वापासून वाचवण्याचा सर्वोत्तम उपाय आहे .

फक्त वैद्यकीय सेवेत नव्हे तर समुदाय केंद्रित आरोग्यसेवा उपायांमध्ये रुबी हॉल क्लिनिक ने आपले नेतृत्वाचे स्थान अधिक दृढ केले आहे . अशा उपक्रमांच्या माध्यमातून पुण्यातील प्रत्येक सार्वजनिक ठिकाण तातडीची वैद्यकीय स्थिती हाताळण्यासाठी सक्षम बनवणे आणि प्रत्येक नागरिकाला आपण लोकांचे प्राण वाचवू शकतो हा आत्मविश्वास निर्माण करण्याचा हेतू आहे .

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments