Sunday, August 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedपावसाच्या सरीत राष्ट्र सेविका समितीचे सघोष पथसंचलन 

पावसाच्या सरीत राष्ट्र सेविका समितीचे सघोष पथसंचलन 

 

 

पुणे, दिनांक २८ : पुण्यात राष्ट्र सेविका समितिचे विजयादशमीचे संचलन उत्साहात पार पडले. सतत बरसणारा पाऊस आणि फुलांच्या वर्षावात समितीच्या सेविकांचे स्वागत झाले. समितीच्या पुणे महानगरातर्फे विजयादशमीचे औचित्य साधत शहरातील सहा भागांमध्ये घोष वाद्यांच्या गजरात पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले होते. कात्रज, मार्केट यार्ड, खराडी, कसबा पेठ, सिंहगड रस्ता, वारजे या भागांमध्ये संचलन झाले. या संचलनात सुमारे दोन हजारांहून अधिक सेविका सहभागी झाल्या होत्या.

 

राष्ट्र सेविका समिती ही राष्ट्रासाठी कार्य करणारी महिलांची प्रमुख संघटना आहे. राष्ट्र सेविका समितितर्फे शहरात सहा भागांत संचलनाचे आयोजन करण्यात आले होते. याठिकाणी शस्रपूजनही करण्यात आले. या वेळी सुमारे बावीसशे सेविका उपस्थित होत्या. त्यापैकी १ हजार ९०० जणींनी प्रत्यक्ष संचलन केले. यामध्ये लहान मुलींपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटांतील सेविकांचा सहभाग होता. राष्ट्र सेविका समितिचे ९० वे वर्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीवर्षानिमित्त झालेल्या संपर्क अभियानातून अनेक महिला जोडल्या गेल्या.

 

वडगाव येथील शरदचंद्र पवार इ-लर्निंग स्कूल, खराडी येथील झेन्सार मैदान, कात्रज येथील वंडरसिटीजवळील मैदान, शनिवार पेठेतील न. वि. गाडगीळ शाळा आणि गुलटेकडी येथील महावीर इंग्लिश मीडियम स्कूल येथून संचलनांना सुरुवात झाली. वारजे येथे आरएमडी धारिवाल कॉलेजमधून सुरु झालेले संचलन दोन रस्त्यांवर मार्गस्थ झाले आणि झेंडा चौक (वारजे) येथे पुन्हा एकत्र आले. विशेष म्हणजे पाऊस सुरु असतानाही संचलन सुरू राहिले होते. यावेळी परिसरातील नागरिकांनी पुष्पवर्षाव करत संचलनाचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. तालबद्ध घोषासह निघालेल्या पथसंचलनाने परिसरातील सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. या संचलनावेळी पुणे महानगर संचालिका मीना कानडे, पुणे महानगर कार्यवाहिका ज्योती भिडे यांसह केंद्र, प्रांत, महानगराच्या अधिकारी उपस्थित होत्या.

——–

रविवारी येथे संचलन :

येत्या रविवारी (५ ऑक्टोबर) लष्कर भागातील दिव्यांग कल्याणकारी संस्थेच्या मैदानातून (वानवडी) संचलनाला सकाळी साडेआठवाजता संचलनाला सुरूवात होणार आहे. विद्यापीठ भागातील संचलन बाणेर येथील नाना-नानी पार्कमधून सायंकाळी साडेचारवाजता सुरु होईल.

—-

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments