सणाचा आनंद आणि जपून ठेवण्याजोग्या क्षणांसाठी डिझाइन केलेल्या या कलेक्शनमधील प्रत्येक घड्याळ एकजुटीची, मैत्रीची कहाणी सांगते.
बंगलोर, 29 सप्टेंबर 2025: सोनाटाने सणासुदीच्या निमित्ताने फेस्टिव्ह कलेक्शन 2.0 सादर केले आहे. वेळ आणि परंपरा यांचा आनंद साजरा करण्यासाठी ही घड्याळे डिझाइन केली असून, खास भेटवस्तू म्हणून देण्यास ती उत्तम ठरतील. आधुनिक डिझाइन आणि सणासुदीची चमक यांचा संगम असलेली ही घड्याळे खास क्षण संस्मरणीय बनवण्यासाठी आणि कायम मनात घर करून राहतील अशा आठवणी निर्माण करण्यासाठी योग्य आहेत.
महिलांसाठी: या कलेक्शनमध्ये नाजूक डिझाइन्स असलेली मेश ब्रेसलेट्स, शिमरींग स्टड पीसेस आणि आकर्षक रोझ-गोल्ड स्ट्रॅप्स उपलब्ध आहेत. बारकाईने केलेली डिटेलिंग, पॉलिश्ड फिनिशेस आणि सणासुदीची चमक यामुळे प्रत्येक घड्याळ भेटवस्तू म्हणून किंवा तुमच्या खास आउटफिटला आणखी उठाव देण्यासाठी योग्य आहे.
सोनाटाचे ब्रँड हेड निशांत मित्तल म्हणाले, “फेस्टिव्ह कलेक्शन 2.0 सण स्टाइलमध्ये साजरे करता यावेत म्हणून तयार केले आहे. आमची इच्छा होती की, प्रत्येक घड्याळामध्ये सणाचा आनंद आणि आपुलकी झळकावी. भेटवस्तू देण्यासाठी असो, स्वतःसाठी असो किंवा खास प्रसंगासाठी असो – हे कलेक्शन संस्मरणीय क्षण उजळवण्यासाठी आणि कायमस्वरूपी आठवणी निर्माण करण्यासाठी खास तयार केले आहे.”
सोनाटाचे फेस्टिव्ह कलेक्शन 2.0 स्टोअर्स किंवा ऑनलाईन www.sonatawatches.in वर उपलब्ध आहे.


