Sunday, August 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedजागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

पिंपरी, ३० सप्टेंबर २०२५ : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन निमित्त १ ऑक्टोबर २०२५ रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे सकाळी ९ ते सायंकाळी ५ यावेळेत करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता होणार आहे.

 

 

 

केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांची विशेष उपस्थिती यावेळी असणार आहे. तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची देखील प्रमुख उपस्थिती असणार आहे. याशिवाय खासदार मेधा कुलकर्णी, सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे, श्रीरंग आप्पा बारणे, डॉ. अमोल कोल्हे, आमदार अमित गोरखे, उमा खापरे, महेश लांडगे, शंकर जगताप, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे सदस्य ॲड. गोरक्ष लोखंडे तसेच माजी खासदार, माजी आमदार, माजी नगरसदस्य, माजी नगरसदस्या तसेच महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर तसेच महानगरपालिकेतील विविध विभागप्रमुख, विविध सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी, सदस्य यावेळी उपस्थित राहणार आहेत. तरी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments