गुरूग्राम, भारत – सप्टेंबर ३०, २०२५ – सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने ग्राहकांना यंदा सणासुदीच्या काळामध्ये आजपासून सुरू होत असलेला त्यांचा सर्वात मोठा शॉपिंग इव्हेण्ट ‘फॅब ग्रॅब फेस्ट’दरम्यान आकर्षक किमतींत आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय)च्या क्षमतेचा अनुभव घेण्यास आवाहन केले आहे.
सॅमसंगच्या एआय-समर्थित टीव्ही, रेफ्रिजरेटर्स, वॉशिंग मशिन्स, स्मार्टफोन्स, मॉनिटर्स, साऊंड डिवाईसेसच्या व्यापक पोर्टफोलिओमध्ये विशेष उत्सवी ऑफर्ससह फॅब ग्रॅब फेस्ट ग्राहकांसाठी सॅमसंगच्या सर्वोत्तम परिसंस्थेत अपग्रेड होण्याकरिता अल्टिमेट संधी आहे, जे दैनंदिन राहणीमानाला उत्साहित करतात.
उल्लेखनीय बाब म्हणजे, जीएसटी कपातीनंतर नवीन कमी झालेल्या किमती आता एसी, टीव्ही आणि मॉनिटर्सवर देखील लागू आहे.
सवलतीच्या किमतींमध्ये सॅमसंगच्या एआय-समर्थित परिसंस्थेसह स्मार्ट राहणीमान
यंदा सणासुदीच्या काळात सॅमसंग आपल्या एआय-संचालित नाविन्यतांच्या शक्तिशाली पोर्टफोलिओसह प्रत्येक घरामध्ये भावी स्मार्ट राहणीमान घेऊन येत आहे. रिअल-टाइम भाषांतर, सर्वोत्तम फोटो एडिटिंग आणि उत्पादकता टूल्स सक्षम करणाऱ्या स्मार्टफोन्समधील उल्लेखनीय गॅलेक्सी एआयपासून कन्टेन्ट ऑप्टिमाइज करणारे एआय-सक्षम टेलिव्हिजन्स आणि सुधारित कार्यक्षमतेसाठी वापराच्या पद्धती जाणून घेणाऱ्या अप्लायन्सेसपर्यंत सॅमसंग आर्टिफिशियल इंटेलिजन्सला सहजसाध्य व प्रभावी करत आहे. स्मार्टफोन, टीव्ही, रेफ्रिजरेटर किंवा वॉशिंग मशिन असो प्रत्येक डिवाईस दैनंदिन टास्क्स सर्वोत्तम, वैयक्तिकृत आणि कनेक्टेड करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. फॅब ग्रॅब फेस्टदरम्यान मोठ्या उत्सवी सूट, कॅशबॅक ऑफर्स आणि अपग्रेड प्रोग्राम्ससह ही सॅमसंगचे नेक्स्ट-जनरेशन एआय तंत्रज्ञान घरी आणण्याची परिपूर्ण वेळ आहे.
स्मार्टफोन्स व लॅपटॉप्सवर अद्वितीय डिल्स
ग्राहक सॅमसंगच्या गॅलेक्सी स्मार्टफोन्स व लॅपटॉप्सच्या नवीन श्रेणीसह भविष्याकडे अपग्रेड होऊ शकतात, जे आता अपवादात्मक उत्सवी किमतींमध्ये उपलब्ध आहेत. ग्राहकांना गॅलेक्झी झेड फोल्ड७, गॅलेक्झी झेड फ्लिप७, गॅलेक्सी एस२५ अल्ट्रा, गॅलेक्सी एस२४ एफई, गॅलेक्सी ए५६ अशा प्रीमियम गॅलेक्सी स्मार्टफोन्सवर जवळपास ५३ टक्क्यांची सूट मिळवू शकतात. तसेच, ग्राहक जवळपास १२,००० रूपयांच्या त्वरित बँक सूटचा आनंद घेऊ शकतात, ज्यामुळी गॅलेक्सी एआय आणि आकर्षक फोल्डेबल डिस्प्ले सारख्या अत्याधुनिक वैशिष्ट्यांचा अनुभव घेण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे.
चालता-फिरता उत्पादकतेसाठी गॅलेक्सी बुक५ प्रो ३६०, गॅलेक्सी बुक५ आणि बुक४ सिरीज आता जवळपास ५९ टक्के सूट व १७,४९० रूपयांच्या त्वरित बँक सूटसह उपलब्ध आहेत. आकर्षक डिझाइन्स, सर्वोत्तम डिस्प्ले आणि शक्तिशाली कार्यक्षमतेसह हे एआय-एकीकृत लॅपटॉप्स काम, सर्जनशीलता आणि सर्व गोष्टींसाठी उपयुक्त आहेत.
अद्वितीय किमतींमध्ये सर्वोत्तम बिग स्क्रिन अनुभव
ग्राहक सॅमसंगच्या ब्लॉकबस्टर टीव्ही डिल्ससह घरामध्ये सिनेमॅटिक उत्कृष्टतेचा आनंद घेऊ शकतात. ग्राहक लोकप्रिय फ्रेम व निओ क्यूएलईडी मॉडेल्ससह सॅमसंग टेलिव्हिजन्सच्या व्यापक श्रेणीवर जवळपास ५१ टक्के सूटचा आनंद घेऊ शकतात. निवडक मॉडेल्स मोफत साऊंडबार किंवा दुसऱ्या टीव्हीसोबत देखील येतात, ज्यामुळे उत्सवी अपग्रेडमध्ये अधिक मूल्याची भर झाली आहे.
जवळपास ५००० रूपयांचा एक्स्चेंज बोनस, जवळपास ३० महिन्यांसाठी स्थिर ईएमआय पर्याय आणि ३-वर्षांच्या वॉरंटीसह सॅमसंग बिग स्क्रिन घरी आणण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ आहे.
प्रीमियम डिजिटल अप्लायन्सेसवर स्मार्ट बचत
सॅमसंग सर्वोत्तम, ऊर्जा-कार्यक्षम अप्लायन्सेससह घरांना अधिक सुशोभित करत आहे. रेफ्रिजरेटर्सवर जवळपास ४६ टक्के सूट आणि डिजिटल इन्व्हर्टर कम्प्रेसरवर २० वर्षांच्या वॉरंटीसह उपलब्ध आहेत. आकर्षक बीस्पोक एआय सिरीज असो किंवा एैसपैस साइड-बाय-साइड मॉडेल्स असो सॅमसंग रेफ्रिजरेटर्स ग्राहकांच्या आधुनिक जीवनशैलींसाठी डिझाइन करण्यात आले आहेत.
सॅमसंग वॉशिंग मशिन्स जवळपास ४८ टक्के सूट आणि डिजिटल इन्व्हर्टर मोटरवर २० वर्षांच्या वॉरंटीसह येतात. पर्यायांमध्ये फुली ऑटोमॅटिक फ्रण्ट लोड किंवा टॉप लोड मॉडेल्स आहेत, जे कमी ऊर्जा वापरासह शक्तिशाली, एआय-सुधारित क्लीनिंग देतात.
किचन अपग्रेड्ससाठी सॅमसंग मायक्रोवेव्ह्ज जवळपास ३९ टक्के सूट आणि सिरॅमिक एनामेल कॅव्हिटीवर १० वर्षांच्या वॉरंटीसह येतात, ज्यामध्ये टिकाऊपणासह आकर्षक डिझाइन आहे.
उष्णतेवर मात करण्यासाठी निवडक विंडफ्री™ एअर कंडिशनर्स जवळपास ४८ टक्के सूटसह उपलब्ध आहेत, तसेच ५-स्टार मॉडेल्सवर मोफत इन्स्टॉलेशन आणि सर्वसमावेशक ५ वर्षांची वॉरंटी आहे.
स्थिर फायनान्सिंग व उत्साहवर्धक कॅशबॅक ऑफर्स
सॅमसंग यंदा सणासुदीच्या काळता अपग्रेड सोपे करत आहे. ग्राहक एचडीएफसी, एसबीआय आणि इतर आघाडीच्या बँक कार्डच्या माध्यमातून पेमेंट केल्यासह जवळपास २७.५ टक्के कॅशबॅक (जवळपास ५५,००० रूपये) मिळवू शकतात.
बजाज फायनान्सच्या माध्यमातून उत्पादन श्रेणींवर दीर्घकालीन ईएमआय पर्याय उपलब्ध आहेत, जेथे टेलिव्हिजन्स व अप्लायन्सेससाठी प्लॅन जवळपास ३० महिन्यांपर्यंत जातात. निवडक डिजिटल अप्लायन्सेसवर विशेष ईएमआय ऑफर्स प्रतिमहिना फक्त १२९० रूपयांपासून सुरू होतात, ज्यामुळे ग्राहक अधिक सहजपणे घरी प्रीमियम टेक आणू शकतात.


