सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (SGMA) आयोजित आणि महाराष्ट्र शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाच्या सहकार्याने ९वे आंतरराष्ट्रीय युनिफॉर्म मॅन्युफॅक्चरर्स फेअर २०२५ हा तीन दिवसीय भव्य मेळावा मुंबई येथे भरविण्यात येणार आहे.
“जागतिक युनिफॉर्म बाजार ६५ अब्ज अमेरिकन डॉलर्सवर पोहोचला, पुढे झपाट्याने वाढणार”
एआय-सक्षम व्हर्च्युअल युनिफॉर्म फॅशन शो – उद्योगक्षेत्रात प्रथमच
सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (SGMA) व महाराष्ट्र शासनाचा वस्त्रोद्योग विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ९वे आंतरराष्ट्रीय युनिफॉर्म मॅन्युफॅक्चरर्स फेअर २०२५चे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा २६ ते २८ नोव्हेंबर २०२५ दरम्यान नेस्को एक्झिबिशन सेंटर, हॉल क्र. ४, गोरेगाव (मुंबई) येथे होणार आहे. या तीन दिवसीय मेळाव्यात देशभरातील १५० हून अधिक ब्रॅण्ड्स सहभागी होणार असून, ३०,००० हून अधिक युनिफॉर्म डिझाईन्स आणि १५,०००+ फॅब्रिक डिझाईन्सचे प्रदर्शन केले जाणार आहे. जागतिक युनिफॉर्म उद्योगासाठी हा सर्वात मोठा सोर्सिंग हब ठरणार आहे.
SGMA फेअरचे चेअरमन श्री. अजयरंगरेज म्हणाले, “२०१७ पासून SGMA युनिफॉर्म क्षेत्रात सातत्याने नावीन्य आणत आहे. शाळा, हॉस्पिटल, हॉटेल, कॉर्पोरेट, क्रीडा, औद्योगिक, वर्कवेअर, फॅब्रिक, अॅतक्सेसरीज, फुटवेअर अशा सर्व प्रकारच्या युनिफॉर्मशी संबंधित गोष्टी एकाच छताखाली या फेअरमध्ये उपलब्ध होतील. जगात हा एकमेव असा व्यासपीठ आहे.”
एआय-आधारित व्हर्च्युअल फॅशन शो : उद्योगक्षेत्रात प्रथमच
यंदाच्या फेअरची खास आकर्षण ठरणार आहे एआय-सक्षम व्हर्च्युअल फॅशन शो. यातून भविष्यातील युनिफॉर्म डिझाईन्स डिजिटल स्वरूपात अनुभवता येतील, ज्यामुळे डिझाईन व्हिज्युअलायझेशन व मार्केटिंगला नवे मार्ग खुलतील. या प्रदर्शनात शालेय गणवेश, हॉस्पिटल युनिफॉर्म, हॉटेल व कॉर्पोरेट युनिफॉर्म, क्रीडावेश, औद्योगिक व वर्कवेअर, ब्लेझर, बेल्ट, टाय, शूज, सॉक्स, बॅग्स, फॅब्रिक्स तसेच वस्त्रउद्योग यंत्रसामग्रीचा समावेश असेल. वितरक, डीलर्स, रिटेलर्स, शैक्षणिक संस्था, हॉस्पिटल्स व कॉर्पोरेट खरेदीदारांसाठी हे मोठे नेटवर्किंग व सोर्सिंगचे व्यासपीठ ठरणार आहे.
SGMA फेअरचे सेक्रेटरी श्री. श्रीकांत अंबुरे म्हणाले,“नव्या डिझाईन्स व तंत्रज्ञानाधारित मार्केटिंग पद्धतींमुळे हा उपक्रम युनिफॉर्म उद्योगासाठी पहिलाच प्रयोग आहे. वितरक, डीलर्स, रिटेलर्स, शाळा, हॉस्पिटल्स, कॉर्पोरेट्स व उद्योजकांनी यात सहभागी होऊन या अद्वितीय व्यासपीठाचा लाभ घ्यावा.”
बाजारातील वाढ आणि सोलापूरचा जागतिक दर्जा
SGMA च्या आकडेवारीनुसार, जागतिक युनिफॉर्म बाजाराची किंमत २०२३ मध्ये ६५ अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी होती. २०३० पर्यंत ४% वार्षिक वाढीच्या दराने हा बाजार वाढेल, असा अंदाज आहे.
सोलापूरच्या वस्त्रउद्योगाने या प्रवासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. वेळेवर मोठ्या प्रमाणावर डिलिव्हरी, छोट्या पुनःऑर्डर्सची कार्यक्षम हाताळणी आणि देशभरातील मजबूत प्रतिमा यामुळे सोलापूर जागतिक दर्जाचे युनिफॉर्म उत्पादन केंद्र म्हणून उदयास आले आहे.
२०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापूरच्या वस्त्रोद्योगाच्या क्षमतेची दखल घेतली होती. जानेवारी २०२४ मध्ये पंतप्रधानांनी SGMA च्या कार्याचे कौतुक करून, सोलापूरला जागतिक युनिफॉर्म उत्पादन केंद्र बनवण्यात संस्थेच्या योगदानाची प्रशंसा केली. आजपर्यंत २०,००० हून अधिक रोजगार निर्मिती व ३०० पेक्षा अधिक नवउद्योजक घडविण्यात SGMA आघाडीवर आहे.
२०१७ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांच्या पाठिंब्याने सोलापूरमध्ये या आंतरराष्ट्रीय युनिफॉर्म प्रदर्शनाची सुरुवात झाली. त्यानंतर बंगळुरू, मुंबई, हैदराबाद, वाराणसीपर्यंत या प्रदर्शनाचा विस्तार झाला असून, फक्त आठ वर्षांत ३०० पेक्षा जास्त उद्योगपती घडविण्यात यश आले आहे. आज हे युनिफॉर्म उद्योगातील एक जागतिक दर्जाचे फ्लॅगशिप इव्हेंट म्हणून ओळखले जाते.
हा B2B मेळावा खरेदीदार, होलसेलर्स, वितरक, रिटेलर्स, कॉर्पोरेट बायर्स व एजन्सीज यांना एकत्र आणून मोठ्या प्रमाणावर व्यापारी भागीदारी निर्माण करण्याचे आणि ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाला चालना देण्याचे उद्दिष्ट ठेवतो.
अधिक माहितीसाठी www.sgma.in येथे भेट द्या किंवा +91-8001900112 या क्रमांकावर संपर्क साधा.
—————————————————————————————————


