सादर करत आहोत नवीन टॉप-एंड व्हेरिअंट – बोलेरो बी8 आणि बोलेरो निओ एन11
• एक्स-शोरूम किंमत: नवीन बोलेरो ₹ 7.99 – 9.69 लाख
नवीन बोलेरो निओ ₹ 8.49 – 9.99 लाख
नवीन बोलेरो
बोल्ड डिझाइन
नवीन ग्रिल आणि फ्रंट फॉग लॅम्प
डायमंड-कट R15 अलॉय व्हील्स
रंगातही नवीन पर्याय – स्टील्थ ब्लॅक
आरामदायी प्रवास
लेदरेट अपहोल्स्ट्रीसह वाढत्या आरामासाठी नवीन सीट कॉन्टूर्स
नवीन 17.8 सेमी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि स्टीअरिंग-माउंटेड ऑडिओ कंट्रोल्स
आरामदायी प्रवासासाठी आणि सोप्या हाताळणीसाठी राइडफ्लो टेक
नवीन बोलेरो निओ
आधुनिक शैली
आकर्षक आडव्या रेषांसह नवीन आकर्षक ग्रिल
डार्क मेटॅलिक ग्रे R16 अलॉय व्हील्स
नवीन रंगाचा पर्याय – जीन्स ब्लू, ड्युअल-टोन पर्यायांसह काँक्रीट ग्रे
स्मार्ट तंत्रज्ञानासह प्रीमियम आराम
इंटीरियर थीमचे दोन नवीन पर्याय – लुनर ग्रे, मोचा ब्राउन
लेदरेट अपहोल्स्ट्रीसह वाढलेल्या आरामासाठी नवीन सीट कॉन्टूर्स
रीअर-व्ह्यू कॅमेरासह 22.8 सेमी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट
स्मूथ, नियंत्रित ड्राइव्हसाठी MTV-CL आणि FDD सस्पेंशनसह राइडफ्लो टेक
मुंबई, 7 ऑक्टोबर 2025: भारतातील आघाडीची एसयूव्ही उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने आज बोलेरोची नवीन श्रेणी सादर केली. नवीन बोलेरोची किंमत ₹7.99 लाखांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते तर नव्याने सादर केलेल्या टॉप-एंड B8 प्रकाराची किंमत ₹9.69 लाख (एक्स-शोरूम) आहे. नवीन बोलेरो निओची किंमत ₹8.49 लाखांपासून (एक्स-शोरूम), आणि नवीन टॉप-एंड प्रकार N11 ची किंमत ₹9.99 लाख (एक्स-शोरूम) आहे. या लाँचसह, बोलेरो श्रेणी सौंदर्यशास्त्र, अधिक आरामदायी प्रवास आणि आधुनिक वैशिष्ट्यांसह तिचे आकर्षण कायम ठेवते आहे.
25 वर्षांचा वारसा आणि 16 लाखांहून अधिक समाधानी ग्राहकांसह, बोलेरो ही एक वैविध्यपूर्ण एसयूव्ही आहे. शहरातील गजबजलेल्या रस्त्यांपासून ते खडकाळ ग्रामीण लँडस्केपपर्यंत विविध भूप्रदेशांमध्ये तिचा वावर सहज असतो. कारण, कोणत्याही भूप्रदेशांत सहज ऍडजस्ट होईल अशी तिची अनुकूलता आहे. आणि यामुळेच ती ग्राहकांसाठी मौल्यवान आहे.
महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या ऑटोमोटिव्ह डिव्हिजनचे मुख्य कार्यकारी अधिकारी नलिनीकांत गोल्लागुंटा म्हणाले, “काळाच्या कसोटीवर बोलेरोने स्वतःला सिद्ध केले आहे. त्यामुळेच 25 वर्षांहून अधिक काळ भारतातील सर्वात वैविध्यपूर्ण आणि मजबूत एसयूव्हींपैकी एक म्हणून तिने आपले स्थान निश्चित केले आहे. या चिरस्थायी वारशाच्या पायावर नवीन बोलेरो गतिमान आणि वेगाने विकसित होणाऱ्या नवीन भारताच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी विचारपूर्वक डिझाइन केली गेली आहे. कणखरपणा, आधुनिक रचना, वाढीव आराम आणि आधुनिक वैशिष्ट्यांचे परिपूर्ण मिश्रण असलेली नवीन बोलेरो आणि बोलेरो निओ एक शक्तिशाली अनुभव देतात, जो शहरातील रस्त्यांवर आणि आव्हानात्मक भौगोलिक प्रदेशांमध्ये देखील सारखाच असतो.”
नवीन बोलेरो
नवीन बोलेरोमध्ये वैशिष्ट्यपूर्ण डिझाइन, आधुनिक वैशिष्ट्ये आणि वाढीव आराम यांचा उत्तम मिलाफ आहे. नवीन बोल्ड ग्रिल, फॉग लॅम्प आणि डायमंड-कट अलॉय व्हील्ससह, बोलेरो भारतातील मजबूत आणि विश्वासार्ह एसयूव्ही म्हणून ओळखली जाते. अधिक मजबूत आणि स्टायलिश, आराम आणि विश्वासार्हतेसह मजबूत वाहनाला महत्त्व देणाऱ्यांसाठी ती आदर्श आहे. ग्रामीण तरुण, उद्योजक आणि कुटुंबांसाठी बोलेरो हा एक विश्वासार्ह पर्याय आहे, जी यश आणि अभिमानाचे प्रतीक आहे.
बोलेरोमध्ये नवीन 17.8 सेमी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट आणि म्युझिक सिस्टम, स्टीअरिंग-माउंटेड कंट्रोल्स आणि वाढीव सीट आरामासह लेदरेट अपहोल्स्ट्री आहे. प्रगत राइड आणि हँडलिंग तंत्रज्ञान – राइडफ्लो – कोणत्याही भूप्रदेशासाठी डिझाइन केलेले सुधारित सस्पेंशन आर्किटेक्चरसह वाढीव स्थिरता आणि नियंत्रण प्रदान करते. बोलेरोचा मूळ डीएनए अपरिवर्तित आणि अखंड राहतो, mHAWK75 इंजिनद्वारे समर्थित आहे. बॉडी-ऑन-फ्रेम बांधकामासह 55.9 kW ची शक्ती आणि 210 Nm टॉर्क प्रदान करते. नव्याने देण्यात आलेल्या रंगांमध्ये विद्यमान डायमंड व्हाइट, DSAT सिल्व्हर आणि रॉकी बेजसह स्टील्थ ब्लॅकचा समावेश आहे.
नवीन बोलेरो निओ
नवीन बोलेरो निओमध्ये मजबुती आणि शहरी अत्याधुनिकता यांचा उत्तम मेळ आहे. आधुनिक सोयीसुविधा तसेच क्षमता असलेले कणखर आणि व्यावहारिक वाहनाच्या शोधात असलेल्या ग्राहकांसाठी ते योग्य आहे. आकर्षक आडव्या रेषा आणि डार्क मेटॅलिक ग्रे R16 अलॉय व्हील्समुळे नवीन ग्रिल बोलेरो निओ अधिक आकर्षक वाटते आणि तिला इतरांपासून वेगळे ठरवते. यात दोन नवीन इंटीरियर थीम पर्याय आहेत – लुनर ग्रे आणि मोचा ब्राउन – जे या गाडीचा एकूणच लूक अधिक आकर्षक करतात. तरुण, महत्त्वाकांक्षी शहरी आणि निम शहरी ग्राहकांसाठी बोलेरो निओ हा उत्तम पर्याय आहे, जे प्रगत तंत्रज्ञान, समकालीन स्टाइल तसेच आरामदायी प्रवासाच्या शोधात आहेत. आरामदायी प्रवास आणि अन्य सुविधा असल्या तरी यात बोलेरोचा मजबूत डीएनए कायम आहे.
लेदरेट अपहोल्स्ट्री आणि सुधारित सीट एर्गोनॉमिक्ससह आरामदायीपणाला प्राधान्य दिले जाते. 22.8 सेमी इन्फोटेनमेंट सिस्टममध्ये रिअर-व्ह्यू कॅमेरा आणि यूएसबी सी-टाइप चार्जिंग पोर्ट आहे. प्रगत राइड आणि हँडलिंग टेक – राइडफ्लो – एमटीव्ही-सीएल आणि फ्रिक्वेन्सी डिपेंडंट डॅम्पिंगमुळे (एफडीडी) खडकाळ रस्त्यांवरही सुरळीत प्रवास सुनिश्चित होतो. याशिवाय सुधारित स्टीअरिंग फीडबॅक, हाताळणीतील अचूक आणि सुधारित ब्रेक डायनॅमिक्स अशा वैशिष्ट्यांचा देखील चालवताना फायदा होतो. 73.5 किलोवॅटची शक्ती आणि 260 एनएम टॉर्क तसेच mHAWK100 इंजिनद्वारे समर्थित बोलेरो निओमध्ये लॉकिंग डिफरेंशियलमुळे खडकाळ रस्त्यांवरील वाढत्या ट्रॅक्शनसाठी क्रूझ कंट्रोल आणि मल्टी-टेरेन टेक्नॉलॉजी (एमटीटी) समाविष्ट आहे. सध्या असलेल्या डायमंड व्हाइट, स्टील्थ ब्लॅक, पर्ल व्हाइट आणि रॉकी बेज या रंगांसह जीन्स ब्लू, काँक्रीट ग्रे आणि तीन ड्युअल-टोन पर्याय नवीन रंगांमध्ये उपलब्ध आहेत.
किंमत आणि प्रकार
नवीन बोलेरो (एक्स-शोरूम)
नवीन बोलेरो निओ (एक्स-शोरूम)
प्रकार
किंमत
प्रकार
किंमत
बोलेरो B4
₹ 7.99 लाख
बोलेरो निओ N4
₹ 8.49 लाख
बोलेरो B6
₹ 8.69 लाख
बोलेरो निओ N8
₹ 9.29 लाख
बोलेरो B6(O)
₹ 9.09 लाख
बोलेरो निओ N10*
₹ 9.79 लाख
बोलेरो B8
₹ 9.69 लाख
बोलेरो निओ N11
₹ 9.99 लाख
* N 10 पर्यायी प्रकार वेगळ्या किमतीत उपलब्ध. अधिकृत महिंद्र डीलरशिपवर संपूर्ण माहिती मिळेल.
परिशिष्ट
नवीन बोलेरो – प्रमुख वैशिष्ट्ये
B4
B6
B8 (new variant)
अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS)
ड्रायव्हर आणि सह-ड्रायव्हर एअरबॅग्ज
रिव्हर्स पार्किंग सेन्सर
सीट बेल्ट रिमाइंडर
(समोरील सीट्स)
स्पेअर व्हील कव्हर
पॉवर स्टीअरिंग
इंजिन स्टार्ट-स्टॉप
(मायक्रो हायब्रिड)
डिजिटल क्लस्टर
7-सीट (व्हिनाइल)
तिसऱ्या रांगेतील फोल्ड करण्यायोग्य सीट
नवीन भर
बोल्ड नवीन ग्रिल
नवीन रंग (स्टील्थ ब्लॅक)
राइडफ्लो टेक
B4 च्या वैशिष्ट्यांसोबतच
पॉवर विंडोज
रिमोटसह चावी
7-सीट (फॅब्रिक)
12 व्ही चार्जिंग पॉइंट
सेंट्रल लॉकिंग
नवीन भर
डीप सिल्व्हर व्हील कॅप्स
17.8 सेमी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम
स्टीअरिंग माउंटेड ऑडिओ कंट्रोल्स
यूएसबी सी-टाइप चार्जिंग पोर्ट
B6(O) च्या वैशिष्ट्यांसोबतच
डायमंड कट अलॉय व्हील्स
लेदरेट अपहोल्स्ट्री
B6 (O)
B6 च्या वैशिष्ट्यांसोबतच
स्टॅटिक बेंडिंग हेडलॅम्प
ड्रायव्हर इन्फॉर्मेशन सिस्टीम
रीअर वॉश आणि वायपर
नवीन भर
समोरील फॉग लॅम्प्स
नवीन बोलेरो निओ – प्रमुख वैशिष्ट्ये
N4
N10
N11 (new variant)
बॉडी कलर बंपर्स
एक्स-शेप स्पेअर व्हील कव्हर
8.9 सेमी एलसीडी क्लस्टर डिस्प्ले
7-सीट (व्हिनाइल)
तिसऱ्या रांगेत फोल्ड करण्यायोग्य सीट
इको मोड
पॉवर स्टीअरिंग
पॉवर विंडो फ्रंट आणि रियर
इंजिन स्टार्ट-स्टॉप (मायक्रो हायब्रिड)
12 व्ही चार्जिंग पॉइंट
ड्रायव्हर आणि को-ड्रायव्हर एअरबॅग्ज
एबीएस + ईबीडी
कॉर्नर ब्रेकिंग कंट्रोल
फोल्ड करण्यायोग्य तिसऱ्या रांगेतील सीट
नवीन भर
आकर्षक नवीन ग्रिल
नवीन रंग (काँक्रीट ग्रे)
नवीन इंटीरियर थीम
(मोचा ब्राउन)
राइडफ्लो टेक
N8 च्या वैशिष्ट्यांसोबतच
स्टॅटिक बेंडिंग हेडलॅम्प
हेडलॅम्पमध्ये DRL
फॉग लॅम्प
फ्रंट आर्मरेस्ट
दुसऱ्या रांगेत आर्मरेस्ट
ऍडजस्टेबल ड्रायव्हर सीट
22.8 सेमी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम
क्रूझ कंट्रोल
इलेक्ट्रिकली ऍडजस्टेबल ORVM
फॉलो मी होम हेडलॅम्प
रियर ग्लास वायपर आणि डिफॉगर
चाइल्ड सीटसाठी ISOFIX माउंट्स
नवीन भर
R15 सिल्व्हर अलॉय व्हील्स
रियर व्ह्यू कॅमेरा
USB C-प्रकार चार्जिंग पोर्ट
N 10 (O) – मल्टी-टेरेन टेक्नॉलॉजी (MTT) सह
N10 च्या वैशिष्ट्यांसोबतच
ड्युअल टोन कलर
R16 डार्क मेटॅलिक ग्रे अलॉय व्हील्स
नवीन इंटीरियर थीम
(लुनर ग्रे)
लेदरेट अपहोल्स्ट्री (लुनर ग्रे)
N8
N4 च्या वैशिष्ट्यांसोबतच
व्हील आर्च क्लॅडिंग
ड्युअल टोन
ORVM
7-सीट (फॅब्रिक)
फोल्ड करण्यायोग्य दुसऱ्या रांगेतील सीट
म्युझिक प्लेअर
(ब्लूटूथ, USB, AUX)
स्टीअरिंग माउंटेड ऑडिओ
कंट्रोल्स
रिमोट की एंट्री
व्हर्सा व्हील
नवीन भर
नवीन रंग (जीन्स ब्लू)