🚩🚩 दि. ५ ऑक्टोबर २०२५, शिक्षण प्रसारक मंडळी (एस. पी. कॉलेज), लेडी रमाबाई हॉल येथे जनजाती कल्याण आश्रमाच्या “दिनदर्शिका २०२६ प्रकाशन” सोहळ्या निमित्ताने एक अविस्मरणीय भेट घडली —
✨ पद्मश्री पुरस्कार सन्मानित श्री. चैत्रामजी पवार — संघ स्वयंसेवक, अफलातून आणि निसर्गप्रेमी व्यक्तिमत्त्व!
पद्मश्री पुरस्कार सन्मानित श्री. चैत्रामजी पवार.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.प्रल्हादजी राठी, ( संस्थापक, रामसुख रिसॉर्ट, रामसुख डेव्हलपर ) श्री. प्रकाश धोका, (अध्यक्ष) श्री. सतीश मोकाशी, (सचिव) जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर या मान्यवरांच्या हस्ते “दिनदर्शिका २०२६” चे प्रकाशन करण्यात आले.
याप्रसंगी श्री. चैत्रामजी पवार यांची मुलाखत प्रा . श्री. सुधीरजी गाडे ( प्राध्यापक, आबासाहेब गरवारे महाविद्यालय ) यांच्या तर्फे घेण्यात आली.
संघ शताब्दी वर्षात मिळालेली ही भेट आमच्या आयुष्यातील अत्यंत आगळीवेगळी ठरली. आम्ही नांदेड सिटीहून २० स्वयंसेवक या कार्यक्रमासाठी विशेष आलो होतो.
आमच्या सोबत ज्येष्ठ स्वयंसेवक श्री. प्रकाश गोरे, श्री. शशिकांत मंत्री (काका), श्री. चंद्रकांत गोडबोले (काका), प्रा. डॉ. अशोक वाकोडकर, श्री. आशुतोष भावे, ॲड. श्रीराम जोशी आणि रोनक सुराणा उपस्थित होते.
⸻
🌾 ग्रेट भेट : श्री. चैत्रामजी पवार
डॉ. आनंद फाटक यांच्या प्रेरणेने आणि संघाच्या विचारातून घडलेले हे व्यक्तिमत्त्व —
ज्यांनी बारीपाडा गावाला नंदनवनात रूपांतरित केले!
शिक्षण, आरोग्य, रोजगार, अर्थकारण आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचा योग्य वापर करून त्यांनी “माणसातला माणूस” जागवण्याचं भगीरथ कार्य केलं आहे.
त्यांच्या या कार्याची दखल घेऊन शासनाने त्यांना “पद्मश्री पुरस्कार” बहाल केला.
त्यांच्या कार्यामुळे भारतातच नव्हे तर जगभरात त्यांच्या योगदानाची नोंद झाली आहे.
⸻
🌱 आदर्श जीवनशैली
खेड्यातला साधा माणूस पण आत्मीयता, तळमळ, निश्चय आणि संघाचा दृढ विचार —
यांच्या आधारे त्यांनी जे घडवलं ते खरोखर प्रेरणादायी आहे.
कर्ज फक्त आवश्यक तेवढं घेणे, योग्य उपयोग करणे, आणि परतफेड करणे —
फुकट कशाचीही अपेक्षा न ठेवता जगण्याची नीती त्यांनी आदिवासी, जनजाती समाजासमोर ठेवली.
“काम करत राहा, स्वस्त बसू नका” हा त्यांचा जीवनमंत्र आजच्या तरुण उद्योजकांसाठी दीपस्तंभ आहे.
⸻
🌞 मानवतेचा संदेश
“मी कोणत्या जातीत किंवा धर्मात जन्म घ्यावा हे माझ्या हातात नसले,
परंतु मी कर्माने माझे आईवडील आणि समाज मोठे करू शकतो”
— हे चैत्रामजींनी आपल्या आयुष्याने दाखवून दिलं.
त्यांची साधेपणा, आत्मीयता आणि विचारशक्ती पाहून आम्ही धन्य झालो.
बारीपाडा परिसर प्रत्यक्ष पाहण्याची आमची उत्सुकता आणखीनच वाढली आहे.
⸻
✨ अनेक पुरस्कार मिळूनही ते आजही साधेपणाने जगतात —
यातच त्यांच्या महानतेचं खरं मोल आहे.
जर समाजसेवा हीच राष्ट्रभक्ती असेल,
तर श्री. चैत्रामजी पवार हे भगवंताने पाठवलेले खरे दूत आहेत.
सिमेंटच्या शहरांपेक्षा जंगलात पर्यावरणस्नेही जीवनमूल्य उभं करणारे खरे उद्योजक म्हणजेच चैत्रामजी पवार!
🙏 तुमच्या कार्याला साष्टांग नमस्कार आणि मनःपूर्वक सलाम.
हा देश आणि हा समाज पिढ्यानपिढ्या तुम्हाला लक्षात ठेवेल
आणि तुमच्या कार्यातून प्रेरणा घेत राहीलजनजाती कल्याण आश्रमाच्या दिनदर्शिके ची किंमत ₹ ४०/- रु. आहे; सर्वांनी विकत घेऊन या राष्ट्रकाऱ्यात आपले आर्थिक योगदान द्यावे आणि ही दिनदर्शिका घरात लावावी.