गेरा’स जॉय ऑन द ट्रीटॉप्स, हिंजवडी येथे गेरा डेव्हलपमेंट्सकडून “मीट द आयकॉन – श्यामक दावर” कार्यक्रमाचे आयोजन

तारां कित Avatar

 

 

पुणे, ०६ ऑक्टोबर २०२५: पुणे, गोवा, बेंगळुरू आणि कॅलिफोर्निया (अमेरिका) येथे प्रीमियम निवासी व व्यावसायिक प्रकल्पांची निर्मिती करणारे आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील आघाडीचे नाव असलेले गेरा डेव्हलपमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड (GDPL) यांनी भारतातील प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक आणि परफॉर्मिंग आर्ट्स क्षेत्रातील दूरदर्शी व्यक्तिमत्त्व श्यामक दावर यांच्या उपस्थितीत एक प्रेरणादायी आणि संस्मरणीय संध्याकाळ “गेरा’स जॉय ऑन द ट्रीटॉप्स”, हिंजवडी येथे साजरी केली.

 

“मीट द आयकॉन” या विशेष कार्यक्रमात गेरा’स चाइल्डसेंट्रिक® होम्सचे रहिवासी आणि पाहुणे मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. कार्यक्रमादरम्यान श्यामक दावर यांनी कुटुंबांसोबत संवाद साधत पालक आणि मुलांसोबत एक आनंददायी नृत्य सत्र घेतले.

 

या प्रसंगी गेरा डेव्हलपमेंट्सचे चेअरमन श्री. कुमार गेरा म्हणाले,

“आमचा उद्देश मुलांना विविध क्षेत्रांमध्ये संधी देण्याचा आणि त्यांच्या आत दडलेली प्रतिभा ओळखून तिला विकसित करण्याचा आहे. घर हे केवळ आराम आणि सुरक्षिततेचे ठिकाण नसून, ते मुलांच्या सर्वांगीण विकासाचे व्यासपीठ असावे, अशी आमची धारणा आहे. चाइल्डसेंट्रिक® होम्स या संकल्पनेद्वारे आम्ही देशातील सर्वात प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांना आपल्या समुदायात आणण्याचा प्रयत्न केला आहे. मागील दहा वर्षांपासून आमच्या टीमने या दृष्टीने पालक व मुलांशी सातत्याने संवाद साधला आहे. श्यामक दावर यांच्यासारख्या तज्ज्ञांच्या सहकार्याने आम्ही मुलांना प्रयोग, शोध आणि स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी सक्षम असे वातावरण देत आहोत.”

 

श्यामक दावर म्हणाले,

“गेरा’स चाइल्डसेंट्रिक® होम्स सोबतचे माझे सहकार्य विशेष आहे, कारण यामुळे परफॉर्मिंग आर्ट्स आणि नृत्याचे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण कुटुंबांच्या दारातच पोहोचते. माझा पालकांना सल्ला असा आहे की, मुलांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात प्रोत्साहन द्या—ते नृत्य असो, संगीत असो किंवा खेळ. योग्य मार्गदर्शन आणि जपणुकीच्या वातावरणात प्रत्येक मूल चमकू शकते.”

 

कार्यक्रमातील विशेष आकर्षण म्हणजे कुमार गेरा आणि श्यामक दावर यांच्यातील मनमोकळा “फायरसाईड चॅट” सत्र. या संवादात दोघांनीही मुलांच्या प्रतिभेला दिशा देण्यासाठी सहकार्याचे महत्त्व, सर्जनशील वातावरणाची गरज आणि आव्हानांना सामोरे जाण्याची प्रेरणा यांवर चर्चा केली. श्यामक यांनी स्वतःच्या संघर्षांचा उल्लेख करत सांगितले की, नृत्य क्षेत्रातील पूर्वग्रह मोडून काढण्यासाठी आधार देणारी व्यावस्था किती महत्त्वाची असते. त्यांनी गेरा समूहाच्या सातत्यपूर्ण गुणवत्तेचे कौतुक करत आपल्या जागतिक अकॅडमींच्या शिस्तीशी त्याची तुलना केली.

 

या उपक्रमामुळे गेरा डेव्हलपमेंट्सने रहिवाशांना केवळ आलिशान जीवनशैलीच नव्हे, तर शिक्षण, संस्कार आणि सर्वांगीण विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या आपल्या बांधिलकीला पुन्हा अधोरेखित केले आहे. गेरा’स चाइल्डसेंट्रिक® होम्सने आजवर शंकर महादेवन, पुल्लेला गोपीचंद, महेश भूपती, बायचुंग भुटिया, रोहित शर्मा, निशा मिलेट आणि श्यामक दावर यांसारख्या नामांकित व्यक्तींशी भागीदारी करून कला, क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकासाचे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण थेट त्यांच्या समुदायांपर्यंत पोहोचवले आहे.

Tagged in :

तारां कित Avatar