बीव्हीजी इंडियातर्फे 300 कोटी रु. फ्रेश इश्यू आणि 2.85 कोटी शेअर्सच्या ऑफर फॉर सेलसाठी डीआरएचपी सादर

तारां कित Avatar

देशातील सर्वात मोठी इंटिग्रेटेड फॅसिलिटी मॅनेजमेंट (IFM) सेवा पुरवठादार आणि पुण्यात मुख्यालय असलेल्या बीव्हीजी इंडिया लिमिटेड कंपनीने सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) कडे आपला ड्राफ्ट रेड हेअरिंग प्रॉस्पेक्टस (डीआरएचपी) दाखल केला आहे. त्याद्वारे कंपनी आपली प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) करणार आहे. या इश्यूमध्ये 300 कोटी रु. पर्यतच्या इक्विटी शेअर्सचे फ्रेश इश्यू आणि विद्यमान शेअरहोल्डर्सद्वारे 2.85 कोटी पर्यतच्या इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेल (OFS) समाविष्ट आहे. फ्रेश इश्यूमधून मिळणाऱ्या उत्पन्नापैकी 250 कोटी रु. चा वापर कर्जफेड किंवा कर्जाची आगाऊ परतफेड करण्यासाठी केला जाणार असून उर्वरित रक्कम सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्देशांसाठी वापरण्यात येईल.

 

 

 

औद्योगिक, व्यावसायिक, आरोग्यसेवा, शिक्षण, प्रशासन आणि वाहतूक पायाभूत सुविधा अशा विविध क्षेत्रातील ग्राहकांना सेवा पुरवत कंपनी इंटिग्रेटेड फॅसिलिटी मॅनेजमेंट (IFM), इमर्जन्सी रिस्पॉन्स सर्व्हिसेस (ERS) आणि एन्व्हायरन्मेंट अँड सस्टेनेबिलिटी सर्व्हिसेस (ESS) अशा तीन व्यवसाय शाखांद्वारे कार्यरत आहे. IFM अंतर्गत, बीव्हीजी इंडिया यांत्रिक हाऊसकीपिंग, जनिटोरियल सर्व्हिसेस, औद्योगिक हाऊसकीपिंग, मनुष्यबळ पुरवठा, सुरक्षा, ऑफिस सपोर्ट आणि रिटेल फ्युएल आउटलेट मेंटेनन्स अशा सॉफ्ट सर्व्हिसेस देते; तसेच इलेक्ट्रो-मेकॅनिकल वर्क्स, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल अँड प्लंबिंग (MEP) सेवा, दुरुस्ती व देखभाल, रस्ते व्यवस्थापन, शहर स्वच्छता आणि पायाभूत सुविधा देखभाल अशा हार्ड सर्व्हिसेस देते; तसेच केटरिंग, पेंट-शॉप क्लिनिंग, बॅक-ऑफिस सपोर्ट, लॉजिस्टिक्स मॅनेजमेंट आणि फ्लीट ऑपरेशन (EV बस व्यवस्थापन यांसह) अशा स्पेशलाइज्ड सर्व्हिसेस पुरवते. कंपनी ही इंडियन रेल्वेचीही विश्वासार्ह भागीदार असून, स्टेशन फॅसिलिटी ऑपरेशन्स, रोलिंग स्टॉक आणि ट्रॅक देखभाल तसेच ऑन-बोर्ड हाऊसकीपिंगचे व्यवस्थापन करते.

 

 

 

ERS अंतर्गत, बीव्हीजी इंडियाने भारतात पोलीस इमर्जन्सी रिस्पॉन्स सेवा सुरू केली आणि प्रगत वैद्यकीय उपकरणांनी सुसज्ज व डॉक्टर्स नियुक्त असंलेल्या ॲम्ब्युलन्सची सुरुवात केली. विशेष म्हणजे, ॲम्ब्युलन्समध्ये डॉक्टर्स नियुक्त करण्याची पद्धत बीव्हीजी इंडियाने सुरू केली. त्यामुळे आपत्कालीन वैद्यकीय सेवांमध्ये नवे मापदंड प्रस्थापित झाले आणि सार्वजनिक सेवा वितरणात कंपनीचे नेतृत्व अधिक दृढ झाले. ESS अंतर्गत, कंपनी कचरा व्यवस्थापन, होर्टीकल्चर, लँडस्केपिंग, वनीकरण, तलाव पुनरुज्जीवन, स्मार्ट सिटी प्रकल्प अशा सेवा पुरवते. तसेच सोलर मॉड्यूल्सचे उत्पादन आणि देशभरातील सौर प्रकल्पांसाठी जोडणी व देखभाल सेवा पुरवते.

 

 

 

31 मार्च 2025 पर्यंत बीव्हीजी इंडियाकडे देशभरात 2,218 सक्रिय साइट्सवर कार्यरत 85,000 पेक्षा जास्त कर्मचारी होते. त्यामुळे फॅसिलिटी मॅनेजमेंट क्षेत्रातील ती सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. आर्थिक वर्ष 25 मध्ये, कंपनीने 3,301.8 कोटी रु. चे कामकाजामधून उत्पन्न, 3,319.5 कोटी रु. चे एकूण उत्पन्न आणि 207.2 कोटी रु. चा करपश्चात नफा नोंदवला. त्यामुळे इक्विटी वरील परतावा (ROE) 17.44% इतका ठरला. कंपनीची मजबूत आर्थिक कामगिरी आणि वैविध्यपूर्ण बिझनेस मॉडेल नफा टिकवून ठेवताना कामकाज विस्तारण्याची क्षमता अधोरेखित करते.

 

 

 

हा आयपीओ आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड, जेएम फायनान्शियल लिमिटेड आणि मोतिलाल ओसवाल इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायजर्स लिमिटेड द्वारे व्यवस्थापित केला जाणार असून एमयूएफजी इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड रजिस्ट्रार म्हणून काम करेल.

 

 

 

जागतिक आउटसोर्स्ड फॅसिलिटी मॅनेजमेंट (FM) बाजारपेठ 2024 मध्ये 1,030 अब्ज अमेरिकन डॉलर इतकी होती. 2019 ते 2024 दरम्यान 4.2% ने CAGR वाढला आहे. महामारीमुळे झालेल्या अडथळ्यानंतर 2021 उशिरा पर्यंत ही बाजारपेठ पुन्हा 2020 पूर्वीच्या खर्चाच्या पातळीवर आली. पायाभूत सुविधा क्षेत्रातील वाढती गुंतवणूक, वेगवान औद्योगिकीकरण, स्मार्ट बिल्डिंग्सचा विकास आणि डिजिटल सोल्युशन्सचा वाढता स्वीकार यामुळे ही बाजारपेठ भविष्यात जोरदार वाढेल असा अंदाज आहे. उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमध्ये स्वच्छ, हरित आणि स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर विकसित करण्यासाठी खाजगी ऑपरेटर्सना करारबद्ध करण्याच्या सरकारी उपक्रमांमुळे अधिक संधी उपलब्ध होत आहेत. 2029 पर्यंत, आउटसोर्स्ड FM बाजारपेठ 1,495.1 अब्ज अमेरिकन डॉलरवर पोहोचेल असा अंदाज आहे. त्यासाठी 2024 ते 2029 दरम्यान CAGR 7.7% राहील.

 

 

 

आपले नेतृत्वस्थान, विविध सेवा पोर्टफोलिओ, मजबूत अंमलबजावणी रेकॉर्ड आणि शाश्वततेप्रती बांधिलकीमुळे, बीव्हीजी इंडिया ही उद्योगातील या अनुकूल परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी आणि भारतातील इंटिग्रेटेड फॅसिलिटी मॅनेजमेंट व संबंधित सेवांमध्ये अग्रगण्य स्थान अधिक दृढ करण्यासाठी धोरणात्मकदृष्ट्या सक्षम आहे.

 

 

DRHP Link: https://bvgindia.com/wp-content/uploads/2025/10/BVG_DRHP.pdf

Tagged in :

तारां कित Avatar