स्पोर्टीयर, क्षमतेची अधिक गतीशील अभिव्यक्ती, जी विशिष्ट व प्रीमियम एसयूव्ही अनुभवाचा शोध घेत असलेल्या ग्राहकांसाठी डिझाइन करण्यात आली आहे.
आकर्षक नवीन लुकसह रिडिझाइन करण्यात आलेले ग्रिल, स्पोर्टी स्पॉयलर्स, ड्युअल-टोन रूफ, सिग्नेचर हूड एम्ब्लेम आणि चकाकणारे ब्लॅक अलॉईज.
सुधारित इंटीरिअरमध्ये ड्युअल-टोन सीट्स व डोअर ट्रिम, स्मार्ट ऑटो-फोल्ड मिरर्स, प्रकाशित स्कफ प्लेट्स आणि अतिरिक्त सुरक्षिततेसाठी प्रगत टीपीएमएस आहे.
४x२ ऑटोमॅटिक व मॅन्युअल ट्रान्समिशन व्हेरिएण्ट्समध्ये उपलब्ध.
रंग पर्याय: अॅटिट्यूड ब्लॅक, सुपर व्हाइट, पर्ल व्हाइट आणि सिल्व्हर.
बेंगळुरू, ८ ऑक्टोबर २०२५: २०२४ लीडर एडिशनच्या यशाला अधिक पुढे घेऊन जात टोयोटा किर्लोस्कर मोटर (टीकेएम) २०२५ फॉर्च्युनर लीडर एडिशनच्या लाँचसह अधिक आकर्षक प्रभाव पाडण्यास सज्ज आहे. सुधारित स्टायलिंग व प्रीमियम सुधारणांसह ही नवीन एडिशन रस्त्यावर फॉर्च्युनरच्या आकर्षक उपस्थितीला अधिक ठळकपणे दर्शवते, तसेच ग्राहकांना स्पोर्टीयर आणि अधिक गतीशील अपील देते.
नवीन फॉर्च्युनर लीडर एडिशन अद्वितीय कार्यक्षमतेसह समकालीन स्टायलिंगचा शोध घेत असलेल्या एसयूव्हीप्रेमींच्या महत्त्वाकांक्षांची पूर्तता करण्यासाठी काळजीपूर्वक डिझाइन करण्यात आली आहे. फॉर्च्युनरच्या वारसाशी बांधील राहत लीडर एडिशन सर्वोत्तम कार्यक्षमता, विश्वसनीय ऑफ-रोड क्षमता आणि २.८ लिटर डिझेल इंजिनच्या शक्तीसह अपवादात्मक ड्राइव्ह आरामदायीपणा देते. २०२५ फॉर्च्युनर लीडर एडिशन ४x२ ऑटोमॅटिक व मॅन्युअल ट्रान्समिशन व्हेरिएण्ट्समध्ये, तसेच अॅटिट्यूड ब्लॅक, सुपर व्हाइट, पर्ल व्हाइट आणि सिल्व्हर या रंगांमध्ये उपलब्ध आहे.
या लाँचबाबत मत व्यक्त करत टोयोटा किर्लोस्कर मोटरच्या सेल्स-सर्विस-युज्ड कार बिझनेसचे उपाध्यक्ष श्री. वरिंदर वाधवा म्हणाले, ”टोयोटामध्ये आम्हाला आमच्या ग्राहकांचे सर्वसमावेशक जीवनशैली प्राधान्यक्रम आमच्या ऑफरिंग्ज नवीन व उत्साहित करत राहण्यास प्रेरित करतात. आम्ही २०२४ फॉर्च्युनर लीडर एडिशनला दिलेली चांगली स्वीकृती व उत्साहपूर्ण प्रतिसादासाठी कृतज्ञ आहोत, ज्यामुळे भारतातील रस्त्यांवर आयकॉन म्हणून एसयूव्हीचा दर्जा अधिक प्रबळ झाला आहे.
या विश्वासामधून प्रेरणा घेत आम्हाला २०२५ फॉर्च्युनर लीडर एडिशन लाँच करण्याचा आनंद होत आहे. ही वेईकल स्पोर्टीयर, अधिक गतीशील एसयूव्हीचा शोध घेणाऱ्यांसाठी आहे. आम्हाला विश्वास आहे की, ही नवीन एडिशन ग्राहकांना अधिक आनंदित करेल आणि प्रीमियम एसयूव्ही श्रेणीमध्ये मापदंड म्हणून फॉर्च्युनरचा दर्जा अधिक दृढ करेल.”
अनेक नवीन स्टायलिंग घटक जसे नवीन ग्रिल डिझाइनसह फ्रण्ट व रिअर बम्पर स्पॉयलसट आणि क्रोम गार्निश २०२५ फॉर्च्युनर लीडर एडिशनच्या आयकॉनिक दर्जामध्ये अधिक भर करतात. काळ्या रंगामधील ड्युअल-टोन रूफ वेईकलच्या प्रीमियममध्ये अधिक आकर्षकतेची भर करते आणि वेईकलची साहसी विशिष्टता वाढवते. काळ्या रंगामधील चकाकणरे अलॉई व्हील्स आणि विशिष्ट हूड एम्ब्लेम प्रत्येक प्रवासादरम्यान लक्षवेधक उपस्थितीची खात्री देतात.
नवीन फॉर्च्युनर लीडर एडिशनच्या इंटीरिअरमधून वेईकलचा सुधारित स्पोर्टीनेस त्वरित दिसून येतो. ब्लॅक व मरून रंगामधील ड्युअल-टोन सीट्स आणि डोअर ट्रिम्समधून आकर्षकता दिसून येते, तसेच ऑटो-फोल्ड होणारे मिरर्स, प्रकाशित स्कफ प्लेट्स स्टाइल व सोयीसुविधा वाढवतात. प्रगत वैशिष्ट्ये जसे टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (टीपीएमएस) वेईकलच्या एकूण सुरक्षितता पॅकेजला अधिक मजबूत करते. प्रत्येक घटक ड्रायव्हिंग अनुभव उत्साहित करण्यासाठी, तसेच फॉर्च्युनरचा आरामदायीपणा व विश्वसनीयतेचा हॉलमार्क कायम ठेवण्यासाठी बारकाईने डिझाइन करण्यात आले आहेत.
२०२५ फॉर्च्युनर लीडर एडिशनची खासियत म्हणजे टोयोटाचे प्रमाणित १जीडी-एफटीव्ही २.८-लिटर टर्बोचार्ज इंजिन, जे उच्च दर्जाची कामगिरी व कार्यक्षमतेसाठी व्हेरिएबल जिओमेट्री टर्बोचार्जरसह सुसज्ज आहे. प्रभावी २०१ बीएचपी शक्ती आणि ५००* एनएम टॉर्क देत इंजिनसोबत ६-स्पीड मॅन्युअल किंवा ६-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आहे, ज्यामधून सहजपणे पॉवर डिलिव्हरी आणि ड्रायव्हिंगदरम्यान अधिक आरामदायीपणाची खात्री मिळते. रिअर-व्हील ड्राइव्ह (आरडब्ल्यूडी) ४x२ कॉन्फिग्युरेशनसह नवीन फॉर्च्युनर लीडर एडिशनमध्ये लक्षवेधक कार्यक्षमता आणि दैनंदिन ड्रायव्हिंग क्षमतेचे उत्तम संतुलन आहे, ज्यामुळे ही वेईकल विविध रस्त्यांसाठी वैविध्यपूर्ण सोबती आहे.
ग्राहकांना परिपूर्ण समाधान देण्याासठी फॉर्च्युनर लीडर एडिशन व्हेरिएण्ट्सना सर्वोत्तम फायनान्स सोल्यूशन्सच्या श्रेणीचे पाठबळ आहे, ज्यामध्ये जवळपास ८ वर्षांच्या फंडिग प्लॅन्ससह कमी ईएमआय, टोयोटा स्मार्ट बलून फायनान्स आणि विस्तारित वॉरंटी व टोयोटा जेन्यूएन अॅक्सेसरीज अशा मूल्यवर्धित सेवांसाठी पूर्व-मान्य केलेल्या पर्यायांचा समावेश आहे. याला पूरक पाच वर्षांचे कॉम्प्लीमेण्टरी रोडसाइड असिस्टण्स, जवळपास ५ वर्षे / २२०,००० किमीपर्यंत विस्तार करता येणारी प्रमाणित ३-वर्ष / १००,००० किमी वॉरंटी आणि कस्टमायझेबल टोयोटा स्माइल्स प्लस सर्विस पॅकेज आहे, ज्यासह विनासायास आणि चिंता-मुक्त मालकीहक्क अनुभवाची खात्री मिळते.
१५ वर्षांपूर्वी पदार्पण केल्यापासून फॉर्च्युनरने भारतातील सर्वात लोकप्रिय व विश्वसनीय एसयूव्ही म्हणून आपला दर्जा स्थापित केला आहे. बुलेटप्रूफ विश्वसनीयता, रस्त्यावर लक्षवेधक उपस्थिती, कालातीत एसयूव्ही डिझाइन आणि अस्सल ४x४ क्षमतेसाठी लोकप्रिय असलेली फॉर्च्युनर मापदंड स्थापित करत आहे, जी तिच्या श्रेणीमध्ये अद्वितीय आहे. या वेईकलच्या ३,००,००० हून अधिक युनिट्सची विक्री झाली आहे.
२०२५ फॉर्च्युनर लीडर एडिशनसाठी बुकिंगला ऑक्टोबर २०२५ च्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरूवात होईल. ग्राहक ऑनलाइन www.toyotabharat.com येथे किंवा त्यांच्या जवळच्या टोयोटा डिलरशिपला भेट देऊन त्यांची वेईकल रिझर्व्ह करू शकतात.
कृपया किमतींसाठी जवळच्या डिलरशिप
शी संपर्क साधा.