Sunday, August 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedक्रॉक्स™ने रश्मिका मंदाना आणि लोकप्रिय क्रिएटर्ससोबत मिळून सणासुदीच्या हंगामातील आनंद वाढवण्यासाठी नवीन...

क्रॉक्स™ने रश्मिका मंदाना आणि लोकप्रिय क्रिएटर्ससोबत मिळून सणासुदीच्या हंगामातील आनंद वाढवण्यासाठी नवीन मोहिम सुरू केली

क्रॉक्स™आपल्या नवीन क्लासिक्स कलेक्शनसह सणासुदीचा आनंद साजरा करण्यासाठी ग्राहकांना आमंत्रित करत आहे, ज्यात आकर्षक, चमकदार जिबिट्झ समाविष्ट आहेत.

“यार बिना चैन” या गाण्याच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या क्रॉक्सच्या नवीन जाहिरातीमध्ये मैत्रीचा उत्साह आणि सणांचा आनंद आणि रेट्रो स्टाइलमधील मस्ती स्पष्टपणे दिसतो.

आरामदायी आणि स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाची झलक दाखवणाऱ्या स्टाइलसाठी प्रसिद्ध असलेला जागतिक फुटवेअर ब्रँड क्रॉक्सने सणांच्या हंगामात आनंद वाढवण्यासाठी आपली नवीन बहुप्रतिक्षित ‘शेअर द जॉय’ जाहिरात मोहिम सुरू केली आहे. गेल्या वर्षीच्या सणासुदीच्या यशानंतर, यावर्षी ब्रँड नव्या चमकदार मोहिमेसह समोर आला आहे आणि या मोहिमेचे नेतृत्व क्रॉक्सची ग्लोबल अ‍ॅम्बेसेडर रश्मिका मंदाना करत आहे.

या मोहिमेचा मुख्य उद्देश सणाच्या खऱ्या आनंदाला साजरा करणे आहे. सण म्हणजे परिपूर्ण नियोजन नव्हे, तर अचानक आलेले आनंदाचे क्षण आहे. हसण्याचे क्षण, मित्रांसोबत अनुभवलेले आनंदाचे क्षण आणि वैयक्तिक व्यक्तिमत्त्व या सर्व गोष्टींचा सणांच्या क्षणात अनुभव घेतला जातो. “यार बिना चैन” या जुन्या पण लोकप्रिय गाण्याच्या पार्श्वभूमीवर बनलेला हा व्हिडिओ रेट्रो स्टाइल सह ग्राहकांच्या उत्साही उर्जेने भरलेला आहे. रश्मिकासोबत क्रिएटर्स जॉन, यशराज, अक्षरा शिवकुमार, कुणाल भोसले, नोहारिका गंगारामाणी आणि लक्ष्मी शेट्टीही या मोहिमेत आहेत, जे प्रत्येकजण त्यांच्या स्वतःच्या स्टाइल, मजेशीर स्वभाव आणि उत्साहासह स्क्रीनवर दिसतात.

या मोहिमेच्या व्हिडिओमध्ये सणासुदीचा खरा अनुभव दाखवला आहे: रश्मिका शेवटच्या क्षणाला दिवाळी पार्टीची तयारी करताना दिसते. भिंती अजून रिकाम्या आहेत, मिठाई इकडे-तिकडे विखुरलेली आहे आणि पार्टीची पूर्ण तयारी झालीले नाही. ती लगेच आपल्या मित्रांना मदतीस बोलावते. काही वेळातच मित्रमंडळी येतात, सजावट सुरू होते, खाण्याचे पदार्थ आणि कपडे वाटले जातात, संपूर्ण वातावरण आनंद आणि हसण्याने भरून जाते. सगळीकडे रंग आणि चमक भरते. आणि नंतर उत्सव सुरू होतो.

या रंगीबेरंगी आणि उत्साही वातावरणात, क्रॉक्सचे क्लासिक क्लॉग्स आता नवीन स्टाइल आणि शानदार जिबिट्झ™ चार्म्ससह सादर करण्यात आले आहेत, जे सणासाठी परफेक्ट अॅक्सेसरी ठरतात. हे फुटवेअर पारंपरिक सणासुदीच्या भारतीय लुकनुसार डिझाइन केलेले आहेत जे प्रत्येक पावलावर उत्साह आणि चमक आणतात. हे फक्त फुटवेअर नसून, स्वतःची ओळख आणि आरामदायी अनुभव देण्याचे माध्यम आहेत, जे मोहिमेच्या व्यक्तिमत्त्व आणि आनंदाच्या तत्त्वाचे प्रतीक आहेत.

मोहीमेच्या लॉन्चबाबत बोलताना, क्रॉक्स इंटरनॅशनल मार्केटिंगचे प्रमुख यान ले बोझेक म्हणाले, “सण म्हणजे प्रत्येकासाठी वेगळा, मजेदार आणि खऱ्या क्षणांनी भरलेला अनुभव असतो. ‘शेअर द जॉय’ मोहिमेने दाखवले आहे की क्रॉक्स क्लासिक्स क्लॉग्स आणि आकर्षक जिबिट्झ चार्म्स या सेलिब्रेशन्समध्ये नैसर्गिकरीत्या कसे मिसळतात. आराम, चमक आणि वैयक्तिक स्टाईल व्यक्त करण्याची संधी देतात. या सणासुदीच्या हंगामात, आम्ही नवीन डिझाईन्स आणि रंगांसह ही उत्पादने बाजारात आणली आहेत, ज्यात बे वेल्वेट क्लोग आणि क्लोग प्लश प्लम यांचा समावेश आहे, जे ग्राहकांना त्यांच्या फ्यूजन फेस्टिव्ह लुकला अधिक खास आणि वैयक्तिक बनवण्यासाठी एक उत्तम अॅक्सेसरी ठरेल.”

कुल्फी कलेक्टिव्हचे सह-संस्थापक आणि चीफ क्रिएटिव्ह ऑफिसर अक्षत गुप्त म्हणाले,“दिवाळीला अनेकदा परिपूर्ण आणि चमकदार सण म्हणून दाखवले जाते, पण दिवाळीची खरी मजा त्या गोंधळलेल्या, खऱ्या क्षणांमध्ये आहे जे आपण आपल्या लोकांसोबत अनुभवतो. क्रॉक्ससोबत आम्ही हाच आनंद आणि उत्साह दाखवायचा प्रयत्न केला आहे. एक असा उत्सव जिथे प्रत्येकाचे व्यक्तिमत्त्व चमकते, मैत्रीमुळे सणाची मजा दुप्पट होते आणि प्रत्येकाची स्वतःची स्टाइल या मोहिमेचा भाग बनते. कारण आनंद आणि गोंधळभरे क्षण एकत्र साजरे करणे यामुळेच दिवाळी खरी दिवाळी वाटते.”

कुल्फी कलेक्टिव्हद्वारे तयार केलेल्या जाहिरातीत आजचे भारतातील ग्राहक सण नैसर्गिकपणे आणि जास्त क्षणांचा अनुभव घेऊन साजरे करतात, हे दाखवले आहे. फेरी लाइट्स लावणं असो, की शेवटच्या क्षणी कपड्यांची तयारी असो, या जाहिरातीमध्ये त्या नैसर्गिक आणि मजेशीर ऊर्जेचे चित्रण दाखवले आहे, जी सणांच्या आठवणी अविस्मरणीय बनवते.

ही 360-डिग्री मोहिम डिजिटल, सोशल मीडिया आणि रिटेल सर्व प्लॅटफॉर्मवर दिसणार आहे, ज्याद्वारे क्रॉक्स ग्राहकांना आनंद आणि एकत्रितपणासह सण साजरा करण्याचं आमंत्रण देत आहे. क्रॉक्सने नवीन सणाच्या स्टाइल्स आणि रंगांसह हे उत्पादन बाजारात आणले आहे, ज्यात बे वेल्वेट क्लॉग, स्टडेड क्लासिक क्लॉग, आणि क्रश क्लॉग प्लश प्लम यांचा समावेश आहे, जे प्रत्येक सणात चमक आणि स्टाईल वाढवतात. ही उत्पादने crocs.in, मिंत्रा आणि निवडक क्रॉक्स स्टोअर्सवर उपलब्ध असतील.

स्टोअर्समध्ये, या मोहिमेला सणासुदीच्या थीमनुसार व्हिज्युअल मर्चेंडायझिंगद्वारे सजवण्यात आलं आहे, जिथे *जिबिट्झ™*च्या आकर्षक सजावटी, खेळकर इन्स्टॉलेशन्स आणि रंगीबेरंगी डिस्प्लेद्वारे खरेदीचा अनुभव अधिक मजेदार बनवण्यात आला आहे. या माध्यमातून खरेदीदारांना सणाचा आनंद अनुभवताना त्यांचे आवडते स्टायलिश फुटवेअर नवीन आणि आनंदी पद्धतीने शोधता

येतील.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments