Sunday, August 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedमहसूल मंत्र्यांच्या पुढाकाराने बारामतीत ‘श्री. सावतामाळी सभागृह’ मार्गी* ...

महसूल मंत्र्यांच्या पुढाकाराने बारामतीत ‘श्री. सावतामाळी सभागृह’ मार्गी* *५०८ चौ.मी. जमीन नगरपरिषदेला; महसूल विभागाचा महत्वपूर्ण निर्णय*

 

 

*मुंबई दिनांक ९ ऑक्टोबर २०२५*

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने बारामती शहराच्या सांस्कृतिक विकासाला चालना देणारा महत्त्वपूर्ण निर्णय आज घेण्यात आला आहे. मौजे बारामती येथील श्री. सावतामाळी सभागृहाच्या बांधकामासाठी आवश्यक असलेली ५०८ चौरस मीटर शासकीय जमीन बारामती नगरपरिषदेला कब्जेहक्काने (भोगवटादार वर्ग-२) प्रदान करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.

 

सिटी सर्वे क्रमांक ९० आणि १२९ मधील एकूण ५०८ चौरस मीटर जमीन नगरपरिषदेला विनामूल्य न देता, चालू बाजारमूल्य वसूल करून हस्तांतरित केली जाणार आहे. यामुळे शासनाला आर्थिक उत्पन्न मिळेल आणि नगरपरिषदेला सभागृह बांधकामासाठी आवश्यक जागा उपलब्ध होईल. या जमीन हस्तांतरणासोबत शासनाने काही महत्त्वाच्या अटी लागू केल्या आहेत.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “श्री. सावतामाळी सभागृहाच्या बांधकामामुळे बारामतीच्या सांस्कृतिक आणि सामाजिक गरजा पूर्ण होण्यास मदत होईल. हा प्रकल्प शहराच्या विकासात मोलाची भर घालेल.”

_____

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments