पुणे, १० ऑक्टोबर २०२५ : ह्युंडाई मोटर इंडिया लि.(एचएमआयएल) तर्फे ‘ह्युंडाई ऑलवेज अराउंड’ मोहीम सादर करण्यात आली आहे.ही मोहीम सध्याच्या व नवीन ग्राहकांसाठी आहे. रविवार, १२ ऑक्टोबर २०२५ रोजी एक दिवसीय राष्ट्रव्यापी उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या मोहिमेत ग्राहकांना आकर्षक ऑफर्स आणि सवलतींसह मोफत वाहन तपासणीची सुविधा दिली जाणार आहे. नवीन ग्राहकांना एकाच ठिकाणी ह्युंडाई वाहनांची श्रेणी पाहता येईल आणि टेस्ट ड्राइव्ह करता येईल. या मोहिमेत ग्राहकांसाठी त्यांच्या जवळच्या सोयीस्कर ठिकाणी खास ऑफर आणि सेवा सादर केल्या जातील.
ह्युंडाई मोटर इंडिया लिमिटेड तर्फे ‘ ह्युंडाई ऑलवेज अराउंड’ मोहीम सादर
Share with
Tagged in :