कावासाकी, जपान – तोशिबा एनर्जी सिस्टीम्स अँड सोल्युशन्स कॉर्पोरेशनने (तोशिबा) आज घोषणा केली की, तोशिबा JSW पॉवर सिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेड या आपल्या अभियांत्रिकी, उत्पादन आणि वीज प्रकल्प उपकरणांसाठीची भारतीय उपकंपनीने, NTPC लिमिटेड, या भारतातील सरकारी मालकीच्या वीज निर्मिती कंपनीसोबत NTPC किंवा त्यांच्या संयुक्त उपक्रमांच्या मालकीच्या आणि चालवल्या जाणाऱ्या १६५ औष्णिक आणि अक्षय ऊर्जा प्रकल्पांसाठी केंद्रीकृत देखरेख प्रणालीची तरतूद करण्यासाठी करार केला असून, त्यामध्ये सध्या नियोजन टप्प्यावर असलेल्या प्रकल्पांचा समावेश आहे.
या करारामुळे NTPC ने अशा प्रकारचा प्लांट मॉनिटरिंग उपाय प्रथमच लागू केला आहे. २०२७ च्या वसंत ऋतूमध्ये कार्य सुरू करण्यासाठी नियोजित असलेल्या या प्रणालीमध्ये तोशिबाचे प्रगत प्लांट मॉनिटरिंग सॉफ्टवेअर, EtaPRO देखील समाविष्ट असेल, हे एक सिद्ध सॉफ्टवेअर असून सध्या जगभरातील ६० हून अधिक देशांमध्ये 763 GW वीज निर्मिती क्षमतेला समर्थन देत आहे.
भारत सध्या जलद आर्थिक वाढीला प्रतिसाद देत असताना, २०२२ मध्ये ३९९ गिगावॅटवरून २०३२ पर्यंत ९०० गिगावॅटपर्यंत वीज निर्मिती क्षमता वाढवण्याच्या राष्ट्रीय योजनेसह, सध्याच्या वीजेच्या गरजा पूर्ण करणे आणि सुरक्षित पुरवठा सुनिश्चित करणे यासारख्या समस्या आहेत, परिणामी स्थिर संचालन आणि उच्च विश्वासार्हता सुनिश्चित करण्यासाठी सध्या कार्यरत असलेल्या प्लांटची मागणी वाढत आहे. तोशिबाच्या मॉनिटरींग प्रणालीमुळे कार्यात्मक कार्यक्षमता वाढवेल आणि स्थिर वीज पुरवठ्याची खात्री करता येईल, त्याचबरोबर जलद, अधिक अचूक देखभाल सेवा देखील देणे शक्य होईल.
या प्रणालीमध्ये वीज प्रकल्पांमध्ये बसवलेल्या सेन्सर्समधून गोळा केलेल्या रिअल-टाइम ऑपरेशनल डेटाचे विश्लेषण करण्यासाठी AI चा वापर केला जातो. प्लांटमधील उपकरणांमधील असामान्यतेच्या लक्षणांचे लवकर निदान ही यंत्रणा करते आणि अनपेक्षित परिणाम टाळण्यासाठी मूळ कारणांचे विश्लेषण करते. ही प्रणाली मॉनिटर केलेल्या डेटाचा वापर देखभाल प्रक्रिया स्वयंचलित आणि व्यवस्थापित करण्यासाठी देखील करते, त्यामुळे प्लांट बंद पडण्याची घटना आणि कालावधी लक्षणीयरीत्या कमी होतो. ही यंत्रणा कालांतराने जमा झालेल्या डेटाचे विश्लेषण देखील करते आणि विसंगती अंदाजाची अचूकता वाढविण्यासाठी आणि देखभाल कार्यक्षमता सुधारण्यासाठी निष्कर्षांचा वापर करते.
“तोशिबा JSW, प्लांट कार्यक्षमता आणि विश्वासार्हता वाढवणाऱ्या IOT प्लॅटफॉर्म, EtaPRO द्वारे वीज निर्मितीमध्ये डिजिटल परिवर्तन घडवत आहे,” असे तोशिबा जेएसडब्ल्यूचे व्यवस्थापकीय संचालक दाईसुके मुराता यांनी सांगितले. “आमचे आदरणीय ग्राहक, NTPC च्या या ताज्या ऑर्डरद्वारे, कार्यक्षम उपाय पुरवून, डिजिटल नवोपक्रम स्वीकारून आणि उत्पादन उत्कृष्टतेला बळकटी देऊन भारताच्या ऊर्जा परिवर्तन प्रवासात योगदान देण्याचा आम्हाला अभिमान वाटत आहे. मेक इन इंडिया आणि भक्कम तोशिबा ग्रुप या सहकार्याद्वारे, तोशिबा JSW भारतातील शाश्वत आणि लवचिक ऊर्जा पायाभूत सुविधांना समर्थन देत राहील.”
तोशिबा ग्रुप प्रगत डिजिटल तंत्रज्ञान आणि आपले स्थापित अभियांत्रिकी कौशल्य आणि सेवा पोर्टफोलिओ यांचे एकत्रीकरण करून नवीन उपाय विकसित करत आहे, जेणेकरुन देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मूल्य निर्मिती होत आहे. विशिष्ट आव्हाने आणि समस्यांना तोंड देण्यासाठी वीज निर्मिती कंपन्यांना पाठिंबा देऊन त्यांच्याकडून पुढील ऑर्डर मिळवण्याचे उद्दिष्ट आहे आणि असे केल्याने स्थिर ऊर्जा पुरवठा, कार्बन तटस्थतेला चालना आणि वर्तुळाकार अर्थव्यवस्थेकडे वाटचाल होण्यास हातभार लागेल.
*स्रोत: राष्ट्रीय वीज योजना (खंड १: निर्मिती), मार्च २०
२३, भारत सरकार