पुणे शहराचा स्‍मार्ट सिटी दृष्टिकोन प्रत्‍येक कॅमेऱ्यामागील योग्‍य व्हिडिओ विश्‍लेषण करणाऱ्या हार्ड ड्राइव्‍हवर अवलंबून आहे

तारां कित Avatar

देशामध्‍ये डेटा पायाभूत सुविधेत वेगाने विकास होत असताना पुणे भारतातील प्रमुख तंत्रज्ञान व डेटा सेंटर केंद्र म्‍हणून झपाट्याने उदयास येत आहे. भारताची डेटा सेंटर क्षमता २०२५च्‍या अखेरपर्यंत २,०७० मेगावॅटपर्यंत पोहोचण्‍याची अपेक्षा असताना पुण्यासारखी उदयोन्‍मुख डिजिटल शहरे नवीन डेटा सेंटर्समधील गुंतवणूकांसाठी पसंतीची गंतव्ये ठरत आहेत, ज्‍याला प्रादेशिक डेटा वाढ आणि किफायतशीर फायद्यांमुळे गती मिळत आहे. यामुळे पुणे शहर भारतातील विस्‍तारित होत असलेल्‍या डिजिटल परिसंस्‍थेत महत्त्वपूर्ण स्‍थानावर आहेत, विशेषत: देशांतर्गत आणि जागतिक तंत्रज्ञान कंपन्‍यांचे लक्ष वेधून घेत आहे.

 

पुण्‍याच्‍या विस्‍तारित होत असलेल्‍या डिजिटल उपस्थितीला शहरी पायाभूत सुविधेमधील विचारशील सुधारणांचे पाठबळ आहे, जसे स्‍मार्ट व्हिडिओ अॅनालिटिक्‍सचे सिस्‍टम्‍सचे एकीकरण. स्‍मार्ट सिटी दृष्टिकोनाचा भाग म्‍हणून पुणे शहर सार्वजनिक ठिकाणी, परिवहन केंद्रे आणि आवश्‍यक सेवा क्षेत्रांमध्‍ये नाविन्‍यपूर्ण एआय-संचालित कॅमेरे व व्हिडिओ अॅनालिटिक्‍सचा वापर करत आहे, जेथे निवासी व अभ्‍यागतांसाठी दैनंदिन सुरक्षितता, कार्यक्षमता आणि सार्वजनिक सेवा सुधारण्‍याचा मनसुबा आहे.

 

बारकाईने देखरेख आणि रिअल-टाइम विश्‍लेषणावर लक्ष केंद्रित असताना देखील महत्त्वपूर्ण घटकाकडे दुर्लक्ष होते, ते म्‍हणजे या यंत्रणांची विश्वसनीयता व परिणामकारकतेची खात्री घेण्‍यामध्ये हार्ड ड्राइव्‍हची अपरिहार्य भूमिका.

 

स्‍मार्ट सिटी दृष्टिकोन डेटावर अवलंबून आहे आणि डेटासाठी स्‍टोरेजची गरज आहे

 

वाहतूक व कचरा देखरेखीपासून गर्दीचे निरीक्षण आणि आपत्कालीन प्रतिसादापर्यंत आधुनिक व्हिडिओ व विश्‍लेषण यंत्रणा मोठ्या प्रमाणात व्हिडिओ डेटावर अवलंबून असतात. हाय-डेफिनिशन कॅमेरे, इनसाइट अॅनालिटिक्‍स आणि रिअल-टाइम अलर्ट शहरी प्रशासनासाठी महत्त्वपूर्ण बनत आहेत. पण, या डिजिटल बुद्धिमत्तेसह स्टोरेज पायाभूत सुविधांची मागणी देखील वाढत आहे.

 

एक १०८०पी कॅमेरा दररोज ३५ जीबीपर्यंत डेटा जनरेट करू शकतो, जो एकूण वार्षिक १३ टीबीपेक्षा जास्त आहे. ४के कॅमेरा स्टोरेज मागणी २८० टक्‍क्‍यांपर्यंत वाढवू शकतो आणि ८के पर्यंत वाढवल्यास, कॉन्फिगरेशन व रिटेन्शन धोरणांनुसार प्रति कॅमेरा प्रतिवर्ष ४० टीबीपेक्षा जास्त स्‍टोरेजची गरज भासू शकते.

 

शहरभर शेकडो कॅमेऱ्यांचे नेटवर्क पसरले असल्‍याने तयार होणारा डेटा व्‍यापक आणि महत्त्वाचा बनतो. कॅमेऱ्यामध्‍ये रेकॉर्ड होणारे फक्‍त फुटेज नाही तर बहुमूल्‍य माहिती आहे, जी शहर नियोजकांना आणि समुदाय प्रमुखांना सार्वजनिक ठिकाणी सुरक्षिततेची खात्री घेण्‍यास, सेवा सुधारण्यास आणि दैनंदिन आव्हानांना अधिक प्रभावीपणे प्रतिसाद देण्यास मदत करते.

 

या डेटा मागण्‍या वाढत असताना मोठ्या प्रमाणात, सुरक्षित व एआय-सुसज्‍ज स्‍टोरेज कार्यसंचालन यशस्‍वी ठरण्‍यासाठी महत्त्वाचे आहे.

 

विश्वसनीयता आणि टिकाऊपणा महत्त्वाचा

 

व्हिडिओ व विश्‍लेषण वातावरणामध्‍ये हार्ड ड्राइव्‍ह डेटा स्‍टोअर करण्‍यासोबत सतत २४/७ तास कार्यरत असतात, न थांबता मोठ्या प्रमाणात माहिती स्‍टोअर करतात. अधूनमधून वापरासाठी डिझाइन केलेल्या ग्राहक-श्रेणीच्या हार्ड ड्राइव्हच्या तुलनेत या वातावरणासाठी हार्ड ड्राइव्ह सतत उच्‍च-लेखन वर्कलोडसाठी डिझाइन केलेल्‍या असतात आणि आव्‍हानात्‍मक स्थितीमध्‍ये देखील उत्तम कामगिरीसाठी ऑप्टिमाइझ केलेल्‍या असतात.

 

झपाट्याने विकसित होत असलेल्‍या पुणे शहरामध्‍ये उच्‍च आर्द्रता, उच्‍च तापमान आणि ऊर्जा वापरामुळे अद्वितीय आव्‍हाने निर्माण होतात, ज्‍यामुळे व्हिडिओ व अॅनालिटिक्‍स हार्ड ड्राइव्‍ह विश्वसनीयपणे कामगिरी करण्‍यासाठी आणि डेटाचे जतन करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आल्‍या आहेत. यामधून वास्‍तविक स्थितीमध्‍ये विनासायास, विनाव्‍यत्‍यय कार्यसंचालनाची खात्री मिळते, जो कोणत्‍याही स्‍मार्ट सिटीची सुरक्षितता आणि कार्यसंचालन यशासाठी महत्त्वाचा पाया आहे. शहर आपल्‍या स्‍मार्ट सिटी पायाभूत सुविधेमध्‍ये वाढ करेल तसे स्‍टोरेज यंत्रणांची मागणी देखील वाढेल. एआय-समर्थित वाहतूक यंत्रणा व गर्दीवर निरीक्षण ते शहरी सुरक्षितता व स्थितीवर देखरेखीपर्यंत जलदपणे व विश्वसनीयपणे व्हिडिओ डेटा स्‍टोअर, उपलब्‍ध आणि विश्‍लेषण करण्‍याची क्षमता स्‍मार्ट सिटीच्‍या यशासाठी महत्त्वपूर्ण पाया बनली आहे.

 

हार्ड ड्राइव्‍हनी क्षमतेपलीकडे जात शहरामधील परिसंस्‍थेमध्‍ये विश्वसनीयता, सातत्‍यता व स्थिरतेची खात्री घेतली पाहिजे. आज चुकीची स्‍टोरेज पायाभूत सुविधा निवडल्‍यास भविष्‍यात महागडी यंत्रणा अपयशी ठरू शकते.

 

स्‍मार्ट सिटी भागधारकांना कृतीचे आवाहन

 

पुणे शहर भारतातील प्रमुख तंत्रज्ञान व डेटा सेंटर केंद्र बनण्‍याच्‍या दिशेने वाटचाल करत असताना हार्ड ड्राइव्‍हना धोरणात्‍मक मालमत्ता म्‍हणून प्राधान्‍य देण्‍याची गरज आहे. धोरणकर्ते, सिस्‍टम इंटीग्रेटर्स आणि सार्वजनिक एजन्‍सींनी भविष्‍यात डेटा विकासाला चालना देणाऱ्या स्‍टोरेज पायाभूत सुविधेला प्राधान्‍य दिले पाहिजे. ही फक्‍त तंत्रज्ञान वैशिष्‍ट्ये नाहीत तर सतत कार्यसंचालन, जनतेचा विश्वास आणि शहरी स्थिरतेमधील दीर्घकालीन गुंत

वणूका देखील आहेत.

 

 

 

 

 

Tagged in :

तारां कित Avatar