वाहन उद्योगाच्या पुढील प्रवासासाठी अभिनवता आणि किफायतशीरपणा यातील समतोल साधत मूल्य आधारित दृष्टीकोन गरजेचा : सीआयआय नेक्सजेन मोबिलिटी शो मध्ये विविध तज्ञांचे मत

तारां कित Avatar

पुणे,10 ऑक्टोबर 2025 : वाहन उद्योग हा झपाट्याने एआय वैशिष्ट्यांसह सॉफ्टवेअर आधारित परिसंस्थांमध्ये परिवर्तित होत आहे.अशा वेळेस अभिनवता,अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि किफायतशीरपणा यामधील समतोल साधत मुल्यआधारित दृष्टीकोन गरजेचा आहे,असे मत तज्ञांनी व्यक्त केले.9 ते 11 ऑक्टोबर दरम्यान सुरू असलेल्या सीआयआय नेक्सजेन मोबिलिटी शो 2025 मधील सीआयआय सॉफ्टवेअर – लेड मोबिलिटी कॉन्क्लेव्ह या चर्चासत्रात विविध तज्ञांनी आपले मत मांडले.इनोव्हेट. इंटिग्रेट. इम्पॅक्ट: द फ्युचर ऑफ मोबिलिटी” या या संकल्पनेअंतर्गत आयोजित हे आंतरराष्ट्रीय एक्स्पो आणि परिषद वाहन उद्योगातील संपूर्ण मूल्य साखळीतील भागधारकांना एकत्र आणून मोबिलिटीचे भविष्य आखत आहे.

 

मारूती सुझुकी इंडिया लि.चे कार्यकारी समिती सदस्य सी.व्ही.रमण म्हणाले की,वाहनांमध्ये सॉफ्टवेअर आणि एआय चलित वैशिष्टयांचा हिस्सा वाढत असताना मूल्य आधारित दृष्टीकोन गरजेचा आहे.सध्या भारतात प्रत्येक हजार व्यक्तींमागे 36 कार्सची संख्या 2035 पर्यंत पोहचण्याची अपेक्षा आहे.त्यामुळे पुढील पिढीसाठी वाहने तयार करत असताना एक नव्हे तर ग्राहकांच्या गरजेनुरूप अनेक उपाय शोधावे लागतील.वाढत जाणारी वैशिष्टये आणि खर्च यांमध्ये समतोल साधत मूल्य आधारित दृष्टीकोन महत्त्वाचा ठरेल.

 

टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्स आणि टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटीचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी स्वेन पातुस्का म्हणाले की,भारतीय ग्राहक हा जगातील सर्वात तरूण आहे.त्यांना त्यांच्या आवडी-निवडी आहेत.त्यांना पर्यावरणाची चिंता आहे.जायच्या ठिकाणापेक्षा त्यांना प्रवास आवडतो आणि गाडीमधल्या वैशिष्टयांमध्ये स्मार्ट फीचर्स व सतत अपग्रेडस लागतात.या बदलत्या ग्राहकांच्या गरजा लक्षात घेत उत्पादनांची पुर्नकल्पना करणाऱ्या पध्दतींमध्ये मुलभूत बदल होत आहेत.ग्राहकांना एक अद्वितीय अनुभव प्रदान करण्यासाठी एक नवे आर्किटेक्चर उदयास येत आहेत.तंत्रज्ञान आणि क्षमता,उत्पादन संच आणि सहयोग आणि व्यावसायिक प्रारूपातील एकात्मता हे सॉफ्टवेअर आधारित मोबिलिटीच्या यशाचे अनिवार्य घटक असतील.

 

आरएसबी समूहाच्या व्यवसाय विकास व धोरण विभागाचे कार्यकारी संचालक निशित बेहेरा म्हणाले की, वाहनांमध्ये आधुनिकीकरण होत असताना पुरवठादारांना देखील हे बदल लक्षात घेऊन त्यानुसार गरजांची पूर्तता करणे आवश्यक आहे.पुढील काळात विविध संस्थांबरोबर सहयोग,सॉफ्टवेअर क्षमता वाढवणे,उत्पादन डिझाईन आणि विविध तंत्रज्ञानांचे एकत्रीकरण गरजेचे असेल.

 

कॅस्टको चे मुख्य कार्यकारी अधिकारी रवी डोली म्हणाले की, भारतातील वाहन उद्योग हे अभियांत्रिकीसाठी आजवर ओळखले जायचे. सध्याच्या काळात सॉफ्टवेअर हे फक्त ॲक्सेसरी नसून वाहन उद्योगाच्या विकासाला चालना देत आहे.एकेकाळी हार्डवेअरचे वर्चस्व असलेला हा उद्योग सॉफ्टवेअर केंद्रित होत आहे.भारताची सॉफ्टवेअर आणि स्टार्टअप क्षेत्रातील ताकद लक्षात घेता या परिवर्तनामध्ये भारताला मोठी संधी आहे.

 

टाटा एलएक्सआयच्या ऑटोमोटिव्ह विभागाचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी सुंदर गणपती म्हणाले की,आजचा काळ हा सॉफ्टवेअर चलित वाहन उद्योगाचा आहे.भारतात सादर होणाऱ्या कार्समध्ये अधिकाधिक सॉफ्टवेअरचा समावेश होत आहे.भारताने जीसीसी क्षेत्रात असलेल्या आपल्या प्राविण्याचा उपयोग स्थानिक बरोबर जगासाठी सोल्युशन्स तयार करायला हवेत.

 

केपीआयटी टेक्नॉलॉजीजच्या बिझनेस आणि स्ट्रॅटेजिक इनिशिएटिव्हज विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष संग्राम कदम यांनी या चर्चासत्रात स्वागतपर भाषण केले.

 

या प्रदर्शनात इलेक्ट्रिक, हायब्रीड, हायड्रोजन आणि पर्यायी इंधन वाहनांमध्ये पुढील पिढीचे तंत्रज्ञान प्रदर्शित

करण्यात आले.

 

Tagged in :

तारां कित Avatar