व्यापक भौगोलिक विस्तार आणि तरूणांनी कर्ज घेण्याच्या प्रमाणामधून डिजिटल क्रेडिटचा पुढील टप्पा दिसून येतो
मुंबई, १० ऑक्टोबर २०२५: क्रिफ हाय मार्क आणि युनिफाईड फिनटेक फोरम (यूएफएफ) यांनी भारतातील एनबीएफसी फिनटेक परिसंस्थेचे सर्वसमावेशक संशोधन फिनसाइट रिपोर्ट २०२५ च्या पहिल्या पर्वाचे अनावरण केले आहे. १२० हून अधिक फिनटेक कर्ज देणाऱ्या कंपन्यांकडून डेटा मिळवत आणि व्यापक एनबीएफसी उद्योगाची तुलना करत हा अहवाल पोर्टफोलिओ विकास, उत्पादन ट्रेंड्स, कर्जदार प्रोफाइल, भौगोलिक विस्तार आणि क्षेत्राला आकार देणाऱ्या जोखीम गतिशीलतेचा सखोल आढावा घेतो.
महत्त्वाचे मुद्दे
जलद पोर्टफोलिओ वाढ: जून २०२५ पर्यंत एनबीएफसी फिनटेकने त्यांच्या पोर्टफोलिओ थकबाकीमध्ये वार्षिक ३४.९ टक्क्यांची वाढ केली, जी एकूण एनबीएफसी उद्योगाच्या २४.५ टक्के वाढीपेक्षा जास्त आहे. एकूण एनबीएफसी बाजारपेठेतील त्यांचा हिस्सा जून २०२३ मध्ये ७.२ टक्क्यांवरून जून २०२५ मध्ये ९ टक्क्यांपर्यंत वाढला.
लहान आकाराचे कर्ज विस्तारीकरणाला गती देत आहेत: फिनटेक एनबीएफसीसाठी सक्रिय कर्जे वार्षिक २५.६ टक्क्यांनी वाढली, जी उद्योगाच्या १५.१ टक्के वाढीपेक्षा खूप जास्त आहे. या विभागाने अल्पकालीन, लहान आकाराच्या असुरक्षित कर्जामध्ये विशेषज्ञता राखली आहे.
उत्पादन मिश्रण: फिनटेक पोर्टफोलिओमध्ये ७० टक्के असुरक्षित कर्जे (वैयक्तिक कर्जे आणि असुरक्षित व्यवसाय कर्जे) आहेत. १ लाख रुपयांपेक्षा जास्त वैयक्तिक कर्जांचे प्रमाण वाढत आहे, तर असुरक्षित व्यवसाय कर्ज घेण्याचे प्रमाण कमी होत आहे , ज्यामुळे सूक्ष्म आणि लहान कर्जदारांसाठी उपलब्धता सुधारत आहे.
कर्जदार वर्गामध्ये वाढ: फिनटेक कर्जदार वर्ग २.८ कोटी सक्रिय कर्जदारांपर्यंत वाढला (वार्षिक १६.८ टक्के वाढ). जवळपास ३४ टक्के कर्ज फक्त फिनटेक कर्जदारांसाठी आहेत, ज्यामधून अधिक उपलब्धतेमधील त्यांची भूमिका दिसून येते. कर्जदार प्रामुख्याने तरुण आहेत, जेथे ६५ टक्क्यांहून अधिक कर्जदारांचे वय ३५ वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त आहे.
भौगोलिक प्रवेश: एनबीएफसी फिनटेक महानगरांच्या पलीकडे वेगाने विस्तारत आहेत. टॉप १०० (बीटी१००) शहरांच्या पलीकडे[1], वैयक्तिक कर्जाची उत्पत्ती आर्थिक वर्ष २४ च्या पहिल्या तिमाहीत २८.४ टक्क्यांवरून आर्थिक वर्ष २६ च्या पहिल्या तिमाहीत ३३.९ टक्क्यां पर्यंत वाढली. असुरक्षित व्यवसाय कर्जांसाठी त्याच कालावधीत बीटी१०० आकारमान २९.९ टक्क्यांवरून जवळपास दुप्पट होत ४३ टक्के झाले.
जोखीम ट्रेंड: पोर्टफोलिओच्या गुणवत्तेमधून स्थिती स्थिर होण्याची सुरूवातीची चिन्हे दिसून येत आहेत. लहान आकाराच्या वैयक्तिक कर्जांसाठी (१ लाख रूपये व त्यापेक्षा कमी)), सुरुवातीची थकबाकी (पीएआर ३१-९०) जून २०२३ मध्ये ४.९ टक्क्यांवरून जून २०२५ मध्ये ४.१ टक्क्यांपर्यंत सुधारली आणि शेवटच्या टप्प्यातील थकबाकी (पीएआर ९१-१८०) ७.६ टक्क्यांवरून ४.८ टक्क्यांपर्यंत कमी झाली. मोठ्या आकाराच्या असुरक्षित व्यवसाय कर्जांमध्ये जोखीम वाढल्याचे दिसून येते, तर एनबीएफसी फिनटेक आणि पारंपारिक एनबीएफसी दोन्हीमध्ये खूप कमी जोखीम पत्करणाऱ्या कर्जदारांचे प्रमाण वाढले आहे.
राज्य-स्तरीय वाढ: महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू या सर्वात मोठे फिनटेक कर्ज देणाऱ्या बाजारपेठा आहेत, ज्या एकत्रितपणे पोर्टफोलिओ थकबाकीच्या जवळपास ३५ टक्के आहेत. उत्तर प्रदेश (वार्षिक ४५.७ टक्के फिनटेक वाढ), राजस्थान (वार्षिक ३५.४ टक्के वाढ) आणि तेलंगणा (वार्षिक ३५.१ टक्के वाढ) यांनी राष्ट्रीय सरासरीपेक्षा (वार्षिक ३४.९ टक्के वाढ) जास्त कामगिरी केली, ज्यामुळे उदयोन्मुख राज्यांमध्ये प्रबळ वाढ दिसून आली.
क्रिफ हाय मार्कचे अध्यक्ष आणि क्रिफ इंडिया व साऊथ एशियाचे प्रादेशिक व्यवस्थापकीय संचालक सचिन सेठ म्हणाले, ”फिनटेक एनबीएफसी मोठ्या प्रमाणात लहान आकाराचे कर्जे देत, अर्ध-शहरी व ग्रामीण बाजारपेठांमध्ये प्रवेश करत क्रेडिट उपलब्धतेला नव्या उंचीवर घेऊन जात आहेत. यूएफएफसोबतचा हा अहवाल निदर्शनास आणतो की हा विभाग झपाट्याने विकसित होत आहे, तसेच विशेषत: वैयक्तिक कर्जांमध्ये क्रेडिट दर्जा सुधारण्याची लवकर चिन्हे देखील दाखवत आहे.” ते पुढे म्हणाले, ”त्यांच्या ६५ टक्क्यांहून अधिक कर्जदारांचे वय ३५ वर्षे किंवा त्यापेक्षा कमी असण्यासह एबीएफसी फिनटेक भारतातील तरूणांना अधिक प्रमाणात क्रेडिट उपलब्ध करून देत आहेत आणि अधिक सर्वसमावेशक व स्थिर कर्ज परिसंस्थेला आकार देत आहेत, ज्याला तंत्रज्ञान-केंद्रित नाविन्यता आणि जबाबदार कर्ज पद्धतींचे पाठबळ आहे.”
युनिफाईड फिनटेक फोरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी जतिंदर हांडू म्हणाले, ”फिनटेक कर्ज देणाऱ्या कंपन्या बँकिंग सेवांपासून वंचित आणि बँकिंग सेवा उपलब्ध नसलेल्या जनतेला मोठ्या प्रमाणात कर्ज मिळवणे सोपे करत आहेत. या विश्लेषणामधून स्पष्ट होते की या कंपन्या आर्थिक सेवांच्या लोकशाहीकरणामध्ये मोठी भूमिका बजावतात, पण सर्वोत्तम जोखीम व्यवस्थापन आणि ग्राहक संरक्षणासाठी देखील गरज आहे. यूएफएफमध्ये आमचा विश्वास आहे की सर्वोत्तम मार्ग म्हणजे फिनटेक-नेतृत्वित विकास उद्योगासाठी खुला, प्रबळे आणि दीर्घकालीन असला पाहिजे, ज्यामुळे उद्योग ग्राहक-केंद्रित आराखड्यामध्ये, तसेच यूएफएफच्या उद्योग आचारसंहितेअंतर्गत कार्यरत राहिल.”