बँक ऑफ महाराष्ट्र निवृत्त कर्मचारी संघटनेतर्फे सोलापूर जिल्ह्यातील कुंभेज व वाकाव गावातील अतिवृष्टीग्रस्त गरजू शेतकरी पशुपालकांना २२० बॅग्स पशुखाद्याचीची मदत

तारां कित Avatar

 

 

पुणे

(प्रतिनिधी)

 

भारतीय मजदूर संघाशी संलग्न असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र रिटायर्ड एम्प्लॉईज ऑर्गनायझेशन (बो म रे ओ ) या महाराष्ट्र बँकेतील निवृत्त कर्मचारी व अधिकारी संघटनेने ९ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील कुंभेज आणि वाकाव या गावांना भेट दिली.ही गावे सीना नदीच्या काठावर असून पाऊस आणि पुराचे पाणी शेते,घरे यांमध्ये शिरले असल्याने अतोनात हानी झाली आहे.या गावांचे पावसाने दिलेल्या तडाख्याने अतोनात नुकसान झाले आहे.शेतकरी वर्गाची दैना झालीआहे.शेतीपिके,जनावरे,घरे,शाळा यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

संघटनेचे संस्थापक बाळासाहेब फडणवीस यांचे पुढाकाराने महाराष्ट्र बँकेतील निवृत्त कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी निधी उभारला आहे.

या निधीमधून गावातील गरजू शेतकरी वर्गाला पशुखाद्य देण्यात आले.

या प्रसंगी संघटनेचे संस्थापक बाळासाहेब फडणवीस,अध्यक्ष मोहन घोळवे,शशिकुमार चौधरी,माधव लेले,पुरूषोत्तम बापट,ऍड.पांडुरंग साळुंखे,वसंत कुलकर्णी, हेमंत अग्निहोत्री,अनिल सावंत प्रभुती पुण्याहून मुद्दाम या उपक्रमासाठी गेले होते.निवृत्त कृषी अधिकारी गणपत बाबर आणि आबा इंगळे यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते. गरीब आणि गरजू शेतकरी पशुपालकांना २२० बॅग्स सुग्रास पशुखाद्य संघटनेने दिले.ज्याची किंमत रुपये तीन लाख आहे.गावकरी वर्गाने या उपक्रमाचे स्वागत केले आणि बँक ऑफ महाराष्ट्र निवृत्त कर्मचारी व अधिकारी संघटनेला धन्यवाद दिले.

Tagged in :

तारां कित Avatar