पुणे
पर्वती मतदारसंघातील सर्व्हे क्र. ९२, शाहू वसाहत परिसरातील अन्यायकारक एसआरए प्रकल्पाला अखेर स्थगिती देण्यात आली आहे. नागरिकांच्या दीर्घकाळ चाललेल्या संघर्षाला यश मिळत असून, उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी स्वतः हस्तक्षेप करून हा तातडीचा निर्णय घेतला आहे.
आज शाहू वसाहतीतील शेकडो नागरिकांनी पुण्यात उप मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली.
नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर उप मुख्यमंत्री शिंदे यांनी तत्काळ एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके यांना दूरध्वनीवर संपर्क साधला आणि स्पष्ट शब्दांत आदेश दिले —
“या प्रकल्पाला तातडीने स्थगिती द्या.”
हा निर्णय होताच परिसरात आनंदाचा जल्लोष उसळला. नागरिकांनी उत्स्फूर्त घोषणांनी वातावरण भारावून टाकले —
“एकनाथ शिंदे जिंदाबाद!”
“सर्वसामान्य जनतेचा खरा नेता — एकनाथ शिंदे!”
महिलांनी आनंदाने व्यक्त केलं —
“लाडक्या भावाने दिवाळीपूर्वीच लाडक्या बहिणींना खरा दिवाळी गिफ्ट दिला!”
नागरिकांच्या तक्रारी आणि लोकहिताची बाजू
शाहू वसाहतीत गेल्या काही महिन्यांपासून नागरिकांचा संताप उफाळून आला होता. शासनाच्या नावाखाली लादण्यात आलेल्या एसआरए प्रकल्पामुळे सर्वसामान्य रहिवाशांचे हक्क, घरे आणि सुरक्षित भविष्य धोक्यात येत असल्याची भीती व्यक्त केली जात होती.
नागरिकांच्या मते, या प्रकल्पासाठी त्यांची संमती घेतली गेली नव्हती. कोणतीही पारदर्शक प्रक्रिया न ठेवता काही मोजक्या व्यक्तींना लाभ मिळावा, अशा प्रकारे हा प्रकल्प पुढे नेला जात होता.
“आम्हाला विकास नको नाही, पण तो लोकशाही मार्गाने, पारदर्शकतेने आणि आमच्या संमतीने व्हावा,” असे नागरिकांचे म्हणणे आहे.
लोकहितासाठी घेतलेला निर्णय
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दाखवलेली तत्परता आणि नागरिकांच्या बाजूने घेतलेली भूमिका ही लोकहितासाठी केलेल्या प्रशासनिक जबाबदारीचे उत्तम उदाहरण ठरली आहे.
या निर्णयाने हजारो कुटुंबांना दिलासा मिळाला असून, शासनाच्या निर्णय प्रक्रियेत जनतेचा आवाज ऐकला जातोय, हा लोकशाहीवरचा विश्वास पुन्हा दृढ झाला आहे.
शाहू वसाहत बचाव नागरिक कृती समितीचे मत
“हा निर्णय आमच्यासाठी दिलासादायक आहे. आमचा लढा लोकशाही मार्गाने सुरू राहील.
मुख्यमंत्री शिंदे यांनी लोकहिताचा विजय केला आहे,”
असे कृती समितीच्या प्रतिनिधींनी सांगितले.