, दि. 13 ऑक्टोबर: राज्याच्या व्यसनमुक्ती धोरणाची अंमलबजावणी करण्याच्याअनुषंगाने जिल्ह्यात व्यसनमुक्तीचा प्रचार व प्रसार करण्याकरिता विविध योजना तसेच उपक्रम राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून सहायक आयुक्त, समाज कल्याण, व नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आम्ही चालतो व्यसनमुक्तीसाठी’ या विषयावर रॅलीचे १५ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता बालगंधर्व रंगमंदिर चौक, पुणे येथे आयोजन करण्यात आले आहे.
या रॅलीला बालगंधर्व रंगमंदीर येथून सुरुवात होणार असून ती पुढे पुणे महानगरपालिकामार्गे शनिवारवाडा येथे समारोप होणार आहे. यामध्ये सुमारे १ हजार विद्यार्थी-विद्यार्थीनी सहभागी होणार आहेत, अशी माहिती विशाल लोंढे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
000