यंदा पुण्यात विक्रमी 81 विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला~
पुणे, 9 ऑक्टोबर 2025: भारतातील आघाडीची ग्राहकोपयोगी विद्युत तसेच वायर आणि केबल उत्पादक आरआर काबेल यांनी पुण्यात त्यांच्या काबेल स्टार शिष्यवृत्ती कार्यक्रम 2025च्या विजेत्यांची घोषणा केली. उद्योगातील एक आघाडीचा उपक्रम असलेला हा शिष्यवृत्ती कार्यक्रम यंदा खास मुलांसाठी राबवण्यात आला आहे. दहावीची परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण झालेल्या इलेक्ट्रिशियनच्या मुलांची या कार्यक्रमासाठी निवड करण्यात आली आहे. सुशिक्षित आणि सक्षम भारताचे ध्येय बाळगलेल्या आरआर काबेलच्या उपक्रमामुळे मेहनती आणि हुशार विद्यार्थ्यांच्या उच्च माध्यमिक शिक्षणाला प्रोत्साहन तसेच पाठबळ देण्यासाठी दरवर्षाला 1 कोटी रुपयांहून अधिक निधीची तरतूद केली आहे. आतापर्यंत देशभरातील सुमारे 4000 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 10,000 रुपयांच्या वैयक्तिक शिष्यवृत्तीसाठी निवडण्यात आले आहे. या हुशार मुलांनी त्यांच्या उच्च माध्यमिक शिक्षणासाठी केवळ आर्थिक मदतच मिळवली नाही तर त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल देखील टाकले आहे. या वर्षीच्या विजेत्यांसोबतच काबेल स्टार शिष्यवृत्ती कार्यक्रम सीझन 2 मधील अव्वल विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. त्यांच्या पुढील शिक्षणाला चालना आणि पाठिंबा देण्यासाठी लॅपटॉप देऊन सन्मानित करण्यात आले.
काबेल स्टार शिष्यवृत्ती कार्यक्रमाच्या चौथ्या हंगामात अर्जदारांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. देशभरातील सुमारे 1,000 विजेत्यांपैकी, पुणे शहर 81 विजेत्यांसह वेगळे राहिले, ज्यांना फिरोदिया हॉल, पुणे येथे एका विशेष समारंभात सन्मानित करण्यात आले
२०२२ मध्ये, काबेल स्टार स्कॉलरशिप हा उपक्रम इलेक्ट्रिशियनच्या मुलांना उच्च शिक्षण देऊन सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आला होता. या इलेक्ट्रिशियनना प्रेमाने ‘काबेल दोस्त’ म्हणून ओळखले जाते. हा उपक्रम सुरू झाल्यापासूनच त्याचा परिवर्तनकारी परिणाम झाला आहे. कारण यामुळे देशभरातील पात्र विद्यार्थ्यांना आर्थिक मदत पुरवली जाते आहे. गेल्या काही वर्षांत, या कार्यक्रमाचे विस्तार आणि महत्त्व दोन्ही वाढले आहे, ज्यामुळे दरवर्षी हजारो विद्यार्थ्यांना फायदा होतो आहे.
या चौथ्या हंगामामुळे इलेक्ट्रिशियन समुदायाच्या उन्नतीसाठी आणि त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी गुंतवणूक करण्याच्या आरआर काबेलच्या दीर्घकालीन वचनबद्धतेला आणखी बळकटी मिळते. आर्थिक मर्यादांना शिक्षणातील अडथळा बनू न देता नवीन शैक्षणिक संधी आरआर काबेलने उपलब्ध करून दिली आहे. या शिष्यवृत्तीमुळे शैक्षणिकदृष्ट्या उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आणि आशादायक कारकिर्द सुरू करण्याची इच्छा असणाऱ्या अनेकांना प्रोत्साहन दिले आहे.
दूरदृष्टी आणि उत्तम नेतृत्वाचा परिपाक असलेल्या या शिष्यवृत्ती कार्यक्रमाबद्दल आरआर ग्लोबलच्या संचालिका श्रीमती कीर्ती काबरा म्हणाल्या, “आमचे काबेल दोस्त व्यवसायात नेहमीच भागीदारापेक्षा जास्त आहेत. ते आमच्या प्रवासाचा पाया आहेत. काबेल स्टार शिष्यवृत्तीसह, आम्ही केवळ आर्थिक मदत देत नाही, तर पिढ्यांचे जीवन बदलू शकणाऱ्या संधींचे दरवाजे उघडत आहोत. मोठे स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला ते साध्य करण्याची संधी मिळायलाच हवी. आणि परिस्थिती नसली तरी कोणतेही स्वप्न अपूर्ण राहणार नाही याची खात्री करण्याचा आमचा मार्ग म्हणजे हा उपक्रम. या तरुण यशस्वी विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्याकडे आत्मविश्वासाने पावले टाकताना पाहणे हे या उपक्रमाचे खरे यश आहे.”
शिष्यवृत्ती विजेते आणि त्यांचे पालक पुरस्कार स्वीकारताना आनंद आणि अभिमानाने भारावून गेले. वर्षानुवर्षे दाखवलेल्या चिकाटी आणि समर्पणाचे प्रतिबिंब असलेला हा क्षण पालकांसाठी अत्यंत भावनिक होता. त्यांच्या मुलांनी निवडलेल्या क्षेत्रात यशस्वी करिअर घडवण्याच्या त्यांच्या महत्त्वाकांक्षेचे या समारंभात कौतुक करण्यात आले. या उपक्रमाद्वारे, आरआर काबेल या यशस्वी विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पुढे नेण्यासाठी आणि त्यांना पूर्ण क्षमतेने कार्यरत होण्यासाठी एक मजबूत पाया निर्माण करून देत आहेत.
काबेल स्टार शिष्यवृत्ती कार्यक्रम हा आरआर काबेल यांचा समाजाचे देणे देण्यासाठी आणि पुढील पिढीसाठी उज्ज्वल व शिक्षित
भविष्य घडवण्याचा एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासात प्रगती करत असताना, आरआर काबेल हे इलेक्ट्रिशिन आणि त्यांच्या कुटुंबियांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी तसेच त्यांचा सन्मान करण्यासाठी वचनबद्ध आहे आणि यातूनच उद्याचे नेतृत्व घडणार आहे.