कोका-कोला आणि गूगल जेमिनी ‘फेस्टिकॉन्स’ने उजळवून टाकत आहेत दिवाळीचा सण; परंपरेला जोड एआय मॅजिकची

तारां कित Avatar

नवी दिल्ली, १३ ऑक्टोबर २०२५: यंदाच्या दिवाळीत संस्कृती, सर्जनशीलता व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांचा मेळ साधून कोका-कोला इंडिया भारतातील सण साजरा करण्याच्या पद्धतीला नवीन स्वरूप देत आहे. गूगलसोबत अशा पद्धतीच्या पहिल्याच सहयोगाच्या माध्यमातून कोकाकोलाने फेस्टिकॉन्स दिवाली ग्रीटिंग्ज आणले आहेत, त्यामुळे ग्राहकांना गूगल जेमिनी अॅपचा वापर करून व्यक्तीनुरूप (पर्सनलाइझ्ड) डिजिटल शुभेच्छा तयार करणे तसेच पाठवणे शक्य होणार आहे.

 

कोका-कोलाच्या उत्सव पॅक्सच्या मर्यादित साठ्यावर उपलब्ध असलेला हा उपक्रम लोकांना एक क्यूआर कोड स्कॅन करून प्रगत इमेज जनरेशन तंत्रज्ञानाचा उपयोग करून जेमिनी अॅपमधूनच स्वत:चे व्यक्तीनुरूप फेस्टिव अवतार तयार करण्याची व पाठवण्याची मुभा देत आहे. या नवोन्मेष्कारी डिजिटल अनुभवामार्फत कोका-कोला आपल्या ग्राहकांना सणाचा उत्साह वाटून घेण्याचा एक अनोखा मार्ग उपलब्ध करून देत आहे.

 

फेस्टिव पॅक स्कॅन करून ग्राहक संवादात्मक गूगल जेमिनी अनुभव घेऊ शकतात, तेथे गमतीशीर, आपलासा वाटणारा तसेच त्यांच्या स्वत:च्या अभिजात दिवाळी आयकॉनला साजेसा फेस्टिव पर्सोना निवडून ते त्यांचा अनोखा ‘फेस्टिकॉन’ डिझाइन करू शकतात. आपल्या प्रभावी प्रतिमा निर्मिती प्रारूपांचा उपयोग करून घेत जेमिनी ग्राहकांनी निवडलेल्या बाबींमधून एक अनोखे, शेअर करण्याजोगे डिजिटल स्टिकर तयार करते. वापरकर्ते त्यांनी तयार केलेले स्टिकर डाउनलोड करू शकतात आणि ते मित्रमंडळी व कुटुंबियांसोबत शेअर करू शकतात, #MyFesticon हा हॅशटॅग वापरून ते या स्टिकर्सची साखळी तयार करू शकतात.

 

कोका-कोला कॅटेगरीच्या मार्केटिंग विभागाचे वरिष्ठ संचालक कार्तिक सुब्रमणियन म्हणाले, “कोका-कोला नेहमीच भारतीय उत्सवांच्या केंद्रस्थानी राहिली आहे आणि यंदाच्या दिवाळीत लोकांना स्वत:ला व्यक्त करण्यासाठी एक नवीन, सर्जनशील मार्ग देऊ करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. ग्राहकांना सण साजरा करण्यासाठी अधिक व्यक्तिगत आणि अर्थपूर्ण मार्ग हवे आहेत या एका साध्याशा माहितीच्या आधारे आम्ही गूगलशी फेस्टिकॉन्ससाठी सहयोग केला. गूगल जेमिनीचे पाठबळ असलेल्या या उपक्रमात एआय, कला व संस्कृती यांचा मेळ घालण्यात आला आहे, जेव्हा लोक एकत्र येतात, तेव्हा ते दीर्घकाळ टिकणाऱ्या स्मृती निर्माण करतात, यावरील कोका-कोलाचा विश्वास यामुळे अधिक दृढ झाला आहे.”

 

कोका-कोलाच्या जनरेटिव एआयसोबतच्या यशस्वी अॅक्टिव्हेशनच्या पायावर हे अभियान उभे करण्यात आले आहे. दिवाली वाली मॅजिक या ब्रॅण्डच्या मागील अभियानासाठी ‘डाल-ए’सोबत सहयोग करण्यात आला होता. त्याद्वारे ग्राहकांना व्यक्तिनुरूप उत्सवी कार्ड्स डिझाइन करणे शक्य झाले होते. हा उपक्रम भारतभरातील घराघरांच्या पसंतीस उतरला होता. फेस्टिकॉन्सच्या माध्यमातून कोका-कोलाने रिअल-टाइम, संवादात्मक सहनिर्मिती शक्य करून हीच कल्पना आणखी पुढे नेली आहे, त्यामुळे दिवाळीसाठी दिली जाणारी प्रत्येक शुभेच्छा ही या सणासारखीच विचारी, व्यक्तिगत आणि सर्जनशील होत आहे.

 

संमेलन, संबंध आणि साजरीकरणाचे समर्थन करणे हे कोका-कोलासाठी नेहमीच महत्त्वपूर्ण तत्त्व राहिले आहे. फेस्टिकॉन्स हा दिव्याची कालातीत ऊब आणि एआयच्या अनंत शक्यता यांच्यातील मिलाफाचे प्रतीक आहे, परंपरा व नवोन्मेष यांचा संगम होतो तेव्हा खऱ्या अर्थाने किमया घडते हे त्यातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

 

*

**

 

 

 

 

 

 

 

Tagged in :

तारां कित Avatar