गुरूग्राम, भारत – ऑक्टोबर १५, २०२५: सॅमसंगने आज घोषणा केली की, भारतातील ग्राहक आजपासून नुकतेच लाँच करण्यात आलेला गॅलेक्सी एम१७ ५जी खरेदी करू शकतात. गॅलेक्सी एम१७ ५जी अॅमेझॉन, Samsung.com आणि निवडक रिटेल स्टोअर्सच्या माध्यमातून ४/१२/८ जीबी व्हेरिएण्टसाठी १२४९९ रूपयांपासून उपलब्ध असेल. ६/१२८ जीबी आणि ८/१२८ जीबी व्हेरिएण्ट्स अनुक्रमे १३९९९ रूपये व १५४९९ रूपये या किमतींमध्ये उपलब्ध असतील. ग्राहक सर्व आघाडीच्या बँका/एनबीएफसी सहयोगींच्या माध्यमातून सुलभ ईएमआय ऑफर्सचा म्हणजेच जवळपास ३ महिने नो कॉस्ट ईएमआयचा देखील लाभ घेऊ शकतात.
गॅलेक्सी एम१७ ५जी सॅमसंगचा भारतातील सर्वाधिक विक्री होणारा स्मार्टफोन गॅलेक्सी ए१६ ५जीला मिळालेल्या यशाच्या आधारावर डिझाइन करण्यात आला आहे आणि अधिकाधिक ग्राहकांना अत्याधुनिक एआय नाविन्यतांचा अनुभव देण्याचा सॅमसंगचा वारसा पुढे घेऊन जातो.
हा डिवाईस १०००० रूपये ते १५००० रूपये श्रेणीमध्ये ‘नो शेक कॅमेरा’, तसेच ५० मेगापिक्सल ओआयएस ट्रिपल-कॅमेरा सिस्टमसह येतो, जी ब्लर-फ्री फोटो व शेक-फ्री व्हिडिओज कॅप्चर करण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे. वैविध्यपूर्ण ट्रिपल-लेन्स सेटअपमध्ये अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि मॅक्रो कॅमेरा आहे, जे प्रत्येक सीनसाठी स्थिर फ्रेमिंग देतात. गॅलेक्सी एम१७ ५जी मध्ये श्रेणीमधील अग्रणी १३ मेगापिक्सल हाय रिझॉल्येशन फ्रण्ट कॅमेरा आहे, ज्यामधून आकर्षक सेल्फीज कॅप्चर करता येतात.
गॅलेक्सी एम१७ ५जी फक्त ७.५ मिमी स्लिम आहे आणि प्रीमियम कॅमेरा डेको आहे, ज्याला पूरक उच्च दर्जाच्या टिकाऊपणासाठी श्रेणीमधील अग्रणी कॉर्निंग® गोरिला ग्लास व्हिक्टस® आहे. हे प्रोटेक्शन नकळतपणे स्मार्टफोन खाली पडल्यामुळे होणारे नुकसान आणि ओरखड्यांपासून संरक्षण करते, ज्यामुळे वापरकर्त्यांना परिपूर्ण मन:शांती मिळते. या डिवाईसमध्ये धूळरोधक व जलरोधकसाठी आयपी५४ रेटिंग देखील आहे. गॅलेक्सी एम१७ ५जी मूनलाइट सिल्व्हर व सफायर ब्लॅक या आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध असेल.
गॅलेक्सी एम१७ ५जी मध्ये सर्कल टू सर्च विथ गुगल आहे, ज्यामुळे गॅलेक्सी परिसंस्थेमध्ये मोबाइल एआयचे अधिक लोकशाहीकरण करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, या डिवाईसमध्ये जेमिनी लाइव्ह आहे, जे एआयद्वारे समर्थित रिअल-टाइम व्हिज्युअल संवादांच्या माध्यमातून नवीन एआय अनुभव देते. गॅलेक्सी एम१७ ५जी वन यूआय ७ स्ट्रेट आऊट ऑफ द बॉक्ससह अँड्रॉइड १५ वर कार्यरत आहे, ज्यामधून सुस्पष्ट, सर्वोत्तम व सानुकूल युजर अनुभव मिळतो.
गॅलेक्सी एम१७ ५जी मध्ये श्रेणीमधील अग्रणी ६.७ इंच एफएचडी+ सुपर एएमओएलईडी डिस्प्लेसह सर्वोत्तम कलर कॉन्ट्रास्टसाठी ११०० नीट्स एचबीएम पीक ब्राइटनेस आहे, ज्यामधून सर्वोत्तम व्युइंग अनुभव मिळतो. ६एनएम-आधारित एक्झिनॉस १३३० प्रोसेसरची शक्ती असलेला गॅलेक्सी एम१७ ५जी विनासायास मल्टीटास्किंगसाठी गतीशील व ऊर्जा-कार्यक्षम कामगिरी देतो.
गॅलेक्सी एम१७ ५जी ओएस अपग्रेड्सच्या सहा जनरेशन्स आणि सहा वर्ष सिक्युरिटी अपडेट्ससह येतो. तसेच या डिवाईसमध्ये ऑन-डिवाईस वॉईल मेल देखील आहे, जे कॉलर्सना कॉल न उचल्यास संदेश पाठवण्याची सुविधा देते, हे श्रेणीमधील पहिले वैशिष्ट्य आहे.
गॅलेक्सी एम१७ ५जी मध्ये सॅमसंगचे सर्वात प्रगत, हार्डवेअर-आधारित सिक्युरिटी इनोव्हेशन ‘सॅमसंग नॉक्स वॉल्ट’ आहे, जे वापरकर्त्याच्या डेटाचे हार्डवेअर व सॉफ्टवेअर धोक्यांपासून संरक्षण करते. तसेच, सर्वोत्तम वैशिष्ट्ये आहेत, जसे वॉईस फोकस मागील आवाज कमी करते, सुस्पष्ट व अधिक सर्वोत्तम कॉल क्वॉलिटीची खात्री देते. या डिवाईसमध्ये सॅमसंग वॉलेटसह ‘टॅप अँड पे’ कार्यक्षमता देखील आहे, ज्यामुळे ग्राहक फक्त एका टॅपसह सहज पेमेंट्स
करू शकतात.