पुणे १५ ऑक्टोबरः ” विचार, नवाचार आणि तंत्रज्ञानाच्या मार्गानेच भारत स्वयंपूर्ण बनेल. राजकीय क्षेत्रात चारित्र्यवान व्यक्तीची गरज असून तेच समाजाला परिपूर्ण बनवितील. समाज आणि देश चालविण्यासाठी चारित्र्यावान नेत्याची आवश्यकता असते. राजकारणात पाऊल ठेवणार्या विद्यार्थ्यांना सामाजिक प्रश्नांबरोबरच सामाजिक जबाबदार्या पेलण्यासाठी तत्पर असावे.”असे विचार भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष श्याम जाजू यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्या वतीने आयोजित ‘मास्टर्स इन पॉलिटिकल लिडरशीप अँड गव्हर्नमेंट’ (एमपीजी) २१ व्या बॅचच्या शुभारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी पुणे व गोवा बार कॉन्सीलचे अध्यक्ष अॅड. जयंत जायभावे आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ.डी.पी. अग्रवाल हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचे संस्थापक व डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच प्रसिद्ध गप्पाष्टककार डॉ..य संजय उपाध्ये, एसओजीचे प्रा. डॉ. सुधाकर माया परिमल व डॉ. अभिजीत ढेरे हे उपस्थित होते.
या प्रसंगी मान्यवरांनी एमपीजेची पुस्तक व डॉ. संजय उपाध्ये लिखित पुस्तकांचे प्रकाशन केले.
श्याम जाजू म्हणाले, ” ज्याला काहीच येत नाही तो राजकारणी बनतो ही जी धारणा आहे त्याला आता बदलून सुशिक्षीतांनी राजकारणात यावे. भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. शैक्षणिक आणि व्यावहारीक शिक्षण पद्धती आवश्यक असून त्यामधूनच चांगले नेतृत्व उदयास येईल. एसओजीचे शैक्षणिक मॉडेल आदर्श असून शासकीय यंत्रनेत अशा मॉडेलचा आंतरभाव आवश्यक आहे.”
अॅड. जयंत जायभावे म्हणाले,”भारतीय राज्य घटना ही लोकशाहीचा आत्मा आहे. तर संवाद हा श्वास आहे. संविधानाची उद्देशीका आपल्याला चांगला व्यक्ती आणि नागरिक बनण्यासाठी मूल्य देते. हीच मूल्य मुलांच्या मनात रुजविणे आवश्यक आहे. तसेच राजकीय क्षेत्रात करियर करण्यासाठी सदनामधील भाषणांचा अभ्यास करावा. याच्यातून वैश्विक लोकशाहीची परिभाषा लक्षात येईल. एसओजीच्या विद्यार्थ्यांनी समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्याची संकल्पना समजावून घ्यावी. ”
डॉ. राहुल विश्वनाथ कराड म्हणाले,” राजकारणात सुशिक्षित व चांगल्या लोकांनी येणे गरजेचे आहे. राजकारणी मंडळांनी प्रशिक्षण घेतले तर देशाची ब्यूरोक्रॉसी व स्थिती सुधारण्यास वेळ लागणार नाही. देशातील वेगवेगळ्या राज्यात एसओजीचे मॉडेल सुरू आहे. आमदारांसाठी देशात ज्या पद्धतीने एनएलसीचे आयोजन केले होते त्याच धर्तीवर अमेरिकेत १५० आमदारांच्या सम्मेलनाचे आयोजन केले होते. आता देशातील जुन्या गोष्टींचे फ्रेमवर्क बदलने गरजेचे आहे.”
डॉ.डी.पी. अग्रवाल म्हणाले,” राष्ट्रीय स्तरावर देशाची गुणवत्ता वाढविण्यासाठी विद्यार्थ्थांनी सखोल विचार करणे गरजेचे आहे. एमआयटी ने सुरू केलेला एसओजीचा पाठ्यक्रम हा केवळ शैक्षणिक स्तरावर मार्यादित न राहता व्यापक आहे. या देशाला अशा लीडरची गरज आहे जे तळागळात जाऊन कार्य करतील.”
डॉ. संजय उपाध्ये म्हणाले,”वर्तमान काळात राजकीय पक्षांमधून अध्यात्मिकता लोप पावली आहे. त्यामुळेच नेत्यांचा सांस्कृतिक स्तर घरलेले दिसते. एक चांगले नेतृत्व कोणत्याही क्षेत्रात सकारात्मक बदल घडवू शकतात. एक चांगला माणूसच चांगला नेता बनू शकतो.”
देशात सुशिक्षित व्यक्ति राजकारणात यावे या उद्देशाने स्कूल ऑफ गव्हर्नमेंट सुरू करण्याची माहिती संकल्प संघई यांनी दिली.
डॉ. सुधाकर माया परिमल यांनी मिटसॉगच्या स्थापनेची पार्श्वभूमी सांगितली.
यावेळी विद्यार्थी बी.एस. प्रसन्न व सांगलीची तन्वी खाडिलकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात.
डॉ. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अभिजीत ढेरे यांनी
आभार मानले.