पुणे, दि. 15 ऑक्टोबर (जिमाका, वृत्तसेवा): सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागांतर्गत “वंदनीय बाळासाहेब ठाकरे जन आरोग्य सेवा गौरव पुरस्कार सोहळा व अंगीकृत रुग्णालयांशी संवाद” हा कार्यक्रम सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. 17 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता ग. दि. माडगुळकर नाट्यगृह, पिंपरी चिंचवड येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमादरम्यान अंगीकृत रुग्णालयांच्या कार्याचे मूल्यांकन, आरोग्य सेवेतील योगदानाचा गौरव तसेच जन आरोग्य सेवांच्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भातही संवाद साधण्यात येणार आहे.
0000