दैनंदिन राइडपासून तुमच्‍या आवडत्‍या गेटवेपर्यंत: रॅपिडो भारतातील गतीशीलता क्षेत्रात सर्वात किफायतशीर एक-थांबा ट्रॅव्‍हल ॲप ठरले

तारां कित Avatar

बेंगळुरू, १५ ऑक्‍टोबर २०२५: रॅपिडो हा भारतातील आघाडीचा राइडशेअरिंग प्‍लॅटफॉर्म आणि देशातील सर्वात नवीन युनिकॉर्नने आज घोषणा केली की, त्‍यांनी हॉटेल व फ्लाइट बुकिंग्‍जसाठी आघाडीचा ट्रॅव्‍हल प्‍लॅटफॉर्म गोआयबिबोसोबत, इंटर-सिटी बस बुकिंग्‍जसाठी जगातील सर्वात मोठा ऑनलाइन बस तिकिटिंग प्‍लॅटफॉर्म रेडबससोबत आणि ट्रेन बुकिंग्‍जसाठी भारतातील आघाडीचा अधिकृत बी२सी ऑनलाइन ट्रेन तिकिटिंग व ट्रॅव्‍हल युटिलिटी प्‍लॅटफॉर्म कन्‍फर्मतिकिट सोबत सहयोग केला आहे, ज्‍यासह या सेवा रॅपिडो ॲपमध्‍ये उपलब्‍ध आहेत.

 

रॅपिडो अधिकृतरित्‍या भारतातील पहिले स्‍वदेशी गतीशीलता-केंद्रित एक-थांबा ॲप आहे, जे दैनंदिन राइड्स व लांब अंतरापर्यंत प्रवास सुविधा देते, ज्‍यामुळे वापरकर्त्‍यांना एकाच ठिकाणी सोयीसुविधा, पर्याय आणि बचत मिळते. या लाँचसह जलद विमानतळावर जायचे असो किंवा कुटुंबासोबत सुट्टीचा आनंद घेण्‍याबाबत नियोजन करायचे असो वापरकर्ते आता फक्‍त काही क्लिनिक्‍समध्‍ये विनासायासपणे त्‍यांच्‍या संपूर्ण प्रवासाचे व्‍यवस्‍थापन करू शकतात.

 

रॅपिडोचे सह-संस्‍थापक अरविंद सांका म्‍हणाले, ”रॅपिडो नेहमी सर्वांसाठी प्रवास सोपा व किफायतशीर करण्‍यासाठी ओळखले जाते. या लाँचसह आम्‍ही दैनंदिन प्रवासापासून लांब अंतरापर्यंतच्‍या प्रवासापर्यंत ती कटिबद्धता कायम ठेवण्‍याच्‍या दिशेने साहसी पाऊल उचलत आहोत. आम्‍हाला उत्‍साहित केलेली बाब म्‍हणजे द्वितीय व तृतीय श्रेणीच्‍या शहरांमधील भारतीयांसाठी प्रवास सुविधा देण्‍याची संधी, जेथे सर्वसमावेशकता, किफायतशीरपणा आणि विश्वास सर्वात महत्त्वाचे आहे. पहिल्‍या गंतव्‍यापासून शेवटच्‍या गंतव्‍यापर्यंत रॅपिडो प्रत्‍येक भारतीयासाठी प्रामाणित एक-थांबा सहयोगी म्‍हणून गतीशीलता आणि प्रवासाच्‍या भविष्‍याला आकार देत आहे. आम्‍ही या प्रवासामध्‍ये आमच्‍यासोबत सामील होण्‍यासाठी आणि आमचा दृष्टिकोन पक्‍का करण्‍यासाठी आमच्‍या सहयोगींचे आभार व्‍यक्‍त करतो.”

 

मेकमायट्रिपचे सह-संस्‍थापक व ग्रुप सीईओ राजेश मागोव म्‍हणाले, ”आम्‍हाला संपूर्ण भारतातील प्रवाशांपर्यंत आमची पोहोच वाढवण्‍याच्‍या आमच्‍या सातत्‍यपूर्ण प्रयत्‍नाचा भाग म्‍हणून रॅपिडोसोबत सहयोग करण्‍याचा आनंद होत आहे. या सहयोग द्वितीय व तृतीय श्रेणीच्‍या बाजारपेठांमधील अधिकाधिक वापरकर्त्‍यांना फ्लाइट्स, हॉटेल्‍स व बसेस् बुक करण्‍यास सक्षम करेल, ज्‍यामुळे देशभरात डिजिटल प्रवासाच्‍या अवलंबनाला अधिक गती मिळेल.”

 

कन्‍फर्मतिकिट व इक्सिगो ट्रेन्‍सचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दिनेश कुमार कोठा म्‍हणाले, ”कन्‍फर्मतिकिटमध्‍ये आम्‍ही नेहमी प्रत्‍येक भारतीयासाठी ट्रेन प्रवास विनासायास आणि सहजसाध्‍य करण्‍यावर लक्ष केंद्रित करतो. रॅपिडोसोबत हा सहयोग त्‍या दृष्टिकोनाला लाखो नवीन वापरकर्त्‍यांपर्यत घेऊन जातो, त्‍यांना अधिक सहजपणे व आत्‍मविश्वासाने ट्रेन प्रवासाचे नियोजन व बुकिंग करण्‍याची सुविधा देतो. रॅपिडो परिसंस्‍थेमध्‍ये ट्रेन बुकिंग सेवा आणत आम्‍ही सहयोगाने देशभरातील प्रवाशांसाठी सोयीसुविधा आणि किफायतशीरपणा वाढवत आहोत.”

 

वापरकर्त्‍यांना आता रॅपिडो ॲपमधील होम स्क्रिनवर ट्रॅव्‍हल सेक्‍शन पाहायला मिळेल. फ्लाइट्स, हॉटेल्‍स, बसेस् किंवा ट्रेन्‍स पर्याय निवडल्‍यानंतर ते रॅपिडोच्‍या सहयोगींद्वारे समर्थित कस्‍टमाइज बुकिंग प्रक्रिेयेकडे जातील, जेथे सुरक्षितपणे आरक्षण करता येईल. मासिक ५० दशलक्ष सक्रिय वापरकर्त्‍यांसह रॅपिडो भारतातील शेवटच्‍या अंतरापर्यंत कनेक्‍टीव्‍हीटी तफावत दूर करत आहे आणि दैनंदिन प्रवासाला लाखो प्रवाशांसाठी अधिक सहजसाध्‍य, किफायतशीर व विश्वसनीय करत आहे.

 

भारतातील एकूण ट्रॅव्‍हल बाजारपेठ आर्थिक वर्ष २६ पर्यंत १४ टक्‍के सीएजीआर दराने वाढ होत ५.८ ट्रिलियन रूपयांपर्यंत (जवळपास ७२ बिलियन डॉलर्स) पोहोचण्‍याची अपेक्षा आहे. तरीदेखील आज ४० टक्‍के व्‍यवहार ऑनलाइन केले जात आहेत, ज्‍यामुळे डिजिटल अवलंबनासाठी मोठी संधी आहे. तळागाळापासून उपस्थिती असलेले रॅपिडो पुढील १०० दशलक्ष डिजिटल ट्रॅव्‍हल वापरकर्त्‍यांना ऑनबोर्ड करण्‍यास सज्‍ज आहे, जेथे एका अॅपमध्‍ये दररोज गतीशीलता व प्रवास बुकिंग होत आहे.

 

या सहयोगामधून भारतात डिजिटल-केंद्रित गतीशीलता व ट्रॅव्‍हल सोल्‍यूशन्‍सची झपाट्याने होत असलेली क्रांती दिसून येते, तसेच प्रवास अनुभव सुव्‍यवस्थित होत आहे आणि विशेषत: उदयोन्‍मुख शहरी बाजारपेठांमधील वापरकर्त्‍यांना अद्वितीय मूल्‍य मिळत आहे.

 

 

ग्राहकांसाठी प्रमुख फायदे

 

· एक ॲप, सर्व प्रवास: दैनंदिन प्रवास असो, एअरपोर्टवर जायचे असो, ट्रेनचा प्रवास असो किंवा वीकेण्‍ड गेटवे असो, रॅपिडो प्रत्‍येक प्रवास सोपा, विनासायास आणि किफायतशीर करते.

 

· एमएमटी सहयोग: विशेष लाँच ऑफर्स, गोआयबिबोसह: फ्लाइट्सवर जवळपास ४,००० रूपये सूट व हॉटेल्‍सवर जवळपास ५५ टक्‍के सूट; रेडबससह: बस बुकिंग्‍जवर २० टक्‍के म्‍हणजेच जवळपास ३०० रूपये सूट.

 

· कन्‍फर्मतिकिट (इक्सिगो ग्रुपचा भाग): ट्रेन सेवा शुल्‍कावर १०० टक्‍के सूट.

 

· व्‍यापक पर्याय: भारतातील सर्वात मोठ्या बस व हॉटेल पर्यायांसह विश्वसनीय सहयोगींच्‍या माध्‍यमातून फ्लाइट्स आणि ट्रेन्‍सची उपलब्‍धता.

 

· विनासायास अनुभव: रॅपिडो ॲपमध्‍ये प्रत्‍यक्ष सर्वकाही बुक करा, जलद व सोपी बुकिंग प्रक्रिया.

 

· भारतासाठी डिझाइन: ४०० हून अधिक शहरांमध्‍ये उपस्थितीसह १,००० हून अधिक शहरांपर्यंत विस्‍तारित होत असलेले रॅपिडो द्वितीय व तृतीय श्रेणीच्‍या बाजारपेठांमध्‍ये किफायतशीर ट्रॅव्‍हल बुकिंग सेवा देण्‍यासाठी अद्वितीयरित्‍या स्थित आहे, जेथे ग्राहक अधिक उपयुक्‍ततेसह कमी अॅप्‍सना प्राधान्‍य देतात.

 

Tagged in :

तारां कित Avatar