ग्रामदैवत श्री कसबा गणपती’ प्रमुख विश्वस्तपदी विनायक ठकार*  सन २०२५-२६ साठी निवड ; खजिनदारपदी हेरंब ठकार

तारां कित Avatar

 

 

पुणे : ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिर देवस्थान प्रमुख विश्वस्तपदी विनायक बाजीराव ठकार यांची नुकतीच पुर्ननियुक्ती करण्यात आली. विश्वस्तांच्या सभेत एकमताने ही निवड झाली. तर, खजिनदारपदी हेरंब ठकार यांची निवड करण्यात आली आहे.

 

याशिवाय विश्वस्तपदी संगीता ठकार, स्वानंद ठकार, आशापूरक ठकार, मिहीर ठकार, मंदार ठकार, तेजस ठकार आणि हर्षद ठकार हे कार्यरत असणार आहेत. विनायक ठकार हे सन २०१६ पासून प्रमुख विश्वस्त म्हणून देवस्थानाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत आहेत.

 

देवस्थानतर्फे वर्षभरात धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. तसेच सर्व सण- उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरे करण्याची देवस्थानाची परंपरा आजही कायम आहे.

Tagged in :

तारां कित Avatar