आत्मनिर्भर होण्यासाठी नेतृत्व आणि तंत्रज्ञानाची गरज फ्रेंड्स युनियन फॉर एनर्जायझिंग लाइव्ह्सचे संस्थापक डॉ.केतन देशपांडे

तारां कित Avatar

मएसो सिनिअर कॉलेज मध्ये बीबीए, बीबीए आईबी बिबीए सीए, बीसीए बीएससी सायबर सिक्युरिटी डिग्री अभ्यासक्रम उद्घाटन आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ

 

पुणे : आयुष्यात येणाऱ्या अडचणींकडे नव्हे तर संधींकडे पाहा. इन्स्टा रील्सच्या पलीकडे जाऊन स्वतःसाठी प्रेरणा शोधा. स्वतःचा मार्ग तयार करा. आज देशात क्रिएटिव्हिटीची गरज आहे. नेतृत्व, संवाद कौशल्य आणि तंत्रज्ञान शिका. आत्मनिर्भर होण्यासाठी या गोष्टी आवश्यक आहेत, असे मत फ्रेंड्स युनियन फॉर एनर्जायझिंग लाइव्ह्सचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. केतन देशपांडे यांनी व्यक्त केले.

 

मएसो सीनियर कॉलेज च्या ऑडिटोरियम मध्ये बीबीए, बीबीए-आईबी, बिबीए-सीए, बीसीए, बीएससी सायबर सिक्युरिटी डिग्री अभ्यासक्रम उद्घाटन व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून फ्रेंड्स युनियन फॉर एनर्जायझिंग लाइव्ह्सचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. केतन देशपांडे,प्राचार्य डॉ रवींद्र वैद्य, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी चे उपाध्यक्ष प्रदीप नाईक उपस्थित होते.

 

प्रदीप नाईक म्हणाले, भारतीयांची ओळख संस्कार आणि चारित्र्यामुळे आहे. विद्यार्थ्यांनी ‘राष्ट्र प्रथम’ अशी वृत्ती ठेवली पाहिजे.

 

प्राचार्य डॉ. रवींद्र वैद्य म्हणाले, शिक्षण म्हणजे केवळ पदवी मिळवणे नव्हे, तर एक चांगला माणूस घडवणे आहे. शिक्षणाचा उपयोग समाजासाठी व्हायला हवा. विद्यार्थ्यांनी परिणाम मिळाला नाही तरी चालेल, निरंतर काम करत राहिले पाहिजे.

 

कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष सहाय्य लाभले. महाविद्यालयातील मागील तसेच चालू वर्षांचे विद्यार्थी यांचे वार्षिक गुणवत्तेबद्दल गुणगौरव समारंभ पार पडला.

 

मएसो नियामक मंडळ उपाध्यक्षा आनंदी पाटील यांनीही या कार्यक्रमात उपस्थित राहुन विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. डॉ. सुरेखा वैद्य यांनी सूत्रसंचालन केले. उपप्राचार्या डॉ पूनम रावत यांनी आभार मानले.

Tagged in :

तारां कित Avatar