पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत पत्रकारांसाठी दिवाळी फराळाचा कार्यक्रम उत्साहात; जेष्ठ पत्रकार बापूसाहेब यांच्या वतीने आयोजन 

तारां कित Avatar

 

 

पिंपरी चिंचवड(प्रतिनिधी) दिनांक१७ ऑक्टोबर २०२५ – पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाच्या वतीने तसेच ज्येष्ठ पत्रकार बापूसाहेब गोरे यांच्या पुढाकाराने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील पत्रकार कक्षामध्ये पत्रकार बांधवांसाठी दिवाळी फराळाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला शहरातील विविध वृत्तपत्र, टीव्ही, आणि डिजिटल माध्यमांतील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी गोरे म्हणाले की,दिवाळी हा आनंद, ऐक्य आणि स्नेहाचा सण असल्याने या उपक्रमातून पत्रकारांमधील आपुलकी आणि परस्पर सहकार्याची भावना दृढ करण्याचा प्रयत्न आहे.पत्रकारितेतील बांधिलकी आणि सुसंवाद हीच खरी ताकद आहे. पत्रकार हा शहराचा आरसा आहे. एकत्र आल्याने अनेक विषयावर चर्चा होतात व त्यातून बातम्या करण्यासाठी प्रेरणा मिळते.

या प्रसंगी उपस्थित पत्रकारांनी फराळाचा आस्वाद घेत एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाचे पदाधिकारी, मान्यवर पत्रकार आणि विविध माध्यम प्रतिनिधी यांची उपस्थिती कार्यक्रमाला अधिक शोभा आणणारी ठरली.पत्रकार बांधवांनी या उपक्रमाचे स्वागत करत भविष्यातही अशा स्नेहमेळाव्यांचे आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त के

ली.

Tagged in :

तारां कित Avatar