जागतिक स्तन कर्करोग जागरूकता महिना लवकरच्या टप्प्यात निदान झाल्यास कर्करोग बरा होऊ शकतो – तज्ज्ञ

तारां कित Avatar

 

पुणे २० ऑक्टोबर २०२५ : अनुवंशिकता शिवाय बदलती जीवनशैली, उशिरा मूल होणे व स्थूलता, ताण-तणाव सारख्या जीवनशैलीशी निगडित समस्यांमुळे स्तन कर्करोगाची जोखीम वाढत आहे . ही फक्त एक व्यक्तीशी निगडित वैद्यकीय समस्या नसून याबाबत शाळा, कार्यस्थळ व सर्वत्र जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले . जागतिक स्तन कर्करोग जागरूकता महिना च्या निमित्ताने स्तन कर्करोग, याबाबत जागरूकता आणि वेळेवर निदानाचे महत्व लोकांपर्यंत पोहोचवणे महत्वाचे आहे.

 

 

नोबल हॉस्पिटल व रिसर्च सेंटर येथील स्तन शल्यचिकित्सक ( ब्रेस्ट सर्जन ) डॉ गिरीजा पाटील म्हणाल्या की जागरूकता म्हणजे केवळ माहिती नव्हे तर त्याचबरोबर वेळेवर उपचार घेण्यासाठी योग्य ज्ञान, साधने व सहाय्य प्रदान करणे आवश्यक आहे. अनुवंशिकता शिवाय बदलती जीवनशैली, उशिरा मूल होणे, पर्यावरणीय घटक, नियमित तपासण्या न करणे व स्थूलता, ताण-तणाव सारख्या जीवनशैलीशी निगडित समस्यांमुळे स्तन कर्करोगाची जोखीम वाढत आहे . हे आव्हान फक्त एका व्यक्तीशी निगडित नसून याची जागरूकता सर्वत्र झाली पाहिजे. अनेक स्त्रिया या पुढील टप्प्यात तपासणीकरिता येतात आणि तेव्हा उपचार पर्याय अगदी मर्यादित शिल्लक असतात . लवकरच्या टप्प्यात निदान झाल्यास कर्करोग बरा होऊ शकतो आणि नंतर जीवनमान देखील चांगले राहू शकते .

 

ट्युमर किंवा गाठ ही स्तनाच्या कोणत्याही भागात आढळू शकते पण अशा गाठी सर्वाधिक प्रमाणात वरच्या बाह्य चौकोनात म्हणजेच काखेच्या जवळच्या स्तनाच्या भागात वाढतात. ही गाठ कडक, एकाच जागी स्थित व वेदनाविरहित असू शकते . प्रत्येक गाठ ही कर्करोगाची नसली तरी गाठ आढळ्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन आपण लवकर उपचार सुरु करू शकतो .

 

त्या पुढे म्हणाल्या की लवकर निदान करण्यासाठी काही सोप्या गोष्टी आहेत ज्या आपण करू शकतो . वयाची विशी गाठल्यानंतर महिलांच्या नियमित स्व-स्तन तपासणी करावी . आपले शरीर आपल्याला माहित असते, त्यामुळे काही बदल झाल्यास ते अप्प्ल्याला लवकर कळते. वयाच्या तिशी नंतर दर तीन वर्षांनी आणि चाळीशी नंतर दर वर्षी वैद्यकीय तपासणी करून घ्यावी . चाळीशी नंतर डॉक्टरांनी सल्ला दिल्यास मॅमोग्राफी ही चाचणी छोट्या गाठी देखील ओळखू शकते. अशा प्रकारे स्वाताची काळजी घेतल्यास पुढील गुंतागुंत व मृत्यूचा धोका कमी होऊ शकतो किंवा टळू शकतो .

उपचारामध्ये शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडिएशन थेरपी, हॉर्मोन थेरपी, टार्गेटेड किंवा इम्युनोथेरपी चे पर्याय असतात आणि योग्य तो पर्याय कर्करोगाच्या स्थिती वर अवलंबून असते .

 

 

स्तन कर्करोगाबद्दल जागरूकता वाढत आहे, अनेक रुग्ण यातून पूर्णपणे बरे होतात. बरे होत असतांना किंवा झाल्यावर देखील डॉक्टरांनी दिलेली औषधें बंद करू नका असा सल्ला डॉ पाटील यांनी दिला. चांगली जीवनशैली , घरचे अन्न सेवन करणे, व्यायाम, पुरेशी झोप यामुळे जीवनमान चांगले राहण्यास मदत होऊ शकते

.

Tagged in :

तारां कित Avatar

More Articles & Posts