Saturday, August 29, 2026
Google search engine
HomeUncategorizedसॅमसंगकडून सणासुदीच्‍या काळासाठी ४-अवर इन्‍स्‍टॉलेशन अँड डेमो सर्विस लाँच

सॅमसंगकडून सणासुदीच्‍या काळासाठी ४-अवर इन्‍स्‍टॉलेशन अँड डेमो सर्विस लाँच

गुरूग्राम, भारत – सप्‍टेंबर २९, २०२५ – सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने आपल्‍या ४-अवर सुपरफास्‍ट इन्‍स्‍टॉलेशन अँड डेमो सर्विसच्‍या लाँचची घोषणा केली आहे, जी ग्राहकांना विनासायास व चिंतामुक्‍त उत्‍सवी खरेदी अनुभव देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहे.

 

या उपक्रमासह ग्राहकांना नवीन सॅमसंग उत्‍पादने (रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशिन, एअर कंडिशनर, मायक्रोवेव्‍ह ओव्‍हन, टेलिव्हिजन) विनंती केल्‍याच्‍या फक्‍त ४ तासांच्‍या आत इन्‍स्‍टॉल करण्‍याची सुविधा मिळू शकते (महापालिका हद्दीच्‍या आत). याचा अर्थ असा की आता प्रतिक्षा करावी लागणर नाही, कोणताही विलंब होणार नाही, वर्षातील सणासुदीच्‍या काळादरम्‍यान त्‍वरित मनोरंजन, आरामदायीपणा व सोयीसुविधा मिळू शकतात.

 

या अनुभवाला अधिक उत्‍साहित करत सॅमसंगचे तज्ञ सर्विस इंजीनिअर्स प्रत्‍येक उत्‍पादनाचे वैयक्तिक प्रात्‍यक्षिक दाखवतील, ज्‍यामुळे ग्राहकांना प्रगत वैशिष्‍ट्ये, टिप्‍स आणि स्‍मार्ट वापराबाबत संकल्‍पना जाणून घेण्‍यास मदत होईल. प्रत्‍येक डिवाईसचा पहिल्‍या दिवसापासून संपूर्ण क्षमतेसह आनंद घेतला जाईल, याची खात्री घेण्‍याचा मनसुबा आहे.

 

ग्राहकांना त्‍यांचे नवीन डिवाईसेस सॅमसंगच्‍या स्‍मार्टथिंग्‍ज परिसंस्‍थेशी कनेक्‍ट करण्‍याबाबत देखील मार्गदर्शन केले जाईल, ज्‍यामुळे ते घर असो किंवा काम, स्‍मार्ट राहणीमानासाठी अप्‍लायन्‍सेस व डिवाईसेसना एकीकृत करू शकतील. सॅमसंग स्‍मार्टथिंग्‍ज हे अॅप आहे, जे विनासायासपणे डिवाईसेसशी कनेक्‍ट होऊन अधिक वैयक्तिकृत, सोईस्‍कर आणि मानव-केंद्रित एआय होम अनुभव देते.

 

”सण सेटअपची वाट न पाहता एकत्रित साजरे केले जातात. आमच्‍या ४-अवर सुपरफास्‍ट इन्‍स्‍टॉलेशन अँड डेमो सर्विससह आम्‍ही ग्राहकांचा बहुमूल्‍य वेळ व सोयीसुविधांना प्रथम प्राधान्‍य देत आहोत. यामधून प्रत्‍येक नवीन खरेदी त्‍याच दिवशी सुसज्‍ज असण्‍याची खात्री मिळते, ज्‍याला आमच्‍या सर्विस टीम्‍सच्‍या कौशल्‍याचे पाठबळ आहे,” असे सॅमसंग इंडियाच्‍या कस्‍टमर सॅटिस्‍फॅक्‍शनचे उपाध्‍यक्ष सुनिल कुटिन्‍हा म्‍हणाले.

 

ही सर्विस सॅमसंगच्‍या ग्राहकोपयोगी उत्‍पादनांच्‍या व्‍यापक श्रेणीवर उपलब्‍ध आहे, ज्‍यासह भारतातील ग्राहकांना प्रीमियम, चिंता-मुक्‍त मालकीहक्‍क अनुभव देण्‍याप्रती कंपनीची कटिबद्धता अधिक दृढ झाली आहे.

 

ग्राहक येथे सुरू असलेल्‍या फेस्टिव्‍ह ऑफर्सचा शोध घेऊ शकतात: https://www.samsung.com/in/offer/

 

अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: https://www.samsung.com/in/support/superfast-installation-and-demo-service/

 

*अटी व शर्ती लागू.

 

– ही ऑफर २२ सप्‍टेंबर ते २१ ऑक्‍टोबर २०२५ पर्यंत वैध आहे.

 

– ४ तासांमध्‍ये इन्‍स्‍टॉलेशन महापालिका हद्दीच्‍या आत लागू आहे. महापालिका हद्दीबाहेर इन्‍स्‍टॉलेशन २४ तासांमध्‍ये केले जाईल.

 

– ही ऑफर उत्‍पादनाची डिलिव्‍हरी केल्‍यानंतर लागू आहे आणि विनंती नोंदणी केल्‍यानंतर इन्‍स्‍टॉलेशनसाठी संपर्क साधा (भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ४ वाजण्‍यापूर्वी).

 

– ही इन्‍स्‍टॉलेशन सर्विस सर्व सॅमसंग ग्राहकोपयोगी उत्‍पादनांवर उपलब्‍ध आहे.

 

– अनपेक्षित घटना, नैसर्गिक आपत्ती, प्रतिकूल हवामान परिस्थिती किंवा सरकारने लादलेल्या प्रतिबंधित हालचाली असलेल्या भागात, निषेध, अपघात, वाहतूक इत्यादी बाबतीत वरील वेळेचे पालन केले जाणार नाही/लागू होणार नाही.

 

– अनपेक्षित परिस्थितीमुळे किंवा सॅमसंगच्या नियंत्रणाबाहेरील कारणांमुळे इन्स्टॉलेशन/डेमोमध्ये विलंब झाल्यास कोणत्याही दाव्यासाठी, तसेच नुकसान भरपाईसाठी सॅमसंग जबाबदार राहणार नाही.

 

– दाखवलेल्या उत्पादनांचे फोटो फक्‍त प्रतिनिधीत्वासाठी आहेत, प्रत्यक्ष उत्‍पादनांमध्ये फरक असू शकतो.

 

– दाखवलेली उत्पादने स्वतंत्रपणे विकली जातात.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments